नवरा-बायको मराठी जोक्स | Husband Wife Jokes in Marathi | Navra Bayko Jokes

Husband Wife Jokes in Marathi | Navra Bayko Jokes - येथे आपण नवरा बायकोमधील धमाल मराठी विनोद वाचणार आहोत. हे मराठी जोक्स वाचून तुम्ही नक्की खुश व्हाल.

Husband Wife Jokes in Marathi

आपल्या दैनंदिन जीवनात असे प्रसंग येतच असतात कि ज्या प्रसंगातून अचानकपणे एखादा विनोद घडतो. अशावेळी आपण खूपच हसतो. कारण अचानक झालेला हा प्रसंग आपल्या मानला खूपच आनंद देऊन जातो. ज्या नात्यात सर्वाधिक विनोद होतात ते नाते म्हणजे नवरा-बायकोचे नाते. आपणही हा अनुभव नक्की घेतलाच असेल. मित्रांनो त्यामुळे आपण या पोस्टमध्ये Navra Bayko Jokes वाचणार आहोत.

Husband-Wife-Jokes-in-Marathi
Husband Wife Jokes in Marathi

आम्हाला खात्री आहे कि, हे जोक्स आपल्याला नक्कीच आवडतील. चला तर मग सुरु करूया...

Husband Wife Marathi Jokes

नवरा तिच्या गरोदर बायकोला हॉस्पिटलमध्ये
घेऊन जात होता...
तेवढ्यात एक माणूस - तुमची बायको आहे काय?

नवरा - हो...

माणूस - प्रेग्नंट आहेत काय?

नवरा (वैतागून) - नाही नाही
फुटबॉल गिळलाय तिने...
मुर्खा... चल हो बाजूला...
😂😂😂😂😂

बायको - अहो, माझ्याकडे तोंड करून झोपा,
मला भिती वाटते...

नवरा - हा, म्हणजे मी भीतीने मेलो तरी चालेल...?
😂😂😂😂😂

बायको - काय हो...
इतक्या हळू आवाजात कोणाशी बोलताय...

नवरा - बहिणीशी...

बायको - अहो मग, बहिणीशी इतक्या हळू आवाजात कशाला बोलायला हवं...?

नवरा - अग माझ्या नाही, तुझ्या बहिणीशी बोलतोय...!!!
😂😂😂😂😂

जेव्हा बायको म्हणते ,,,
"काय म्हणालात...??"

याचा अर्थ असा नाही की
तिने ऐकले नाही,

तर ती तुम्हाला तुमचे वाक्य बदलण्याची 1 संधी देत असते.
😂😂😂😂😂

नवरा - किती काम करशील,
आपण तुझ्यासाठी एक कामवाली बाई ठेवू.

बायको - नाही अजिबात नको...
आठवत नाही का, मी सुद्धा
तुमच्याकडे कामवालीच होते...
😂😂😂😂😂

बायको - माझ्या आईचं ऐकल असत
आणि
तुम्हाला नकार दिला असता ना,
तर मी सुखी झाले असते...

नवरा - काय सांगतेस काय...?
तुझ्या आईचा विरोध होता आपल्या लग्नाला...

बायको - हो...

नवरा - अरे देवा... आणि मी
त्या माउलीला वाईट समजत होतो...
😂😂😂😂😂

एकदा नवरा बायको डिस्कव्हरी बघत असतात.

चॅनेलवर म्हैस दिसते...

नवरा - ती बघ तुझी नातेवाईक
बायको - अय्या... सासूबाई .
😂😂😂😂😂

नवरा बायको समोरासमोर बसून जेवण करत होते.

जेवण झाल्यावर नवरा उठला
आणि
त्याने स्वतःचे ताट धुवून आणले.

बायको नवर्‍याकडे रागाने पाहत म्हणाली...

केला ना इज्जतीचा कचरा...

आपण आपल्या घरी नाही आहोत.
बाहेर हॉटेलमध्ये जेवायला आलो आहोत...
😂😂😂😂😂

बायको - कशी दिसते आहे मी...?

नवरा - छान दिसते आहेस...

बायको - एखादा शेर म्हणा ना...

नवरा - हि जी दिसतेस तू सुंदर परी...
यातच जाते संपूर्ण सॅलरी माझी...!!!
😂😂😂😂😂

नवरा - माझ्या छातीत खूपच दुखत आहे...
ताबडतोब डॉक्टरला फोन लाव...

बायको - हो लावते...
तुमच्या मोबाईलचा पासवर्ड सांगा...

नवरा - नको राहू दे...
आता बर वाटतंय थोडेसं...!!!
😂😂😂😂😂

बायकोला तिळगुळ देणे हि
श्रद्धा आहे,

आणि
    .
    .
ती गोड गोड बोलेल हि
अंधश्रद्धा आहे...
😂😂😂😂😂

बायको तिच्या मैत्रिणीला - अग काल दिवसभर नेट चालत नव्हते...

मैत्रीण - मग काय केले...?

बायको - काही नाही ग, नवऱ्याबरोबर गप्पा मारत होते.
चांगला वाटला ग स्वभावाने...
😂😂😂😂😂

लग्नाच्या 18 वर्षानंतर…
    .
बायको – मला पिझ्झा खायचा आहे.
नवरा पिझ्झा आणून देतो.
    .
बायको – थँक्स.
    .
नवरा – फक्त थँक्स?
    .
बायको लाजून – इश्श, मग काय आता i love you वगैरे म्हणू का?
    .
नवरा – फालतूपणा करू नकोस!
अर्धा – अर्धा कर!
नाय तर एका बुक्कीत दात पाडीन...!!!
😂😂😂😂😂

नवरा - आज, भाजीत थोडं मीठ जास्त वाटतंय...

बायको - मीठ बरोबर आहे.
भाजीच कमी पडलीय...
सांगितलं होत ना जास्त आणा म्हणून....
😂😂😂😂😂

आज तर माणुसकीवरून विश्वासच उडाला माझा...

ज्या मित्राच्या लग्नात आम्ही,
आया है राजा, लोगो रे लोगो...
वर नाचलो होतो...

तोच मित्र आज भांडी घासत होता...
😂😂😂😂😂

बायको - नेहमी माझं अर्ध डोक दुखत असत...
असं वाटत डॉक्टरला दाखवायला हवं...

नवरा - अरे त्यात काय दाखवायचं...
जितकं आहे तितकच दुखणार ना...

तेव्हापासून नवऱ्याचे संपूर्ण अंग दुखणे चालू आहे...
😂😂😂😂😂

बायको - तुम्ही काल खूप प्यायला होता.

नवरा - नाही गं.

बायको - तुम्ही नळापाशी बसून म्हणत होता,
रडू नको सगळं ठीक होईल.....
😂😂😂😂😂

नवरा - कुठे गेली होतीस?

बायको - रक्तदान करायला

नवरा - हे बरोबर नाही…
माझं प्यायचं
आणि
बाहेर जाऊन विकायचं...!!!
😂😂😂😂😂

लग्न झाल्यावर बायकोवर प्रेम आहे,
हे दाखवण्यासाठी I Love you पेक्षा
असरदार वाक्य आहे...
    .
    .
आज मी भांडी घासतो...
तू तोपर्यंत Whatsapp बघ...
😂😂😂😂😂

बायको आपल्यावर खूपच प्रेम करते
असे वाटत असेल तर...

जेवण झाल्यावर एकदा पडद्याला हात
पुसुन पहा...

तुमचा सगळा गैरसमज दूर होईल.....!!!!
😂😂😂😂😂

हे वाचा : पोट धरून हसायला लावणारे मराठी विनोद

Navra Bayko Jokes in Marathi

बायको - तुम्ही मला लग्नापूर्वी सिनेमा, सारसबाग,
कुठे कुठे फिरायला घेऊन जायचा...
आणि
आता कुठेच नाही नेत...

नवरा - निवडणूक झाल्यावर कोणी प्रचार केलेला पाहिलंय का...
😂😂😂😂😂

हल्लीच्या बायका नवऱ्याच्या छातीवर डोकं ठेवून
हळूच विचारतात...

डियर, माझ्या आधी तुझ्या आयुष्यात कोणी होती का रे?

तुमचे उत्तर इथे महत्त्वाचे नसते
तर
महत्वाचे असतात तुमच्या हृदयाचे वाढणारे ठोके...

तेव्हा हृदयाच्या ठोक्यांवर नियंत्रण ठेवायला शिका...
😂😂😂😂😂

नवऱ्याने बायकोला केलेला भावपूर्ण मेसेज

माझं प्रेम राफेल विमानासारखं आहे,

शेवटपर्यंत त्याची तुला त्याची किंमत कळणार नाही.
😂😂😂😂😂

बायको - माझी एक अट आहे...

नवरा - काय...?

बायको - तुम्ही सोडायला आले तरच मी माहेरी जाणार...

नवरा - माझीही एक अट आहे...

बायको - काय...?

नवरा - मी घ्यायला आलो तरच तू परत यायचे...!!!
😂😂😂😂😂

नवरा - जर मला लॉटरी लागली तर तू काय करशील?

बायको - अर्धे पैसे घेऊन कायमची माहेरी निघून जाईल...
तु खुश मी पण खुश…

नवरा - 20 रुपयांची लागली आहे,
हे घे 10 रूपये आणि चल निघ…
😂😂😂😂😂

बायकोमुळे त्रासून गेलेला नवरा त्याच्या घरच्या

कुत्र्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलतो...

तुझ्यात आणि माझ्यात फक्त दोन पायांचा
फरक आहे...!!!
😂😂😂😂😂

नवरा - साजणी, तुझ्या केसांच्या मखमली
जाळ्याला सांभाळत जा ग जरा...

बायको (लाजत) - तुम्ही पण ना...
इश्श...

नवरा - आई शप्पथ...
जर पुन्हा जेवणात तुझा केस सापडला ना,
तर साजणीवरून गजनी बनवून टाकेल तुला...
😂😂😂😂😂

या दोन वाक्यांनी मी पुरता गोंधळून गेलोय राव...

बायका नेहमी म्हणतात की “पुरुष मूर्ख आहेत”...
    .
पण बायका हेदेखील म्हणतात की,

“आम्ही पुरूषांपेक्षा काही कमी नाही”…
😂😂😂😂😂

पप्पूच लग्न झालं
आणि
त्यांचा संसार सुरु झाला...

एकदा पप्पू त्याच्या बायकोला विचारतो..?

तू माझ्यात असं काय पाहिले कि थेट हो म्हणालीस?

पप्पूची बायको - लग्नाअगोदर मी तुम्हाला भांडे घासताना पाहिले होते...!!!
😂😂😂😂😂

एक विवाहीत स्री स्वत:च्याच जिभेवर हळद, कुंकु नि अक्षदा
लावत होती…

तेवढ्यात…

नवरा - अगं हे काय करतेस?

बायको - अहो दसरा आहे ना आज!

म्हणुन शस्त्राची पुजा करतेयं..

नवरा फरार...
😂😂😂😂😂

बायको (लाजत) - अहो मला सांगा ना,
मी तुम्हाला किती आवडते...?

नवरा - खूप खूप खूप आवडते ग...

बायको - असं नाही खूप खूप म्हणजे किती सांगा
ना प्लीज प्लीज...

नवरा - म्हणजे इतकी आवडते कि असं
वाटत तुझ्यासारख्या 5 - 6 अजून कराव्यात...
😂😂😂😂😂

नवरा बायकोच भांडण चालू असते...

नवरा - तू स्वतः ला आवर नाहीतर...
माझ्यामधला जनावर बाहेर येईल...!

बायको - हा... हा... येऊ द्या...
उंदराला कोण घाबरतंय...!!!
😂😂😂😂😂

बायको - (बाथरूम मधून लाडिक आवाजात) अहो मी साबण लावलाय
जरा तुमच्या मजबूत हातानी चोळून देता का?

नवरा - आलो... आलो... आलो... आलोच...

(नवरा पेपर वाचता वाचता तडक बाथरूम कडे धाव घेऊन आत घुसतो)

बायको - अहो ह्या बादलीभर कपड्याना साबण लावून ठेवलाय.
नीट रगडून धुवा. मला स्वयंपाकाच काम आहे मी जाते...!!!
😂😂😂😂😂

नवरा (बायकोला चिडवत म्हणाला) - काल रात्री माझ्या स्वप्नात एक सुंदर मुलगी आली होती....

बायको - एकटीच आली असेल....

नवरा - हो तुला कसं माहित....?

बायको - कारण तिचा नवरा माझ्या स्वप्नातआला होता....

बायको जोमात, नवरा कोमात...
😂😂😂😂😂

समोरच्या अपार्टमेंटमधील ती पाच
मिनिट हात हलवत होती...

मग मी पण हात केला,

तेवढ्यात बायकोने पाठीत रट्टा दिला,
आणि म्हणाली...

ती खिडकीची काच पुसतेय...
😂😂😂😂😂

एका पत्नीची समस्या...

मी माझ्या ह्यांना विचारत असते की,

तुमच्या आयुष्यात सगळ्यात मोठी समस्या कोणती?

पण...

हे काहीच बोलत नाही,
फक्त माझ्याकडे बघत राहतात...
😂😂😂😂😂

माणूस - साहेब माझी बायको हरवलीय ....

हे बघा हे पोस्ट ऑफिस आहे,
पोलिस स्टेशन नाही...

तक्रार द्यायला पोलीस स्टेशन मध्ये जा ....

माणूस - च्यायला, आनंदाच्या भरात कुठे जाऊ तेच कळत नाही.....
😂😂😂😂😂

बायकोला गजरे हवे होते…

तिनं मेसेज पाठवला इंग्रजीत….

Yetana 5 Gajre gheun ya…

तो येतांना 5 गाजरं घेऊन आला…

उपाशी झोपला काय चुकल बिच्याऱ्याच...??

म्हणून मेसेज मराठीतच टाईप करा...!!!
😂😂😂😂😂

बायको - अहो, ऐकता का...?

नवरा - हा... बोल...

बायको - अहो डॉक्टरने मला एक महिना
कुठेतरी विदेशात जाऊन आराम करायला सांगितला आहे...
मग आपण कधी जायचं...?

नवरा - उद्या...

बायको - अय्या, हो...
आपण कुठे जायचं...?

नवरा - दुसऱ्या डॉक्टरकडे...!!!
😂😂😂😂😂

बायको - माझा मोठेपणा बघा ....

मी तुम्हाला न बघताच तुमच्याशी लग्न केलं.

नवरा - त्यापेक्षा माझा मोठेपणा बघ ....

मी तुला बघून सुध्दा तुझ्याशिच लग्न केलं...
😂😂😂😂😂

बायको - लग्नानंतर तुमचं आता प्रेमच राहिलं
नाही माझ्यावर.

नवरा - परीक्षा पास झाल्यावर कोणी अभ्यास करतं
का येडे?
😂😂😂😂😂

बायको - तुम्हाला कधी पासुन हि वाईट सवय लागली?

नवरा - कोणती...

बायको - लॉटरी खेळण्याची….

नवरा - पण आपल्या गावात तर लॉटरी सेन्टर नाहीय.

बायको - खबरदार!खोटे बोलु नका,
मी आताच तुमच्या खिशातून गुलाबी रंगाच तिकीट फाडून फेकले…

नवरा - झिप्परे, ती 2000 ची नोट होती.
😂😂😂😂😂

पति - आज घर आवरलेलं आहे.
तुझ व्हाट्सअप बंद होंत का आज ?

पत्नी - नाही हो...

फोनचा चार्जर सापडत नव्हता...
तोच शोधण्याच्या नादात घर आवरलं गेल..!
😂😂😂😂😂

भावनिक पोस्ट…..
    .
    .
बायको घरी नसली की घर खायला उठत..

आणी

मग घाबरलेला जीव प्यायला बसतो….
😂😂😂😂😂

पत्नी - लवकरच आपण दोनाचे तीन होणार आहोत...!!!

पती - ही बातमी ऐकून मला खूप आनंद झाला...

पत्नी - माझी आई आज रात्रीच्या विमानाने येणार म्हणून
तुम्हाला इतका आनंद झाला...!!!
😂😂😂😂😂

भयंकर जोक

नवरा - (खूप संतापून) फोन का नाही उचलला?
    .
बायको - (चिडून) मी रिंगटोनवर नाचत होते…
😂😂😂😂😂

हे वाचा : Santa Banta Jokes in Marathi | संता बंता मराठी जोक्स

Navra Bayko Jokes

तर मित्रांनो आम्हाला खात्री आहे कि, आम्ही आपल्यासाठी Navra Bayko Jokes in Marathi उपलब्ध करून दिलेले आहेत, ते तुम्हाला नक्कीच आवडतील...

जर आपल्याला हे आवडले तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा.

अशाच प्रकारच्या दर्जदार मराठी जोक्ससाठी वेळोवेळी आमच्या www.Netmarathi.com या वेबसाईटला भेट द्या...

महत्वपूर्ण सूचना
❝सदर मराठी जोक्स आम्ही फक्त आणि फक्त मनोरंजन म्हणून उपलब्ध करून देत आहोत. त्यामागे कोणाची बदनामी करण्याचा आमचा कोणताही हेतू नाही.❞