Marathi Jokes for Friends | मित्र-मैत्रिणीवर धमाल मराठी जोक्स

Marathi Jokes for Friends | मित्र-मैत्रिणीवर धमाल मराठी जोक्स - येथे आम्ही आपल्यासाठी मित्र-मैत्रिणीवर धमाल मराठी विनोद उपलब्ध करून देणार आहोत...


निसर्गाने मानवाला दिलेली एक सर्वात अमूल्य देणगी म्हणजे "हास्य". मात्र काळाच्या ओघात आणि स्पर्धेच्या या जीवघेण्या चढाओढीत मनुष्य खळखळून हसणे जवळपास विसरलाच आहे, असे वाटू लागले आहे. जर आपल्याही आयुष्यात एखादी अशीच चिंता असेल कि ज्यामुळे आपण खळखळून हसणे विसरून गेला असेल... तर आता आपल्याला काळजी करण्याचे काहीही कारण नाही. आम्ही आपल्यासाठी येथे भरपूर धमाल मराठी जोक्स उपलब्ध करून देत आहोत, ते वाचून आपला मूड एकदम फ्रेश होईल अशी आम्ही ग्वाही देतो.


Latest Marathi Jokes for Friends


दर्द

 

माझा एक मित्र आहे,
तो इतके दर्द भरे स्टेटस टाकतो कि,
कधी कधी तर
.
.
.
.
मी पण त्याच्या गर्लफ्रेंडला मिस करतो...!!!

😂😂😂😂😂


आठवण

 

लय आठवण येते त्या मित्रांची,
सर मला मारत असताना पट्टी
मागितल्यावर ते पट्टी द्यायचे...
आणि
एक हरामखोर बोलायचा...
.
.
.
.
सर थांबा, माझ्याकडे स्टीलची पट्टी आहे...!!!

😂😂😂😂😂


साथ

 

जर मी मेलो तर
अजिबात नाराज होऊ नका...
अन अजिबात रडू नका...
सरळ वरती निघून या...
.
.
.
.
आपण पिंपळाच्या झाडावर बसून लोकांना घाबरवू...!!!

😂😂😂😂😂


रूम

 

रुम‬ वर राहणारे मुले भांडी तो पर्यंत धूत नाहीत .
.
.
.
.
जो पर्यंत ‪चहा‬ कढईत बनवायची वेळ येत नाही...!!!

😂😂😂😂😂


शांतता

 

माझ्या शांततेला माझी

कमजोरी नका समजू

मी मनातल्या मनात पण शिव्या देतो...!!!

😂😂😂😂😂


परीक्षा

 

परिक्षा हॉल...

मंग्या - दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर दाखव...
बारक्या - नाही लिहले...

मंग्या - तिसऱ्या
बारक्या - नाही

मंग्या - चार, पाच, सहा
बारक्या - नाही, नाही, नाही...!

मंग्या - तु फक्त पास तर हो रे...!
तुला मारला कसा ते सावधान इंडिया मध्ये दाखवतील...!!!

😂😂😂😂😂


व्हिडिओ

 

पूर्वीच्या काळी दोघांचे भांडण सुरु झाले
तर,
तिसरा सोडवायचा...
आता,
.
.
.
.
दोघांचे भांडण सुरु झाले तर,
तिसरा व्हिडिओ बनवतो...!!!

😂😂😂😂😂


हसा खेळा

 

हसत खेळत रहा...
.
.
.
.
काय माहिती घरचे कधी लग्न
लाऊन देतील.

😂😂😂😂😂


शेवटची इच्छा

 

यमराज - काही शेवटची इच्छा...

मी - 5 km वर माझ्या मित्राचं घर आहे...
जाताना त्याला पण घेऊन जाऊ
नाही तर मज्जा नाही येणार...!!!

😂😂😂😂😂


तलवार

 

तलवार पास होने से कुछ नहीं होता,

तलवार चलाना भी आना चाहीये...

असे status टाकणारे पोर डॉक्टरने
इंजेक्शन काढले की,

मोठमोठ्याने रडतात...!!!

😂😂😂😂😂


शाळा

 

शाळा आमची छान होती….

लास्ट बेंचेवर आमची
.
.
.
.
सगळी वाया गेलेली GANG होती…!!!

😂😂😂😂😂


लॉक

 

काही जण मोबाईलला एवढा
अवघड लॉक ठेवतात...
जस काय...
.
.
.
.
देशाच्या सर्व गुप्त फाईल्स यांच्याच
मोबाईल मध्ये आहेत...!!!

😂😂😂😂😂


भविष्य

 

ज्योतिषी - तुझे नाव झंप्या आहे?

झंप्या - हो..

ज्योतिषी - तुला एक मुलगा आहे?

झंप्या - हो.. ज्योतिषी महाराज

ज्योतिषी - तू आत्ताच पाच किलो गहू घेतले.

झंप्या - तुम्ही अंतर्यामी आहात महाराज...

ज्योतिषी - मुर्खा,
पुढच्या वेळी येताना पत्रिका घेऊन ये. रेशनकार्ड नको!

😂😂😂😂😂


पिकनिक

 

एक मित्र आपल्या पिकनिकसाठी
मित्रांना स्मशानभूमीत घेऊन जातो...

सगळे मित्र - ऐ आम्हाला कुठ घेऊन आलास्?

मित्र - अरे वेडयांनो, “लोक मरतात ” इथं यायला !!!

😂😂😂😂😂


नजर

 

प्रेमाने बघाल तर कचरा पण सुंदर दिसेल…
.
.
.
.
फ़क्त नजर डूकराची पाहिजे...!!!

😂😂😂😂😂


टोमणे

 

मित्रांनो,

जिथे कानाखाली मारता येत नाही,

तिथे टोमणे मारुन यायचं,

पण सोडायच नाही...!!!

😂😂😂😂😂


अब तक छप्पन

 

तीन मित्र बोलत असतात…

पहिला मित्र - माझ्या बायकोन जुडवा पिच्चर बगीतला
आणि
तिला जुडवा पोर झाली…

दूसरा मित्र - व्हय र, माझ्यापण बायकोन 3 इडीयट बगीतला तिला 3 पोर झाल्यात…

हे ऐकूण तीसरा मित्र पळत सुटतो….

बाकीचे दोघे -अरे कुट पळतोयस...?

तिसरा मित्र - आमची खुळी अब तक छप्पन बघायला गेलीये...!!!

😂😂😂😂😂


दातांचा दवाखाना

 

एक मुलगी होती
.
बीना तिचं नाव होतं
.
ती खूप हुशार होती
.
ती दाताची डॉकटर झाली...
.
तिने दवाखाना टाकला
आणि
दवाखान्याला हौसेने स्वतःचं नाव दिलं...
.

“बिना दातांचा दवाखाना”

😂😂😂😂😂


उसने पैसे

 

एका मित्राने मला दहा हजार रुपये मागितले...

मी म्हटलो - पैसे तर नाहीत पण तु माझ्याकडून
तेवढ्या पैशाची अपेक्षा ठेवली...
लय, बरं वाटल.

😂😂😂😂😂


आत्महत्या

 

दोन मित्र एकाच परीक्षेत दुसऱ्यांदा नापास होतात...

पहिला मित्र - जाऊ दे यार चल, आत्महत्या करू...

दुसरा - येडा बिडा झालास का काय...?
पुढच्या जन्मी परत बालवाडी पासून स्टार्ट करावं लागेल...!!!

😂😂😂😂😂मोठेपणीचे स्वप्न

 

लहानपणी - मोठा झाल्यावर मी डॉक्टर होईल,पायलट होईल
किंवा
इंजिनीअर होईल….
.
.
.
.
तरुणपणी - आरे त्या ZP च्या शिपायाच्या जागा निघाल्या की सांग..!!!

😂😂😂😂😂


काम

 

दोन मित्र फोनवर बोलत असतात...

पहिला - हेलो भाई, काय म्हणतोस...!

दुसरा - मस्त रे एकदम, तू काय म्हणतोस...

पहिला - अरे एक काम होते...

दुसरा - हा कर मग, थोड्या वेळाने बोलू निवांत, चल बाय...

😂😂😂😂😂


मूड

 

मन्या - काल तुझा मूड ऑफ का होता माझ्याशी बोलताना,
आणि आज एकदम मूडमध्ये?

गणु - काल यार बायकोने वीस हजार साड्यांवर उडवलेत...!

मनू - मग आज मूड ऑन कसा...?

गणू - आज त्या साड्या घेऊन तुझ्या बायकोला दाखवायला गेलीय...!!!

😂😂😂😂😂


किडनी

 

प्रिय मित्रा,
स्वतः ला कधी कमी समजू नकोस...

तुझी एक किडनी मला आयफोन
मिळवून देऊ शकते...!!!

😂😂😂😂😂


पत्र

 

गंपू - तुझ्याकडे माझा मोबाइल नंबर आहे ना?
मग पत्र का पाठवलंस?

झंपू - आधी फोनच केला होता.
पण एक बाई सारखी सांगत होती...

‘प्लीज ट्राय लेटर’!

😂😂😂😂😂


गाय छाप

 

मित्राला भेटण्यासाठी हॉस्पिटल मध्ये गेलो तर तो म्हणतो…

दर्द दिलो के कम हो जाते
.
.
.
.
अगर…
.
.
.
.
सफरचंद के बदले गाय छाप ले आते...!!!

😂😂😂😂😂


फरक

 

मित्र आणि खरा मित्र यातिल फरक...

मित्र तो, जो जेल मधुन आपली जमानत करेल ..

आणी

खरा मित्र तो, जो जेलमधे आपल्या बाजुला बसलेला असेल

आणी

म्हणेल – काय सॉलिड धुतला रे त्याला आपण…!!!

😂😂😂😂😂


Acting

 

 Hollywood आणि Bollywood ची
Acting एकीकडे
आणि
.
.
.
.
नातेवाईक पैसे देताना, नको म्हणण्याची
Acting करणं एकीकडे...!!!

😂😂😂😂😂


सिलेक्शन

 

आमचा निम्मा वेळ क्रिकेट खेळताना
हरवलेला बॉल सापडण्यात जायचा,
नाहीतर...
.
.
.
.
आम्हीपण टीम इंडियात सिलेक्ट झालो असतो...!!!

😂😂😂😂😂


क्वार्टर

 

किती सुंदर होते ते लहानपणीचे दिवस...

फक्त दोन बोटे जोडली कि,

"दोस्तीला पुन्हा सुरुवात व्हायची..."

आता क्वार्टर पाजल्याशिवाय दोस्ती होतच नाही...

माजले साले दूसर काही नाही...!!!

😂😂😂😂😂


गुण / दुर्गुण

 

गुण जुळले कि लग्न होतंय
आणि
.
.
.
.
दुर्गुण जुळले कि
मैत्री...!!!

😂😂😂😂😂


हरवलेलं

 

एक वेळेस हरवलेले प्रेम परत मिळेल पण,
.
.
.
.
मित्राला दिलेला गॉगल कधीच परत मिळत नाही...!!!

अखिल भारतीय पाच मिनिटात परत देतो संघटना !!! 

😂😂😂😂😂


लुप्त होत चाललेली कला

 

 काल एक दृश्य बघून फारच चिंता वाटली…

आपण हळू हळू काळाच्या ओघात
आपल्या काही गोष्टी विसरत चाललोय…

काल एका मुलाने ice-cream चा कप घेतला
आणि त्याच झाकण न चाटताच फेकून दिलं...!!!

😂😂😂😂😂


अवघड प्रश्न

 

झंप्या - माझ्या एका प्रश्नाचं उत्तर आतापर्यंत एकाही पोरिला देता आलं नाही..

पोरगी - इतका अवघड आहे का ? विचार, मी सांगते..

झंप्या:
.
.
.
.
“तुझा फोन नंबर काय? ”

😂😂😂😂😂


लई बघत होती

 

 लग्नाला जाऊन आल्यावर,
पोरांचा एकच "डायलॉग" असतो...

एक पोरगी लई बघत होती,

पण नंबर देता देता राहिला...!!!

😂😂😂😂😂


मजा

 

नितेश - अरे सतीश,
हे आंब्याचे झाड बोलू लागले
तर
काय मज्जा येईल ना...!!!

मितेश - मजाच येईल!
कारण,
ते बोलू लागल्यावर प्रथम तुला सांगेल,
की मी वडाचे झाड आहे...!!!

😂😂😂😂😂


विचार

 

रात्री माझ्या डोक्यात फक्त
एकच विचार येतो...
.
.
.
.
चादरीत वार कुठून येतंय...!!!

😂😂😂😂😂


प्रगती

 

शारीरिक आणि आर्थिक प्रगती करण्यासाठी

पहाटेचे मित्र वाढवा
आणि
रात्रीचे मित्र कमी करा...

असे उपदेशाचे डोस ऐकल्यावर आम्ही निर्णय घेतला की,
.
.
.
.

रात्रीच्या मित्रांसोबतच पहाटेपर्यंत बसायचं...!!!

😂😂😂😂😂


सवय

 

लोक म्हणतात कि एक दिवस दारू पिल्याने सतत सवय लागते.

एकदम चूक...!!!

आम्ही लहानपणा पासून अभ्यास करतोय

लागली का सवय?

याला म्हणतात Control...!!!

😂😂😂😂😂


रिकामटेकडे

 

माझे काही मित्र एवढे रिकामटेकडे आहेत

कि,

बसल्या बसल्या

मुंग्यांचा रस्ता अडवून बोलतात...

आता कुठून जातेस बघतोच...!!!

😂😂😂😂😂


बेरोजगारी

 

पहिला मित्र - अरे रमेश तू इथे वडापाव विकतो आहेस,
गेल्या वर्षीच तर तू 1st क्लास graduate झालास ना ??

रमेश - हळू आवाजात .. अरे माझे सोड …
जो वडापाव आणि भजी तळत आहे ना,
तो CA आहे…!!!

😂😂😂😂😂


सुनबाई

 

तुमचा मुलगा अचानक प्रसाद वाटायला

पुढे पुढे जाऊ लागला

की,

समजायचं

होणारी सुनबाई आरतीला आली आहे...!!!

😂😂😂😂😂


लिमिट

 

खोटं बोलायलाची पण काही लिमिट असते राव...

काल एकाला उधारी मागण्यासाठी
घरच्या लँडलाईन वर फोन केला,

तर तो म्हणतो,

“अरे यार, थोडा वेळाने फोन कर...
मी आता गाडी चालवतोय…..”

😂😂😂😂😂


ताजमहाल

 

गण्याने फेसबुकवर स्टेटस अपडेट केलं...

“शुक्र करो, की मेरी कोई मुमताज नही..

वरना,
हर गली मे एक-एक ताजमहल होता..”

त्यावर बाळ्याची कमेंट आली,
"घरावर तुऱ्हाट्या टाक, उन्हाळा सुरु झालाय...!!!

😂😂😂😂😂


अधूर प्रेम

 

माझा मित्र एका मुलीच्या मागे हात धुऊन
लागला होता.

मग तिने तोंड धुतले...

मग तो घरी परतला...!!!

😂😂😂😂😂


मस्करी

 

काय सांगू मित्रांनो??

काल एका मुलीँला मस्करीत म्हणालो..
“दिल चीर के देख, तेरा हि नाम होगा”
:
:
:
कालपासून.. चाकू घेऊन मागे लागलीये..!!!
येडी.. रताळी..

😂😂😂😂😂


श्रीमंती

 

बरं झालं या जगात “श्रीमंती” ही पैशानेच मोजली जातीय,

जर मनाने, प्रेमाने मोजली गेली असती,

तर माझे नाव ही कदाचीत स्वीस बँक खातेदारांच्या लिस्ट मध्ये असतं...!!!

😂😂😂😂😂


आहेर

 

आत्ता like ,Comment सुद्धा
लग्नाच्या आहेरा प्रमाणे झाली आहे...
.
.
.
.
तु दिली तरच मी देणार…!!!

😂😂😂😂😂


वैताग

 

एक वैतागलेला मित्र

च्या मायला आज काल बऱ्याच
पोरांच्या गाडीवर पोरी फिरताना दिसतात...

आणि

आमचा गाडीवर

कधी पेंडीच पोत....
कधी खताच पोत .....
तर कधी गवताच वझ...!!!

😂😂😂😂😂


गुण

 

फक्त मोबाईलाच माहीत असतं,
की,
.
.
.
.
आपला मालक काय गुणांचा आहे...!!!

😂😂😂😂😂


बदल

 

 परिक्षा पास झाल्यावर्...

आई - देवाची कृपा.
सर - माझ्या मेहनतीमूळे.
बाबा - मुलगा कोणाचा आहे.
मित्र - चल एक बीयर मारु...

पण,
नापास झाल्यावर्...

सर - वर्गात लक्ष नाही.
आई - मोबाईलचा परिणाम.
बाबा - आईचे लाड.
मित्र - चल एक बीयर मारु...

सगळे बदलतात पण मित्र बदलत नाहीत...

😂😂😂😂😂


विसर

 

कृष्णाला 16000 बायका होत्या,

तरीही तो

आपला मित्र सुदामला विसरला नाही,

आणि

इकडे आमचे मित्र एक पोरगी काय पटली...

साले फोन पण उचलत नाही...!!!

😂😂😂😂😂


प्लॅन

 

दोन मित्र गंभीर होऊन चर्चा करत असतात.

पहिला - तुझा काय प्लॅन आहे...

दुसरा - काही नाही, तोच 199 चा...

पहिला - निघ इथून xxxxxxxxxxxxx

😂😂😂😂😂


खरे

 

खरं सांगा...

विडिओ कॉल केल्यावर आपण
.
.
.
.
स्वतःलाच जास्त बघतो...!!!

😂😂😂😂😂


मी पुन्हा येईल

 

परीक्षेत काही येत नाही नसेल तर

एक वाक्य नक्की  लिहून या...
.
.
.
.
मी पुन्हां येईल...
मी पुन्हां येईल...
मी पुन्हां येईल...

😂😂😂😂😂


वेळ

 

वेळ एक सारखीच राहत नाही,

सगळ्यांची वेळ बदलत असते...

जे कपडे इंग्रज गव्हर्नर घालून लोकांवर हुकुमशाही करत होते...

आज तेच कपडे BAND वाले घालतात...

वाजीव रे

धताड़ तताड धताड़ तताड़...

😂😂😂😂😂


हे देखील वाचा...


Marathi Jokes for Friends

तर मित्रांनो, आम्हाला खात्री आहे कि, आम्ही याठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेले मित्रांवर मराठी जोक्स आपल्याला नक्कीच आवडतील. जर आपल्याला ते आवडले असेल तर ते आपल्या मित्र-मैत्रीणीना अवश्य शेअर करा. 


Marathi-Jokes-for-Friends
Marathi Jokes for Friends

अशाच प्रकारच्या दर्जेदार जोक्ससाठी वेळोवेळी आमच्या www.Netmarathi.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

महत्वपूर्ण सूचना
❝सदर मराठी जोक्स आम्ही फक्त आणि फक्त मनोरंजन म्हणून उपलब्ध करून देत आहोत. त्यामागे कोणाची बदनामी करण्याचा आमचा कोणताही हेतू नाही.❞