नवरदेवासाठी मराठी उखाणे | Marathi Ukhane for Male, Groom

Marathi Ukhane for Male, Groom - या लेखात आपण नवरदेवासाठी असलेले मराठी उखाणे वाचणार आहोत. हे Marathi Ukhane आपल्याला नक्कीच आवडतील...

Marathi Ukhane for Male

प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात खूप सारे आनंदाचे क्षण नेहमी येत असतात. त्यातीलच एक अतिशय आनंदाचा क्षण म्हणजे लग्न. तरुण वर्गाच्या सर्वाधिक जिव्हाळ्याचा विषय म्हणजे, स्वतः चे लग्न. ज्यावेळी एखाद्या मुलाचे लग्न ठरते, त्यावेळी त्याच्याबरोबरच त्याच्या परिवारातदेखील एक वेगळेच चैतन्य आणि उत्साह पसरतो. यावेळी असलेले वातावरण खूपच आनंदीमय, उत्साही असलेले आपण अनुभवलेच असेल.

अशा या लग्नात विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम असतात. मग त्यात हळद, साखरपुडा या गोष्टींचा समावेश होतो. अशावेळी हिंदू लग्न पद्धतीत Marathi Ukhane म्हणण्याची रीत अगदी जुनी आहे. लग्नात नवरदेव असो कि, नवरी असो किंवा एखादे नुकतेच लग्न झालेले नवीन जोडपे असो, या सर्वांना एखादा छान, सुंदर मराठी उखाणा घ्यावाच लागतो. मुली किंवा स्रिया यांच्या मराठी उखाणा अगदी तोंडपाठ असतो.

Marathi-Ukhane-for-Male
Marathi Ukhane for Male

जर कोणी अचानक उखाणा घ्यायला जरी सांगितला तरी मुली किंवा स्रिया गोंधळून जात नाही. परंतु मुले किंवा पुरुष यांच्या क्वचितच मराठी उखाणे तोंडपाठ असलेले आपणास पहावयास मिळते. ज्यावेळी कोणी असे म्हणते कि, एखादा उखाणा म्हणा...? त्यावेळी नवरदेव, मुले अगदी गोंधळून जातात. मात्र आता आपल्याला काहीही काळजी करण्याचे कारण नाही.

आम्ही याठिकाणी आपल्यासाठी खूपच सुंदर, छान आणि विशेष म्हणजे लक्षात राहण्यासाठी अगदी सोपे Navardevache Marathi Ukhane उपलब्ध करून दिलेले आहेत. हे सर्व मराठी उखाणे खूपच सुंदर आणि छान आहे. हे आपल्याला नक्कीच आवडतील अशी आम्हाला खात्री आहे.

Table of Contents

चला तर मग जाणून घेऊया नवरदेवासाठी मराठी उखाणे...

Marathi Ukhane for Male

भाजीत भाजी मेथीची,
 
............ माझ्या प्रीतीची.
💕💕💕💕💕

गाडीत गाडी डेक्कन क्वीन,

.......... आहे माझी ब्युटी क्वीन.
💕💕💕💕💕

भल्या मोठ्या समुद्रात छोटीशी होडी,

.......... ची आणि माझी, लाखात एक जोडी.
😘😘😘😘😘

हो-नाही म्हणता म्हणता

लग्न जुळले एकदाचे,

.......... मुळे मिळाले मला

सौख्य आयुष्यभराचे.
💖💖💖💖💖

एक होती चिऊ, एक होता काऊ,

...............चे नाव घेतो डोक नका खाऊ...
😀😀😀😀😀

सत्यनारायणाची पूजा जोडीने केली,

........... चं नाव घ्यायला खूप घाई झाली.
💘💘💘💘💘

उगवला सुर्य मावळली रजनी,

...............चे नाव सदैव माझ्या मनी...
💘💘💘💘💘

आकाशाच्या पोटात, चंद्र, सूर्य, तारांगणे,

............... च नाव घेतो, तुमच्या म्हणण्याप्रमाणे...
😘😘😘😘😘

प्रेमाच्या रानात नाचतो मोर,

.......... शी केलं लग्न, नशीब माझं थोर.
💘💘💘💘💘

ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल,

.................. चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.
💘💘💘💘💘

तसा मला काही शौक नाही

पहायचा क्रिकेट,

पण बघता बघता

.......... च्या प्रेमात पडली माझी विकेट.
😀😀😀😀😀

टोपलीत टोपली, टोपलीत भाज्या,

.......... माझी राणी, मी तिचा राजा.
😘😘😘😘😘

निळे पाणी, निळे आकाश, हिरवे हिरवे रान,

................. चे नाव घेतो ठेऊन सर्वांचा मान...
💘💘💘💘💘

काही शब्द येतात ओठातून,

....चं नाव मात्र येतं हृदयातून.
😘😘😘😘😘

सूर्याच्या किरणांचा प्रकाश पडला लख्ख

माझ्या वर ........................ चा पूर्णपणे हक्क...
💕💕💕💕💕

सितेने केला पण रामालाच वरीन,

.............. च्या साथीने आदर्श संसार करीन...
😘😘😘😘😘

श्रावण महिन्यात असतात खूप सण,

................... सुखात ठेवीन हा माझा पण.
💕💕💕💕💕

प्रेम म्हणजे, दोन मनांना जोडणारा पूल,

............... च्या बोलक्या डोळ्यांनी, घातली मला भूल.
😘😘😘😘😘

अस्सल सोने चोविस कॅरेट,

.................... अन् माझे झाले आज अरेंज / लव्ह मॅरेज.
😘😘😘😘😘

जाईच्या वेणीला चांदीची तार,

माझी .......... म्हणजे लाखात सुंदर नार.
💕💕💕💕💕

Navardevasathi Marathi Ukhane

कृष्णाला बघून राधा हसली,

............. माझ्या हृदयात बसली.
💘💘💘💘💘

कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास,

मी भरवितो .......... ला जलेबीचा घास...
😊😊😊😊😊

गोड मधुर आवाज करी श्रीकृष्णाची बासरी,

..............ला घेऊन जातो मी तिच्या सासरी.
😘😘😘😘😘

श्रावण महिन्यात दिसते इंद्रधनूची रंगत न्यारी,

................. च्या साथीसाठी केली लग्नाची तयारी...
💘💘💘💘💘

फुलांच्या तोरणात आंब्याचे पान,

.................च्या रूपाने झालो मी बेभान.
😘😘😘😘😘

हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोड़ी,

........................ च्या जीवनात मला आहे गोडी.
💖💖💖💖💖

एका वर्षात, महिने असतात बारा

.............. मुळे वाढलाय, आनंद सारा...!
💘💘💘💘💘

पुरणपोळीत तुप असावे साजुक,
 
............ आहेत आमच्या फार नाजुक.
😀😀😀😀😀

वेरुळची शिल्पे आहेत अप्रतिम सुंदर,

.................. आहे माझी सर्वात सुंदर.
💖💖💖💖💖

समुद्राचे पाणी लागते खूप खारे,

............. साठी तोडून आणेन मी चंद्र-तारे
😘😘😘😘😘

मोह नाही, माया नाही,

नाही मत्सर हेवा,

..............चे नाव घेतो,

नीट लक्ष ठेवा...
💖💖💖💖💖

मनी माझ्या आहे, सुखी संसाराची आस,

.......... तू फक्त, गोड हास.
😘😘😘😘😘

पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने-फुले,

............... च नाव घेतल्यावर चेहरा माझा खुले.
😘😘😘😘😘

ती सोबत असली की, खराब मूड होतो बरा.

.............. मुळे कळला, जगण्याचा आनंद खरा.
😘😘😘😘😘

गोऱ्या गोऱ्या गालावरती, तीळ काळा काळा.

................. च्या गोड हास्याचा, मला लागलाय लळा.
💖💖💖💖💖

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,

......... च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने...
😘😘😘😘😘

तुरीच्या डाळीला जिऱ्याची फोडणी,

बघता क्षणी प्रेमात पडलो .............. ची लाल ओढणी.
😀😀😀😀😀

छोटीशी तुळस, घराच्या दारी,

तुमची ................ हि आता माझी जबाबदारी.
💖💖💖💖💖

2 अधिक 2 होतात चार,

................. बरोबर करीन सुखी संसार.
😘😘😘😘😘

झुळूझुळू पाण्यात चाले हळूहळू होडी,

शोभून दिसते .............. आणि माझी जोडी.
💖💖💖💖💖

Ukhane for Male

रूप तिचे गोड, नजर तिची पारखी,

शोधूनही सापडणार नाही,

............... सारखी.
😘😘😘😘😘

सितेसारखे चरित्र, लक्ष्मी सारखं रूप,

......... मला मिळाली आहे अनुरूप.
💖💖💖💖💖

लहानसहान गोष्टींनीही, आधी व्हायचो त्रस्त,

................. आल्यापासून  झालंय, आयुष्य खूपच मस्त !
💘💘💘💘💘

नंदनवनात अमृताचे कलश,

.................आहे माझी खूप सालस.
😘😘😘😘😘

संसाररूपी सागरात पतिपत्नीची नौका,

चे नाव घेतो सर्वजण ऐका...........
😘😘😘😘😘

मन आहे निर्मळ, लक्ष्मी सारखं रूप,

................... माझी देखणी आहे खूप.
💘💘💘💘💘

एका वर्षात असतात महिने बारा,

........... च्या नावात सामावलाय आनंद सारा.
😘😘😘😘😘

प्रभू श्रीरामासाठी श्री हनुमान धावले,

............. च्या आयुष्यात टाकतो मंगलमयी पावले.
💖💖💖💖💖

दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला,

............. सारखी पत्नी मिळाली, आनंद झाला मला...
💘💘💘💘💘

आतून मऊ पण बाहेरून काटेरी साल,

................. दिसते खडूस पण मन मात्र तिच विशाल.
😀😀😀😀😀

तिची नि माझी केमिस्ट्री, आहे एकदम वंडरफुल...

.................. माझी आहे, खरच किती ब्युटीफुल...!
😘😘😘😘😘

.............. माझे पिता ............. माझी माता,

शुभमुहूर्तावर आणली ............ ही कांता.
😘😘😘😘😘

............. माझी आहे, सर्व कलांमध्ये कुशल,

तुझ्या येण्यानं झाला, दिवस एकदम स्पेशल.
💖💖💖💖💖

नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री,

.................. झाली आज माझी गृहमंत्री...
😘😘😘😘😘

मुद्दाम नाही करत, नकळत हे घडतं,

माझं मन रोज नव्याने .............. च्या  प्रेमात पडतं.
😀😀😀😀😀

उंच उंच आकाशात, पाखरांचे थवे,

.............. चे नाव, कायम ओठी यावे.
😘😘😘😘😘

चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण,

................ चे नाव घेऊन सोडतो कंकण...
💘💘💘💘💘

डोळ्यावरची बट, दिसते एकदम भारी,

................ माझी झाल्यापासून जळतात लोक सारी.
😀😀😀😀😀

सोन्याचा मुकुट, जरीचा तुरा,

............... माझी, कोहिनूर हिरा.
😘😘😘😘😘

कृष्णाच्या बासरीचा राधेला लागला ध्यास,

................ ला देतो मी लाडवाचा घास...
😘😘😘😘😘

हे देखील वाचा...

Ukhane in Marathi for Male

दवबिंदूनी चमकती, फुलांचा रंग,

सुखी आहे संसारात, ............... च्या संग.
💘💘💘💘💘

मोगऱ्याची कळी उमलली असता,

दरवळतो सर्वत्र सुगंध,

.............. च्या सोबतीत मिळेल जीवनाचा आनंद.
💖💖💖💖💖

Marathi-Ukhane-for-Groom
Marathi Ukhane for Groom

राधिकेला कृष्ण म्हणे हास राधे हास,

मी देतो ...................... ला लाडवाचा घास...
😘😘😘😘😘

मंथ एंड आला कि, भरपूर वाढते काम,

ऑफिसमध्ये बॉस आणि घरी

................ कटकट करते जाम.
😘😘😘😘😘

इंद्राची इंद्रायणी दुष्यतांची शकुंतला,

............... नाव ठेवले माझ्या प्रिय पत्नीला.
😘😘😘😘😘

सोन्याच्या कपावर चांदीची बशी,

.............. समोर फिक्या पडतील,

रंभा आणि उर्वशी.
😀😀😀😀😀

जगाला सुवास देत उमलली कळी,

भाग्याने लाभली मला ........................ प्रेमपुतळी...
💖💖💖💖💖

प्रेमाच्या ओलाव्याने, दुःख झाली कोरडी,

.............माझ्या जीवनी, चांदणे शिंपीत आली.
💘💘💘💘💘

गर गर गोल, फिरतो भवरा,

............... च नाव घेतो, मी तिचा नवरा.
😘😘😘😘😘

सायंकाळच्या आकाशाचा पिवळसर रंग,

..................... माझी नेहमी घरकामात दंग...
💖💖💖💖💖

एक दोन तीन चार,

............... वर आहे, माझे प्रेम फार.
😀😀😀😀😀

चांदीच्या पैठणीला सोन्याचा काठ,

................ चं नाव घेतो पुढचं नाही पाठ.
💖💖💖💖💖

देऊळाला खरी शोभा कळशाने येते,

................. मुळे माझे गृहसौख्य गुणावते.
😘😘😘😘😘

हत्तीच्या अंबारीला मखमली झुल,

..................... माझी जसे गुलाबाचे फुल...
😘😘😘😘😘

राधे शिवाय कृष्णाला नाही अर्थ,

............ शिवाय माझं सगळ जीवन व्यर्थ.
😘😘😘😘😘

मधाची गोडी आणि फुलांचा सुगंध,

.................. मुळे कळला मला, जीवनाचा आनंद.
💖💖💖💖💖

उभा होतो मळ्यात, नजर गेली खळ्यात,

माझ्या प्रेमाचा हार .................... च्या गळ्यात...
😘😘😘😘😘

रुप्याचे ताट, त्यावर सोन्याचे ठसे,

..................चे रूप पाहून चंद्र सूर्य हसे.
😘😘😘😘😘

कळी हसून फुल उमलले, मोहरून येईल सुगंध,

................... च्या संगतीत सापडला जीवनाचा आनंद.
💘💘💘💘💘

हे देखील वाचा...

Marathi Ukhane for Male Romantic

Ukhane-for-Male
Ukhane for Male

सोन्याची बरणी, भरली तुपाने,

लक्ष्मीच घरात आली, ................ च्या रूपाने.
😘😘😘😘😘

जीवन आहे एक अनमोल ठेवा,

................... आणते नेहमी सुकामेवा.
😀😀😀😀😀

गुलाबी प्रेमाने बनला, प्रेमाचा गुलकंद,

................ च्या नावातच, सामावलाय माझा आनंद.
😘😘😘😘😘

काय जादु केली, जिंकलं मला एकाक्षणात,

प्रथम दर्शनीच भरली ............... माझ्या मनात...
😘😘😘😘😘

जगाला सुवास देत उमलती कळी,

................ चं नाव घेतो .................. च्या वेळी.
💖💖💖💖💖

अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रुपाचा,

..................... ला घास घालतो वरण-भात-तुपाचा...
💘💘💘💘💘

खेळायला आवडतो, मला क्रिकेट गेम,

............... वर आहे माझे खूप प्रेम.
😘😘😘😘😘

चांदीच्या वाटीत साखरेचे खडे,

............. चं नाव घेतो देवापुढे.
😘😘😘😘😘

नभांगणी दिसे शरदाचे चांदणे,

................ चे रुप आहे अत्यंत देखणे.
😘😘😘😘😘

मुंबई-पुण्याच्या मध्ये आहे शहर लोणावळा,

........................ ला विचारतो मी "आती क्या खंडाला?"
😀😀😀😀😀

केशर-दुधात टाकले,

काजू, बदाम, जायफळ,

.............. च नाव घेतो,

पीडू नका वायफळ.
😀😀😀😀😀

श्रावणात पडतो पारिजातकांचा सडा.

................... ला आवडतो बटाटावडा.
😀😀😀😀😀

जंगलात पसरला, मोगऱ्याचा सुवास,

................. बरोबर करेन, प्रेमाचा प्रवास.
😘😘😘😘😘

देवापुढे मांडले, प्रसादाचे ताट,

........... मुळे मिळाली माझ्या, आयुष्याला वाट.
💘💘💘💘💘

आई-वडील, भाऊ बहिणी, जणू गोकूळासारखे घर,

.................... च्या आगमनाने पडली त्या सुखात भर.
💖💖💖💖💖

घर असावं नेहमी क्लीन अँड नीट,

.................. आहे माझी सिम्पल अँड स्वीट.
😀😀😀😀😀

असावी नेहमी हसतमुख ,बोलणे असावे गोड,

........................... च्या प्रीतीसाठी मन घेते ओढ.
😀😀😀😀😀

नवग्रह मंडळात शनीचं आहे वर्चस्व,

......................... आहे माझे जीवन सर्वस्व.
😘😘😘😘😘

देशभक्तांच्या त्यागामुळे स्वराज्य हाती आले,

...................... शी लग्न करुन मनोरथ पुर्ण झाले.
😘😘😘😘😘

तर मित्रांनो, आम्हाला खात्री आहे कि आम्ही आपल्यासाठी जे Marathi Ukhane for Male उपलब्ध करून दिलेले आहेत, ते आपल्याला नक्कीच आवडतील. आम्ही याठिकाणी महत्वपूर्ण असे मराठी उखाणे देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. आमचा हा प्रयत्न आपल्याला नक्कीच आवडेल, अशी आम्हाला खात्री आहे. जर आपणही उखाण्याच्या शोधात असाल तर हे उखाणे आपल्याला खूपच छान वाटतील.

जर आपल्याला हे मराठी उखाणे आवडले असतील तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा. जेणेकरून त्यांनादेखील याबद्दल माहिती मिळेल.

FAQ's -

मराठी उखाणे कोणकोणत्या प्रकारे आहेत?

मराठी उखाणे हे नवरदेवासाठी, नवरीसाठी, सण-समारंभासाठी अशा विविध प्रकारे असतात.

Marathi Ukhane हे कशासाठी उपयोगी येतात?

ज्यावेळी एखादा समारंभ असतो, विशेषतः लग्नकार्यात मराठी उखाणे हे आपल्याला उपयोगी येतात.

मला दर्जेदार आणि नवीन मराठी उखाणे कोणत्या ठिकाणी वाचावयास मिळतील?

नेट मराठी या संकेतस्थळावर आपल्याला दर्जदार आणि नवनवीन मराठी उखाणे वाचावयास मिळतील

मी हे मराठी उखाणे थेट कोणालाही पाठवू शकतो का?

हो. आपण हे मराठी उखाणे विविध सामाजिक माध्यमाद्वारे थेट कोणालाही पाठवू शकता. आम्ही आमच्या संकेतस्थळावर त्यासाठी विशेष व्यवस्था करून दिलेली आहे.