राजकारणातील मराठी विनोद | Rajkaran Jokes Marathi | Politics Jokes in Marathi

Share :

Rajkaran Jokes Marathi | Politics Jokes in Marathi – येथे आपण राजकारणात घडणारे धमाल विनोद वाचणार आहोत. आपल्याला हे धमाल विनोद नक्कीच आवडतील…

Rajkaran Jokes Marathi

आपल्यापैकी बहुतेक व्यक्तींना राजकारणात रस असणारच…! कारण आपल्या जिव्हाळ्याचा आणि कुतूहलाचा हा विषय आहे. परंतु या राजकीय जीवनात कधी कधी असे भन्नाट प्रसंग उद्भवतात, कि ज्यातून विनोदांची निर्मिती होते. असेच भन्नाट राजकारणातील मराठी जोक्स आपण याठिकाणी वाचणार आहोत. आम्हाला खात्री आहे कि, आपल्याला हे Rajkaran Jokes Marathi नक्कीच आवडतील…

Rajkaran-Jokes-Marathi
Rajkaran Jokes Marathi

Politics Jokes in Marathi


नवरा – जर मी नेता झालो ना,
तर आख्या देशाला बदलून टाकील…

बायको – जरा कमी पेत जा…
लुंगी समजून माझी साडी नेसली तुम्ही…
ती बदला आधी…!!!


20 – 25 तत्ववेत्ते हिमालयात जात होते…

एक न्यूज रिपोर्टर – तुम्ही सर्व लोक कुठे चालला आहात…?

तत्ववेत्ते – हिमालयात, समाधी घ्यायला…

न्यूज रिपोर्टर – पण का…?
असं काय घडलंय…!

तत्ववेत्ते – जेव्हापासून Whatsapp आलंय,
तेव्हापासून मोठ-मोठे ज्ञानी, तत्ववेत्ते पैदा होऊन राहिलेत,
आता संसाराला आमची काही गरज नाहीये…!


एक गोंधळलेला सर्वसामान्य नागरिक,

मला एक समजत नाहीये…

जे गरिबांच्या हक्कांसाठी लढत असतात,

ते लढता लढता श्रीमंत कसे काय होतात…!


शिक्षक एका नेत्याला…

शिक्षक – तुमचा मुलगा नापास झाला आहे
आणि
तुम्ही लाडू वाटून राहिलात…?

नेता – 100 विद्यार्थ्यांच्या वर्गात 60 विद्यार्थी
नापास झालेत,
मग बहुमत माझ्या मुलाकडून आहे ना…!


उमेदवाराने दिलेल्या पैशात 2 दिवसाचं
खाण भागलं,
पण
तो जिंकला तर 5 वर्ष जनतेला खाणार त्याच काय?

आपल्या देशात
सरकार स्थापन झाल्यावर
आणि
लग्न झाल्यावर सगळ्यांना
एकाच वर्षात खुशखबरी पाहिजे…

निवडणुका फक्त दोन चरणात होतात,

एक – निवडणुकीच्या अगोदर नेता जनतेच्या चरणात…

दोन – निवडणूक झाल्यावर जनता नेत्याच्या चरणात…


एक मतदार EVM समोर खूप वेळ
झाला तरी मतदान न करता उभाच होता…

पोलीस अधिकारी – काय झालं…
एवढा काय विचार करताय…?

तो म्हणाला – रात्री कोणी पाजली तेच लक्षात येत न्हाय…!


ज्योतिष – तुमच्या कुंडलीत खूप सारे धन आहे…

नेता – आता हे सांगा,
ते धन कुंडलीतून बँक खात्यात कसे ट्रान्स्फर करू…!


आचारसंहिता म्हणजे काय?

जनतेने नेत्यांच्या पाया पडणे बंद होऊन
नेते जनतेच्या पाया पडण्याच्या कालावधीला
आचारसंहिता असे म्हणतात…!


Rajkaran Jokes Marathi

तर मित्रांनो, आम्हाला खात्री आहे कि, आम्ही आपल्यासाठी जे Rajkaran Jokes Marathi | Politics Jokes in Marathi उपलब्ध करून दिलेले आहेत, ते आपल्याला नक्कीच आवडतील… 

जर हे मराठी विनोद आपल्याला आवडले असतील तर कृपया आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा.

महत्वपूर्ण सूचना – ❝सदर मराठी जोक्स आम्ही फक्त आणि फक्त मनोरंजन म्हणून उपलब्ध करून देत आहोत. त्यामागे कोणाची बदनामी करण्याचा आमचा कोणताही हेतू नाही.❞ alert-warning


Share :

Leave a Comment