Santa Banta Jokes in Marathi | संता बंता मराठी जोक्स

Share :

Santa Banta Jokes in Marathi – या लेखात आपण Santa Banta Marathi Jokes वाचणार आहोत. आपल्याला संता-बंताचे धमाल मराठी विनोद वाचायचे असतील तर येथे वाचा…

Santa Banta Jokes in Marathi

जर आपण संता-बंताचे धमाल मराठी विनोद शोधत असाल तर आपण अगदी योग्य ठिकाणी आला आहात. आम्ही याठिकाणी शेकडो दर्जेदार Santa Banta Marathi Jokes आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत, ते आपल्याला नक्कीच आवडतील, अशी आम्हाला खात्री आहे. निसर्गाने मानवाला दिलेली एक सर्वात अमूल्य देणगी म्हणजे “हास्य”. हेच हास्य आम्ही या  विनोदाच्या माध्यमातून आपल्या चेहऱ्यावर उमटवू इच्छितो…

Santa-Banta-Jokes-in-Marathi
Santa Banta Jokes in Marathi
बंता एका सॉफ्टवेअर कंपनीत इंटरव्ह्यू साठी जातो…

मॅनेजर  – ‘जावा’ चे चार व्हर्जन सांगा . . .?

बंता  – मर जावा
मिट जावा
लुट जावा
 सदके जावा

मॅनेजर – वेरी गुड . . तुम्ही आता घरी जावा . . !
😂😂😂😂😂😂

संता – यार…!
मी कोणतेही काम हाती घेतले कि
माझी बायकोच मधे येते…

बंता – मग तू ट्रक चालवून बघ…
बघू तुला नशीब साथ देतंय का…?
😂😂😂😂😂😂

बंता – काय रे तू तर डॉक्‍टरला भेटायला जाणार होता ना,
मग त्याचे काय झाले…?

संता – अरे यार उद्या जाईल,
आज थोडी तब्येत खराब आहे…!!!
😂😂😂😂😂😂

बंता – चुकी झाल्यावर माफी मागणाऱ्या माणसाला आपण काय म्हणू शकतो…?

संता – समजदार…

बंता – आणि चुकी नसताना माफी मागणाऱ्याला आपण काय म्हणू शकतो…?

संता – बॉयफ्रेंड…!!!
😂😂😂😂😂😂

बंता – तुझा डोळा सुजलेला का आहे…?

संता – अरे काल माझ्या बायकोचा वाढदिवस होता.
त्याच्यासाठी केक आणला होता,
त्यामुळे डोळा सुजला…!

बंता – म्हणजे मी नाही समजलो…?
केक आणण्याचा आणि डोळा सुजण्याचा काय संबंध…?

संता – अरे माझ्या बायकोचे नाव Kruti आहे…
पण केकवाल्याने तिचे केकवर नाव चुकवले…
Happy Birthday Kuti
😂😂😂😂😂😂

बंता – बायकोबरबरचं भांडण संपलं का?

संता – ती गुडघे जमिनीवर टेकवून माझ्यासमोर आली.

बंता – गुडघे टेकवून ती म्हणाली तरी काय?

संता – काही नाही,
ती एवढंच म्हणाली की
पलंगाखालून बाहेर या…
मी आता तुमच्यावर ओरडणार नाही…!!!
😂😂😂😂😂😂

संता ऑफिसात आला.
त्याचा बॉस नेहमीप्रमाणे ओरडला, ‘काय हे?’

संता एक काळा आणि एक पांढरा बूट घालून आला होता.

बॉसने फर्मावलं, आधी घरी जा आणि बूट बदलून ये.

संता केविलवाण्या सुरात उत्तरला, काय करू साहेब,
घरीपण एक काळा आणि एक पांढराच बूट आहे…!!!
😂😂😂😂😂😂

संताने एका मोठ्या कंपनीत मुलाखत दिली…

बॉस – अभिनंदन, तुमचे सिलेक्शन झाले आहे…
तुम्हाला यावर्षी 5 लाख रुपये वार्षिक पगार राहील,
आणि
पुढील वर्षी 10 लाख रुपये वार्षिक पगार राहील…

हे एकूण संता उठून जाण्यासाठी निघतो…

बॉस – काय झालं…?

संता – मग मी पुढच्याच वर्षी येतो…!
😂😂😂😂😂😂

संता – अरे यार, काल रात्री मी उशिरा घरी
पोहचलो तर बायकोने दरवाजाच नाही उघडला…
पूर्ण रात्रभर मला रस्त्यावरच झोपावं लागलं…

बंता – मग सकाळी तरी बायकोने दार उघडलंच असंन ना…?

संता – अरे नाही यार, सकाळी ज्यावेळेस माझी उतरली,
त्यावेळेस लक्षात आलं कि माझं लग्नच झालेलं नाही
आणि
चावी माझ्याच खिशात होती…!!!
😂😂😂😂😂😂

संता एकदा बायकोच्या ऑफिसमधे गेला,
बघतो तर काय, बायको बॉसच्या मांडीवर बसली होती,

संता ( भडकुन ) : चल अश्या ऑफिसमधे
काम करून काय फायदा,

जिथे स्टाफला बसायला साध्या खुर्च्यापण नाहीत…!!!
😂😂😂😂😂😂

Santa Banta Marathi Jokes

संता – कुत्रा लग्न का करीत नाही?

बंता – तो ऑलरेडीच कुत्र्याच जीवन जगत असतो म्हणुन…!!!
😂😂😂😂😂😂

संताला तीन चार लोक मारत असतात.
तेवढ्यात तेथे संताचा साडू येतो…

संता – मला मारलं ते मी सहन करीन,
पण
जर माझ्या साडूला कोणी हात जरी लावला
तरी माझ्यासारखा वाईट कोणी नाही…!

त्या लोकांनी संताच्या साडूलादेखील बदड बदड बदडलं…

संताचा साडू – अरे, तू तर मार खातच होतास ना…!
मग मला का मार बसवलास…?

संता – कारण तू सासुरवाडीला जाऊन मी मार खाल्लेला सांगू नये म्हणून…
😂😂😂😂😂😂

बंता  – आरे छान मोबाईल आहे!
कधी घेतलास ?

संता – घेतला नाही जिंकला आहे!
धावण्याच्या शर्यतीत..

बंता – स्पर्धा…….!!!
कोण कोण होतं स्पर्धेत???

संता – मोबाईलच्या दुकानाचा मालक, पोलीस आणि मी..! “”
😂😂😂😂😂😂

संता – यार, तुमची मिठाईची दुकान आहे,
तुला पण यातलं काहीतरी खावं वाटत असेल ना…!

संता – हा, ना, यार…
पण वडील रसगुल्ले मोजून जातात…
म्हणून मी फक्त चोखून ते परत ठेवून देतो…!!!
😂😂😂😂😂😂

संता समोसा उघडून त्यातील फक्त मसालाच खात असतो…

बंता – अरे…! तू असं काय करत आहेस…?

संता – अरे मी आजारी आहे,,,
त्यामुळे डॉक्टरने मला बाहेरचे खाण्याची मनाई केली आहे…!
😂😂😂😂😂😂

डॉक्टर (संताला) – सांगण्यास वाईट वाटतंय कि,
तुमची एक किडनी फेल झाली आहे…!

हे ऐकल्यावर संता खूप रडतो…

मग तो शांत होऊन डॉक्टरला विचारतो…
किती गुणांनी…?
😂😂😂😂😂😂

संताने एक नवीन कलर टीव्ही आणला
आणि
पाण्यात टाकून बघू लागला…

बंता – हे काय करतोस?

संता – चेक करतोय कि,
कलर तर उडत नाहीये ना…
कारण सध्या ग्यारंटी आहे…
😂😂😂😂😂😂

संता पोलिसात भरती होतो…

एकदा तो पोलीस इन्स्पेक्टरला फोन लावतो…

संता – साहेब, इथं एका महिलेने आपल्या
पतीला गोळी मारून त्याचा खून केलाय…!

पोलीस इन्स्पेक्टर – का…?

संता – तिने पुसलेल्या फरशीवरून तो चालत गेला, म्हणून…

पोलीस इन्स्पेक्टर – मग त्या महिलेला अटक केली का नाही…?

संता – नाही… अजून फरशी थोडीशी ओली आहे…!!!
😂😂😂😂😂😂

बंता – लहानपणी मी आईचे ऐकले असते,
तर माझ्यावर ही वेळ आली नसती…

संता – काय बोलायची तुझी आई?

बंता – जर ऐकलेच नाही तर मला काय माहीत ती काय बोलायची…!!!
😂😂😂😂😂😂

बंता – काय झालं…? खूपच उदास आहेस…?

संता – अरे यार, माझ्या वडिलांनी माझा बदला घेतला…!

बंता – ते कसं…?

संता – जेव्हा मी छोटा होतो, तेव्हा वडिलांनी मला
दिलेली परीक्षा फी मी पिक्चर पाहण्यासाठी उडवायचो…

बंता – मग…?

संता – आता मी वडिलांना चार धामच्या यात्रेसाठी पैसे दिले होते,
वडील गोव्याला जाऊन आले…!!!
😂😂😂😂😂😂

मुलाखत घेणारा – समजा एकाच रुळावरून 2 ट्रेन येत असतील तर काय करशील.

संता – मी रेड सिग्नल दाखवेल..

मुलाखत घेणारा – आणि सिग्नल नसेल तर?

संता – मी टोर्च दाखवेल..

मुलाखत घेणारा – आणि टोर्च नसेल तर?

संता – मी माझा लाल शर्ट काढून दाखवेल..

मुलाखत घेणारा – आणि शर्ट जर लाल नसेल तर?

संता – मी माझ्या मामांच्या मुलीला बोलवेल..

मुलाखत घेणारा – काय? मामाच्या मुलीला? ते कशासाठी?
        .
संता – तिने कधी 2 ट्रेन ची टक्कर पहिली नाहीये…
😂😂😂😂😂😂

एका समुद्रात जहाज बुडत असत…

संता – इथून जमीन किती लांब आहे ?
बंता – एक किलोमीटर…

संता लगेच पाण्यात उडी मारतो
संता – कुठल्या बाजूला

बंता – खालच्या…!!!
😂😂😂😂😂😂

बंता (फोनवर) – ओये, संता
तुझा हॉटेलचा व्यवसाय कसा चाललायं…?

संता – काही विशेष नाही…!

बंता – अरे मी एकदा दोनदा तुझ्या हॉटेलवर
आलो होतो, पण त्याला तर कुलूप लावलेलं होते.

संता – अरे, यार तू एकतर लंच नाहीतर डिनरच्या वेळेस आला असशील…
त्यावेळेस आम्ही घरी जेवायला जात असतो…!!!
😂😂😂😂😂😂

संता (नोकराला) – अरे जरा बाहेर पहा बर,
सूर्य उगवला का नाही ते…?

नोकर – पण बाहेर तर अंधार आहे…!

संता – अरे मग टॉर्च लावून पहा ना…
कामचोर कुठला…!!!
😂😂😂😂😂😂

एकदा संता 1 एप्रिलला सीटी बसमधे कंडक्टरकडून
5 रुपयाचे टिकीट विकत घेतो
आणि
तो कंडक्टरला म्हणतो, एप्रिल फुल…

”कसे काय?” कंडक्टरने विचारले.

कारण माझ्याजवळ ऑल रेडी बसचा पास आहे…!!!
😂😂😂😂😂😂

संताची गर्लफ्रेंड संताला – इतकी जोरात गाडी नको पळवू…
मला भिती वाटतेय..

संता – अरे जर तुलाही भिती वाटत असेल,
तर माझ्यासारखे डोळे बंद करून घे…!!!
😂😂😂😂😂😂

तीन जणांना फाशी देत असतात.

पहिल्याला फाशी देताच त्याच्या दोरीची गाठ सुटते
आणि तो पाण्यात पडतो, पोहून तो बाहेर येतो…

दुसऱ्याला देखील फाशी देताना असचं घडत.
तो देखील पोहून पाण्यातून बाहेर येतो…

आता संताला फाशी देणार असतात…

संता जल्लादाकडे पाहून म्हणतो…
“अरे चांगलं बांध, मला पोहता येत नाहीये…!!!
😂😂😂😂😂😂

संता – डॉक्टर मला जेवण केल्यावर भूक लागत नाही,
झोपून उठल्यावर झोप येत नाही ,
काय करू?

डॉक्टर – रात्री उठून उन्हामध्ये बसत जा,
सगळ ठीक होईल…!!!
😂😂😂😂😂😂

संता मित्राच्या पार्टी मध्ये ड्रिंक घेत उभा होता,

एवढ्यात त्याच लक्ष एका सुंदर मुलीकडे गेल,

संता – तू माझ्या बरोबर डान्स करशील का?

मुलगी (तुच्छतेने) – मै बच्चे के साथ डान्स नही करती….

संता – ओह्ह… माफ कर हा,
मला माहित नव्हतं तू प्रेग्नन्ट आहेस…!!!
😂😂😂😂😂😂

एका वर्तमानपत्रात जाहिरात होती –
“जुना मोबाईल द्या आणि नवीन घ्या…”

संता हि जाहिरात वाचून त्या पत्त्यावर जातो…
तिथं कोणतेच दुकान नसते, पण दोन माणस उभे असतात.

संता त्यांना विचारतो, हि जाहिरात तुम्हीच दिलीये का…?

तेवढ्यात ते दोघे पिस्तुल काढून संताच्या डोक्याला लावतात
आणि
म्हणतात, – जाहिरात आम्हीच दिली होती,
“आता जुना मोबाईल द्यायचा आणि जावून नवीन घ्यायचा…!!!”
😂😂😂😂😂😂

Santa Banta Jokes

संता एकदा इंटरव्ह्यू देत असतो…

मुलाखत घेणारा – ‘ मायक्रोसोफ्ट एक्सेल ‘ काय आहे???

संता – सर्फ एक्सेल चा प्रॉडक्ट जो कॉम्प्यूटर धुण्यासाठी उपयोगी येतो…!!!
😂😂😂😂😂😂

संता रिक्षावाल्याला…
संता – सदाशिव पेठेत येतोस का…?

रिक्षावाला – चाळीस रुपये होतील…?

संता – दहा रुपये देईल…!

रिक्षावाला – दहा रुपयात कोण येणार…?

संता – मागे बस… मी नेतो…!
😂😂😂😂😂😂

संताचा रेडिओ खराब होतो…
तो रेडिओ खोलून पाहतो,
तर त्यात एक उंदीर मरून पडलेला असतो…

संता – अरे यार…
रेडिओ चालणारच कसा…?
साला सिंगरच मेलाय…!!!
😂😂😂😂😂😂

संता-बंताच्या गाडीचा अपघात होतो…

बंता – मी तुला “हेडलाईट” दाखवून सांगितले होते ना,
बाजूला हो म्हणून…

संता – अबे, साले,
मग मी पण तुला “वाईपर” चालू करून,
नाही म्हणून सांगितले होते ना…!!!
😂😂😂😂😂😂

संता आणि बंता दोघेही एका पार्टीत गुपचूप घुसतात
आणि मस्तपैकी जेवण हाणायला सुरुवात करतात…

तितक्यात त्यांना कोणतरी विचारत…
तुम्ही कोण…?

संता – आम्ही मुलाकडची आहोत…

हे ऐकल्यावर सगळेजण त्यांना खूप मारतात
आणि बाहेर काढतात…

कारण ते लग्न नसत तर वाढदिवसाची पार्टी असते…
😂😂😂😂😂😂

संता – डॉक्टरसाहेब, 2 वर्षापूर्वी मला ताप आला होता…

डॉक्टर – मग… काय…?

संता – काही नाही, तुम्ही त्यावेळेस म्हणाला होता,
कि
अंघोळ नका करू म्हणून…!
आता केली तर चालेल कि नाही,
हे विचारायला आलो होतो… सहजच….!!!!
😂😂😂😂😂😂

एक प्रवासी रेल्वेतून उतरला…
त्याने संताला विचारले – हे कोणते स्टेशन आहे…

हे ऐकताच संता मोठमोठ्याने हसायला लागतो
आणि
त्या प्रवाशाला म्हणतो,
अरे पागल, हे रेल्वे स्टेशन आहे…

संता हॉस्पिटलमध्ये आहे…
😂😂😂😂😂😂

संता दारू पिऊन एका बसमध्ये चढला…
ते बघून एक साधू संताला म्हणाले – मुला, तू नरकाच्या वाटेवर चालला आहेस…

हे ऐकताच संता मोठ्याने ओरडला – ओये, थांब… थांब…
मी चुकीच्या बसमध्ये चढलोय…!!!
😂😂😂😂😂😂

ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत,

त्या नष्ट करण्याचा आधिकार आपल्याला नाही.संता कम्प्युटर कंपनीत नोकरीसाठी इंटरव्ह्यू द्यायला येतो…

मुलाखत घेणाऱ्यांनी विचारलं,
”तुम्हाला एमएस ऑफिस माहिती आहे का?”

संता म्हणाला
तुम्ही फक्त पत्ता द्या, मी बरोबर जातो…!
😂😂😂😂😂😂

एकदा संता आणि त्याच्या बायकोचं जोरदार भांडण सुरु असते…

मग बायको लुंगी आणून त्याच्या अंगावर फेकते…

बायको – बदला लुंगी…

संता (घाबरून) – हे तू मराठीत बोललीस का हिंदीत…???
😂😂😂😂😂😂

संता बँकेत पैसे जमा करायला गेला…

कैशिअर – तुमच्या सर्व नोटा नकली आहेत…

संता – मग तुम्हाला काय अडचण…
खात्यात तर माझ्याच जमा करतोय ना…!!!
😂😂😂😂😂😂

संताची गर्लफ्रेंड – हिप्नोटाईझ करणे म्हणजे काय…?

संता – एखाद्या व्यक्तीला आपल्या नियंत्रणात करून
त्याच्याकडून हवे ते काम करून घेणे…!

गर्लफ्रेंड – चल खोटारडा कुठला…!
याला तर बॉयफ्रेंड म्हणतात…!
😂😂😂😂😂😂

संता दारू पिऊन घरी जातो…
बायकोला कळू नये म्हणून तो Laptop उघडतो
आणि
काहीतरी टाईप करण्याचे नाटक करतो…

बायको – आज तुम्ही परत दारू पिऊन आलात ना…?

संता – नाही, अजिबात नाही…!

बायको – मग हि सुटकेस उघडून काय करताय…!
😂😂😂😂😂😂

संता – कार्डीओलॉजिस्ट आणि गब्बरसिंग यांच्यात काय साम्य आहे…?

बंता – नाही माहिती…

संता – ते दोघेही बोलतात,
तुम्ही मीठ खाल्ले आहे…
आता गोळी खा…!!!
😂😂😂😂😂😂

भिकारी – फक्त 5 रुपयांचा प्रश्न आहे बाबा…

संता – ठीक आहे, विचारा,
आला तर आला मला…!!!
😂😂😂😂😂😂

संता कार धुवत असतो…
तेवढ्यात शेजारून एक काकू चाललेल्या असतात,
त्या संताला विचारतात – कार धूत आहेस का…?

संता (चिडून) – नाही, पाणी देत आहे,
तेवढीच झाली तर झाली मोठी…!!!
😂😂😂😂😂😂

संताला संशोधक म्हणून नोकरी मिळते.

कुठलीही गोष्ट घडली की
त्यातून काही ना काही निष्कर्ष काढून,
हा मोकळा होत असे.

एकदा तो एका धरणावर फिरायला गेलेला असतो.
त्याचवेळी तिथे एक घटना घडते.

एक व्यक्ती पाण्यात उडी मारते,
पण बराच वेळ झाला तरी बाहेर काही येत नाही.
मग दोन व्यक्ती उड्या मारतात, पण त्याही बाहेर येत नाहीत.

यावरून संता असा निष्कर्ष काढतो की,
माणूस पाण्यात विरघळतो…!!!
😂😂😂😂😂😂

संताची बायको – माझ्या आईचं ऐकलं असत आणि
तुम्हाला लग्नाला नकार दिला असता,
तर मी सुखी झाले असते…!

संता – काय सांगतेस काय…?
तुझ्या आईचा आपल्या लग्नाला विरोध होता…?

बायको – हो…

संता – अरे देवा…
आणि मी त्या माउलीला वाईट समजत होतो…!
😂😂😂😂😂😂

मास्तर – सांगा पाण्यापेक्षा हलके काय आहे…?

संता – सर… भजी…

मास्तर – ते कसं काय…?

संता – सर तेल पाण्यावर तरंगते…
आणि भजी तेलावर…
😂😂😂😂😂😂

संता एका डॉक्टरकडे जातो…

डॉक्टर – बोला काय होतय…

संता – काही नाही ओ डॉक्टर
खूप झोप लागते…

डॉक्टर – हे घ्या, स्मार्टफोन, याच्यात Whatsapp, Facebook
इंस्टाल करून दिले आहे.
आता तुम्ही बरे व्हाल…
म्हणजे तुम्हाला झोप नाही येणार…!!!
😂😂😂😂😂😂

Jokes in Marathi Santa Banta

संता – आज मी बायकोला वाचमैन बरोबर
पिक्चर बघायला जाताना पाहिले.

बंता – मग तू त्यांच्या मागे नाही गेलास?

संता – नाही यार,
तो पिक्चर मी पहिलेच बघितला आहे…!!!
😂😂😂😂😂😂

बंताचे वडील – काय रे तुझ्या वर्गात सगळे पास झाले का…?

बंता – हो, आम्ही सगळे पास झालो
पण,
आमच्या बाई मात्र नापास झाल्या…!

बंताचे वडील – काय…! त्या कसं काय नापास झाल्या…?

बंता – हो, त्या अजूनही त्याचा वर्गाला शिकवत आहेत…
😂😂😂😂😂😂

संता – अरे यार काल मी एका माणसाला समुद्रातून बुडत असताना बाहेर काढले…

बंता – मग पुढे काय झालं…?

संता – मग मी परत त्याला समुद्रात टाकले…

बंता – अरे तू असे का केले…?

संता – आपल्याकडे ती म्हण आहे ना, नेकी कर दरिया मे डाल…
😂😂😂😂😂😂

रस्त्याने पायी चालणाऱ्या संताला एक स्कुटी चालवत असलेली
मुलगी धडक देते व ती मुलगी पडते…
हे पाहताच लोक संताला खूप मारतात…

मुलगी – अहो त्यांना मारू नका, हे माझं रोजचच काम आहे.
मी स्कुटी चालवायला शिकत आहे…

(लोक फरार आहेत आणि संता त्यांना शोधत आहे….)
😂😂😂😂😂😂

काल मला 10 जणांनी खूप मारला..

संता – मग तू काय केलास?

बंता – मी म्हटलं,
साल्यानो दम असेल तर एक एक जण या…

संता – मग?

बंता – मग काय,
साल्यांनी एके ऐकाने येऊन परत मारलं…!!!
😂😂😂😂😂😂

संताचा शेजारी मरण पावतो…
संता त्याच्या घरी जातो,
आणि
तिथे असणाऱ्यांना विचारतो…
“बॉडी आलीये का…?”

तेवढ्यात अँब्युलन्स बॉडी घेऊन येते…

हे पाहून संता खुश होतो आणि म्हणतो – अरे वा…
आताच आपण बॉडीविषयी बोलत होतो,
आणि बॉडी लगेच आली,
मरणार नाही साला लवकर…!!!
😂😂😂😂😂😂

बंता – अरे संता, तू तुझे लग्न का मोडलेस…?

संता – अरे तिचा कोणी बॉयफ्रेंड नव्हता…

बंता – अरे मग चांगले होते कि…?

संता – काय चांगले…?
जी आजपर्यंत कोणाचीच झाली नाही…
ती माझी काय होणार…!!!
😂😂😂😂😂😂

संता – घ्या… लाईट गेली…

बंता – लाईट गेली तर काय झालं…?
खूप गरम होतंय राव. पंखा तर चालू कर…?

संता – तू परत मूर्खासारख बोललास!
पंखा लावला तर मेणबत्ती विझणार नाही का…!
😂😂😂😂😂😂

संता – काय करतोस…

बंता – IPL बघतोय…

संता – मी नाही बघत ते IPL…

बंता – पण का…?

संता – त्याच्यात INDIA नेहमीच हरते…!

बंता – फोन ठेव आणि छोटा भीम लाव…!!!
😂😂😂😂😂😂

संताच्या आजोबाचे निधन होते…
त्यांची अंतिमयात्रा चाललेली असते.

बंता – काय झाले…?
मरण पावले कि काय…?

संता – नाही… नाही…
त्यांना घरात करमत नव्हते…
त्यामुळे बाहेर थोडसं फिरवून आणतो…
नॉनसेन्स कुठला…!!!
😂😂😂😂😂😂

संता – बंता जंगलात गेले होते…

समोरून अचानक वाघ आला…

संतानं प्रसंगावधान राखून गुरकावणाऱ्या वाघाच्या डोळ्यांत चपळाईनं
माती फेकली
आणि
तो बंताला म्हणाला, ”पळ पळ बंता!”

बंता हसत उत्तरला,
”मी का पळू? माती तू फेकलीयेस त्याच्या डोळ्यांत!!!!”
😂😂😂😂😂😂

संताची आई – अरे बाळा, लवकर घरी ये…
सुनबाईला अटॅक आला आहे वाटत…
तिच तोंड वाकड, डोळे वर आणि मान वाकडी झालीय…

संता – आई तू घाबरू नकोस,
ती सेल्फी काढत असेल…
😂😂😂😂😂😂

गर्दीत चालता चालता संताचा धक्का एका मुलीला लागतो…

संता – ओह Sorry…

मुलगी (रागाने) – डोळे फुटलेत का…?

संता मग घाबरून थोडेसे लांब होतो…

तेवढ्यात एका देखण्या तरुणाचा त्या मुलीला धक्का लागतो…
तो मुलगा Sorry म्हणतो…

मुलगी (लाजत) – इट्स ओके….

संता – बहुतेक माझ्या Sorry चं स्पेलिंग चुकलं असेल…
😂😂😂😂😂😂

संता, बंता आणि गुरमीत तिघे स्कूटरवरून सुसाट वेगाने चाललेत.

अचानक ट्रॅफिक पोलिसाची नजर त्यांच्यावर पडते.
तो वैतागून शिट्टी वाजवतो.

बंता त्याला सांगतो. अरे वेडा आहेस काय…?

आधीच तिघे बसलोत. त्यात तुला कुठे बसवणार?
😂😂😂😂😂😂

मुलगी लाडात येऊन – तू जहा-जहा चलेगा,
मेरा साया साठ होगा,,,

संता – मला तरी शंका  आलीच होती,
कि
तू भूत आहेस ते…!!!
😂😂😂😂😂😂

संता खूप मोठमोठ्याने रडत असतो…

बंता – काय झालं…? का रडत आहेस…?

संता – अरे काय करू???
ज्या मुलीला विसरायचा प्रयत्न करतोय,
तिच नावच आठवत नाहीये…!!!
😂😂😂😂😂😂

एकदा संता बंताला स्वत:च्या घरी बोलावतो,

जेव्हा संता बंताच्या घरी जातो तेव्हा ,
बंताच्या घराला टाळे लावलेले असते
आणि
तिथे लिहुन ठेवलेले असते”

तुझा पोपट झालाय , चल फूट इथून ”

संता खाली पड्लेला खडु उचलतो
आणि
लिहितो

“मी आलोच नव्हतो “…
😂😂😂😂😂😂

बंता एका सुंदर मुलीला विचारतो,
तुम्ही कुठे राहता…?

मुलगी – एम.जी. रोड

बंता – एवढ्या सुंदर असूनही तुम्ही रस्त्यावर राहता…!!!
😂😂😂😂😂😂

संता त्याच्या गर्लफ्रेंडला…

संता – मला तुझे दात खूपच आवडतात…

गर्लफ्रेंड – अय्या… खरच. का रे…?

संता – कारण पिवळा हा माझा आवडता कलर आहे…
😂😂😂😂😂😂

संता – मी एकदा सु-सु करायला बाथरूममध्ये गेलो तर तिथे एक वाघ बसला होता…

बंता – मग पुढे काय झालं…?

संता – काही नाही, मी त्याला म्हटलं, तुमचा निवांत होऊ द्या…
मला तर चड्डीतच झाली आहे…
😂😂😂😂😂😂

Santa Banta Jokes in Marathi

मित्रांनो आम्हाला खात्री आहे कि, आम्ही जे संता बंता मराठी विनोद आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत, ते आपल्याला नक्कीच आवडतील…

जर आपल्याला हे आवडले असतील तर कृपया आपल्या मित्र-मैत्रीणीना अवश्य शेअर करा.

अशाच प्रकारच्या मराठी जोक्ससाठी वेळोवेळी www.Netmarathi.com या वेबसाईटला भेट द्या…


Share :

Leave a Comment