Trending Jokes in Marathi | नवीन चर्चित विषयावरील ट्रेण्डिंग मराठी जोक्स

Share :

Trending Jokes in Marathi | Viral Jokes in Marathi – येथे आपल्यासाठी नवीन चर्चित विषयावरील मराठी जोक्स आम्ही उपलब्ध करून दिले आहेत. वाचून शेअर करा…

आपले चेहऱ्यावरील हसू आपल्या चेहऱ्याला एक वेगळेच सौंदर्य प्रदान करते. त्यामुळे सतत हसतमुख राहा. नेहमी आनंदी आणि प्रसन्न असणारी व्यक्ती हि उद्यानातील कारंजासारखी असते. ज्याप्रमाणे कारंजाच्या थंड थंड शिदकाव्यानी मनुष्य शहारून जातो आणि प्रसन्न होतो, त्याप्रमाणे हसतमुख असणाऱ्या व्यक्तीच्या सानिध्यात इतर व्यक्तीदेखील आनंदित होतात. त्यामुळे हसत राहा आणि आम्ही उपलब्ध करून दिलेले मराठी जोक्स वाचत राहा.

Trending Jokes in Marathi


पुण्य

आता तुम्ही हात धुणारच आहात तर,
हाताबरोबरच दोन दोन भांडी पण
घासत जा…!

तेवढीच बायकोला कामात थोडी मदत केल्याच पुण्य…!

😂😂😂😂😂


युवा

 
देशातील युवा वर्ग आता जागा झालाय…!
.
.
.
.
तो आता उठणार, ब्रश करणार
आणि
Whatsapp ओपन करणार…!!! 

😂😂😂😂😂


ग्रीन टी
 
आलेल्या पाहुण्यांना ग्रीन टी पाजण्याचे फायदे
.
.
.
.
.
.
ते आपल्याला मॉडर्न समजतात.
दुधाचा खर्च वाचतो
आणि
त्यासोबत बिस्किटंदेखील द्यावी लागत नाही.
😂😂😂😂😂

हळद
अंगाला हळद लावायच्या वयात,
पोरांना काढ्यातून
हळद प्यावी लागतेय…!
कोरोना…
कुठ फेडशील रे हे पाप…!
😂😂😂😂😂

मोबाईल
या लॉकडाऊनच्या काळात प्रत्येकाने
आपला मोबाईल जपून वापरा…
मोबाईल बिघडला, पडला, फुटला तर
दुरुस्त नाही होणार…
मग आयुष्याच वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही…
😂😂😂😂😂

टीप
हॉटेलमध्ये जेवण झाल्यावर
बायको: अहो, वेटरला काहीतरी टिप द्या.
.
.
.
.
नवरा: लग्न करू नको रे बाबा…!!!
😂😂😂😂😂

कलिंगड
कलिंगड विकणाऱ्या पोराला विचारले,
का रे बाळा, कलिंगड देण्यापूर्वी ते थापट्या मारून काय बघतोस?

ते म्हणालं – काय नाय,
आमच्या सिनिअरनी सांगितलंय दोन कलिंगड वाजवून बाजूला ठेवायची,
तिसरं द्यायचं…

कस्टमर इम्म्प्रेस होतंय…!!!

😂😂😂😂😂

शिंक
पूर्वी शिंक आली कि
लोक बोलायचे, “बघ सत्य आहे…”

आता शिंकलो कि लगेच बोलतात…
“उठ इथून…”

😂😂😂😂😂

आवड
जगाला काय आवडते ते नका करू…
तुम्हाला जे आवडत ते करा…!
आणि
.
.
.
.
मार खा…!
😂😂😂😂😂 


स्वप्न
आता झोप पण एवढी झाली आहे,
स्वप्न तर पडत आहेत,
पण
त्याच्यासोबत जाहिरातीपण दिसायला लागल्यात…!
😂😂😂😂😂

बायपास
 
कार्डिओलॉजिस्ट – तुमचे तीन ब्लॉक आहेत.

पेशंट – तीन नाही, चार आहेत…
एक कोथरूडला, दुसरा लोणावळ्याला,
तिसरा तळेगावला आणि चौथा चिंचवडला…

कार्डिओलॉजिस्ट – त्यातला एक विकायला काढा…
परवा बायपास आहे तुमची…

😂😂😂😂😂

भोळा
 
पत्नी – तुम्ही फारच भोळे आहात…!
तुम्हाला कोणीही सहज वेड्यात काढेल.

पती – सुरुवात तर तुझ्या बापाने केली…!

😂😂😂😂😂

ग्रामपंचायत
मी – हे देवा, मी आपल्यातले “परके”
आणि
परक्यातले “आपले” कसे ओळखू…?

देव – ग्रामपंचायतीला उभा रहा…!

😂😂😂😂😂

जाम भारी
एक मुलगा देवाला – तिला गुलाबाच फुल का आवडतं?
ते तर एका दिवसात मारून जाते…!
मग मी तिला का नाही आवडत…?

मी तर तिच्यासाठी रोजच मरत असतो…

देव – एकदम भारी रे…!
एकच नंबर, Whatsapp वर टाक.

😂😂😂😂😂

मूर्ख
मूर्ख असल्याचे सिद्ध करण्याची संधी प्रत्येकाला मिळते.
.
.
.
.
काही जण त्यातही घाई करतात…!
😂😂😂😂😂

पाणी
मुलगा – बाबा 1 ग्लास पाणी द्या ना…

बाबा – स्वतः उठून घे…!

मुलगा – बाबा द्या ना प्लीज…

बाबा – आता थोबाडीत मारीन तुझ्या…

मुलगा – बाबा थोबाडीत मारायला याल ना,
तेव्हा पाणी घेऊन या…!

😂😂😂😂😂

थंडी
थंडीत चेहऱ्याला पावडर लावली की
.
.
.
.
“खारा शेंगदाणा” झाल्यासारखं वाटतं…!
😂😂😂😂😂

आय लव्ह यु
बंड्या मुलीला – आय लव्ह यु…

मुलीने बंड्याच्या खाडकन कानाखाली ठेवून दिली
आणि
म्हणाली, “काय बोललास”…

त्याच क्षणी बंड्यानेही त्या मुलीच्या कानाखाली खाडकन ठेवून दिली,
आणि
म्हणाला, “ऐकलं नाही मग, मारलस कशाला…! 

😂😂😂😂😂

लग्न
माकडाची मुलगी म्हणाली – पप्पा मला लग्न करायचं आहे?

माकड म्हणाले – बाळा, थोडा धीर धर,
तुझा होणारा नवरा मेसेज वाचतोय,,,
वाचून हसला कि, लग्न पक्के समज…!

😂😂😂😂😂

लेडीज सीट
कंडक्टर – लेडीज सीटवर का बसला आहेस?

मुलगा – फेसबुकवर माझे नाव प्रिया आहे.

😂😂😂😂😂

एक काम
दोन मित्र फोनवर बोलत असतात,

पहिला मित्र – काय करतोय…

दुसरा मित्र – काही नाही, एकदम निवांत…

पहिला मित्र – अरे एक काम होते…

दुसरा मित्र – बऱ अगोदर काम कर, मग निवांत बोलूया…!

😂😂😂😂😂

आचारसंहिता
आचारसंहिता म्हणजे काय?

जनतेने नेत्यांच्या पाया पडणे बंद होऊन
नेते जनतेच्या पाया पडण्याचा जो कालावधी असतो,
त्याला आचारसंहिता असे म्हणतात…

😂😂😂😂😂

मलम
काकांचा पाय मुरगळला.

काका – (काकुना), अग, शेजाऱ्याकडून मलम आण ना…!

काकू – नाही, म्हणतायत ते…

काका – वा रे वा…! यांना काही शेजारधर्म आहे कि नाही?

काकू – जाऊ द्या, मी आपल्याकडच मलम काढते…!

😂😂😂😂😂

झोप
सर्वसामान्य माणसाला किती झोप आवश्यक आहे?
.
.
.
.
अलार्म वाजल्यावर तो बंद करून फक्त
पाच मिनिटे अजून…!
😂😂😂😂😂

डेटा
जर दिवसाला तुम्हाला 1.50 GB डेटा पुरत नसेल,
तर
.
.
.
.
याचा अर्थ
तुम्ही भयंकर बेरोजगार आहात…!
😂😂😂😂😂

 आराम
 
आराम करून करून थोडसं थकलोय…
.
.
.
.
विचार करतोय,
थोडा वेळ आराम करू.
मग उठून परत आरामात आराम करणार…!
😂😂😂😂😂

भाववाढ
पेट्रोल-पंपावर लाईन मध्ये सर्वात
शेवटी उभे असणारे पंत जोरात ओरडले….
.
.
.
.
पेट्रोल जरा लवकर सोडा…
नाहीतर माझा नंबर येईपर्यंत भाव वाढतील…!
😂😂😂😂😂

इमानदारी
नोकर – साहेब मला केराच्या टोपलीत
शंभराच्या पाच नोटा सापडल्या, ह्या घ्या.

मालक – मीच फेकून दिल्या होत्या, नकली आहेत त्या…

नोकर – म्हणूनच परत करीत आहे…!

😂😂😂😂😂

कोरोना
कोरोना हा नाक आणि तोंडातून
प्रवेश करतो…
त्यामुळे
.
.
.
.
नको तिथे नाक खुपसू नका
आणि
नको तिकडे तोंड मारू नका…!
😂😂😂😂😂

टेन्शन
 
अजिबात टेन्शन घेऊ नका,
फक्त तुमचीच नाही,
तर
.
.
.
.
सगळ्यांचीच वाट लागली आहे…!
😂😂😂😂😂

टाका 20 चं
 
तो आला…
थांबला…
लाजला…
आजूबाजूला पाहिलं…
अन,
हळूच बोलला, – 20 च टाका…!

गाडीच्या माग लिहील होत,
सरकार फक्त आमचच…!

😂😂😂😂😂

हसली
रम्या – बघ, ती मुलगी माझ्याकडे बघून हसली.

गण्या – साहजिकच आहे,
मी पण तुला पहिल्यांदा बघितलं तेव्हा तीन दिवस हसत होतो.

😂😂😂😂😂

विरुद्धार्थी शब्द
शिक्षक – व्हॅलेंटाईनचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

विद्यार्थी – क्वारंटाईन…

शिक्षक – ते कसं काय?

विद्यार्थी – व्हॅलेंटाईनमध्ये दोन व्यक्ती एकमेकांना चिटकून बसतात,
आणि
क्वारंटाईन मध्ये एकमेकांपासून दूर बसतात…

😂😂😂😂😂

खुश राहायचा मंत्र
खुश राहायचं असेल तर समोरच्याच
सगळे बोलण एकूण घ्यायचं…
आणि
मनातल्या मनात म्हणायचं…
.
.
.
.
येडच आहे…!
😂😂😂😂😂 


विश्वास
विश्वास म्हणजे काय?

उद्याचा दिवस आपण बघणार कि नाही,
याची खात्री नसतानाही आपण 28 दिवसाचा नेटपॅक टाकतो…
काही जण तर 84 दिवसांचा टाकतात…
.
.
.
.
अतिआत्मविश्वास…! 

😂😂😂😂😂

अवघड आहे
जेव्हा वाटत आता सर्व काही ठीक चाललंय,
त्याच वेळी,
.
.
.
.
हेडफोन एका बाजूने चालायचा बंद होतो…!
😂😂😂😂😂

निषेध
चीनचा निषेध म्हणून
मी चीनी मातीचा कप फोडला…
तर
.
.
.
.
आईने मला फोडला…!
😂😂😂😂😂

भिकारी
ती आपली होणार नाही,
तरी तिच्या DP कडे,
भिकाऱ्यासारखे बघणे म्हणजे प्रेम…!
😂😂😂😂😂

निगेटिव्ह
तुम्ही आयुष्यात कितीही Positive असला
तरी
.
.
.
.
सध्या तुमचा रिपोर्ट Negative
येण गरजेच आहेत…
😂😂😂😂😂

कुकर
आयुष्य कुकर सारखं असाव…
वरून प्रेशर आणि खालून आग लागलेली असली
तरी…
.
.
.
.
शिट्ट्या मारत जगावं…!
😂😂😂😂😂

नशीब
DSLR तुमचं तोंड तर चमकावेल…
पण,
त्या दळभद्री
नशिबाच काय…! 
😂😂😂😂😂

Trending Jokes in Marathi

तर मित्रांनो आम्हाला खात्री आहे कि, आम्ही आपल्यासाठी जे नवीन चर्चित विषयावरील मराठी जोक्स उपलब्ध करून दिलेले आहेत, ते आपल्याला नक्कीच आवडतील. हे विनोद आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा.

Trending-Jokes-in-Marathi
Trending Jokes in Marathi

असेच मराठी विनोद वाचण्यासाठी वेळोवेळी www.Netmarathi.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या.


Share :

Leave a Comment