Amazing Facts in Marathi About Life – या लेखात आपण मानवी जीवनाशी संबंधित काही रोचक, मजेदार तथ्य जाणून घेणार आहोत, हे रोचक तथ्य आपल्याला नक्की आवडतील.
Amazing Facts in Marathi About Life
नमस्कार मित्रांनो, या लेखात आपण मानवी आयुष्याशी संबंधित काही रोचक तथ्य जाणून घेणार आहोत, जे शक्यतो आपल्याला माहिती नसतील. आपल्यापैकी बहुतेक लोक आपल्या आयुष्याशी संदर्भात अशा काही गोष्टी जाणून नसतील कि ज्या आपल्याला हैराण करतील. अशाच तब्बल 25 पेक्षाही अधिक तथ्यांचा आम्ही येथे समावेश केला आहे.
मित्रांनो आपल्या सर्वाना हे माहितच आहे कि, आपण आयुष्यभर अशा काही गोष्टी करतो कि, त्या करत असताना आपल्याला त्याबद्दल काहीही माहिती नसते. ज्यावेळी आपण या गोष्टी जाणून घेतो, त्यावेळी आपल्याला त्याबद्दल निश्चितच आश्चर्य वाटते.
 |
Amazing Facts in Marathi About Life |
चला तर मग जाणून घेऊया अशीच काही Amazing Facts in Marathi About Life
एक मनुष्य अन्नाशिवाय तब्बल 2 महिन्यापेक्षाही अधिक काळ जिवंत राहू शकतो,परंतु झोपेशिवाय तो 11 दिवसापेक्षा अधिक काळ राहू शकत नाही.
एक मनुष्य त्याच्या संपूर्ण जीवनकाळात तब्बल 35 टन अन्न खातो.
एक सर्वसाधारण मनुष्य त्याच्या संपूर्ण जीवनकाळात जवळपास 1,20,000 किमी पायी चालतो.
एक पुरुष त्याच्या संपूर्ण आयुष्यभरातील जवळपास 1 वर्ष फक्त महिलांना बघण्यातच 😉 खर्च करतो.
तुम्हाला हे जाणून तर आश्चर्य वाटेल कि मनुष्य खात असलेला मध कधीही खराब होत नाही.
एक मनुष्य त्याच्या संपूर्ण जीवनकाळात 50 लाख वेळेस श्वास घेतो.
एक पुरुष त्याच्या जीवनकाळातील तब्बल 6 महिने दाढी करण्यात खर्च करतो.
एक मनुष्य त्याच्या संपूर्ण आयुष्यात जवळपास 2.50 लाख वेळेस जांभई देतो.
फक्त एक सिगरेट पिल्याने मनुष्याचे जीवन सरासरी 11 मिनिटांनी कमी होते.
रात्री 7 तासापेक्षा कमी झोप हि आपले आयुष्य कमी करते.
एका संशोधनानुसार 70 लाख व्यक्तींमध्ये फक्त एक व्यक्तीच 110 वर्ष जगू शकते.
सर्वसाधारणपणे महिला एका दिवसात 3 वेळेस खोटे बोलतात तर पुरुष हे 6 वेळेस खोटे 😯 बोलतात.
इतर महिन्यांच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक बालके जन्म घेतात.
एलियन पृथ्वीवर आहेत, यावर अमेरिकेतील 5 पैकी 1 व्यक्ती विश्वास ठेवतो.
आपली त्वचा हि संपूर्ण जीवनकाळात 900 पेक्षाही अधिक वेळेस स्वतः त बदल घडवून आणते.
हे वाचून तर तुम्हाला आश्चर्य वाटेल कि, एक मनुष्य त्याच्या संपूर्ण आयुष्यभरातील जवळजवळ 3 महिने टॉयलेटमध्ये व्यतीत करतो.
मनुष्य त्याच्या संपूर्ण जीवनकाळात 5 ते 6 लाख वेळेस हसतो.
महिला एका दिवसात सर्वसाधारण 20,000 शब्द बोलतात तर पुरुष फक्त सर्वसाधारण 7000 शब्द बोलतात.
पुरुषांपेक्षा महिलांचे आयुष्य हे सरासरी जास्त असते.
ज्यांचे मित्र अधिक असतात, असे लोक इतर लोकांहून अधिक काळ जिवंत राहतात.
जगभरात जितके लोक नाहीत त्याच्या पेक्षाही अधिक सूक्ष्मजीव मनुष्याच्या शरीरावर वास करतात.
आपण स्वप्ने तर पाहतो परंतु ते कोठून सुरु होते, हे आपल्याला आठवत नाही.
मनुष्य त्याच्या जीवनकाळातील 6 वर्ष हे फक्त स्वप्न बघण्यातच खर्च करतो.
आपण आपल्या संपूर्ण जीवनकाळात इतकी लाळ तयार करतो कि त्यातून 2 स्विमिंग पूल भरतील.
स्वप्नात पाहिलेल्या प्रत्येक व्यक्तीचा चेहरा हा आपण संपूर्ण आयुष्यात पूर्वी एकदातरी पाहिलेला असतो.
एक सर्वसाधारण मनुष्य त्याच्या संपूर्ण जीवनकाळात इतका पायी चालतो कि त्यामुळे पृथ्वीचे 5 चक्कर पूर्ण होतील.
तर मित्रांनो हे होते काही मानवी जीवनाशी संबंधित मजेदार तथा रोचक तथ्य. आम्हाला पूर्णपणे खात्री आहे कि, हे रोचक तथ्य आपल्याला नक्कीच आवडतील व याच्या वाचनाने आपल्या नक्कीच भर पडेल.
जर हि माहिती आपल्याला आवडली असेल तर आपण ती आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील मानवी जीवनाशी संबंधित हे रोचक तथ्य माहिती होतील.