100+ Funny Jokes for Whatsapp in Marathi, SMS | भरपूर हसवणारे मराठी जोक्स

Share :

Funny Jokes in Marathi – या लेखात आपण भरपूर हसवणारे काही Funny Jokes in Marathi for Whats app, Friends वाचणार आहोत. हे जोक्स आपल्याला नक्की आवडतील.

Funny Jokes in Marathi for Whatsapp

मित्रांनो नमस्कार, आज या लेखात आम्ही आपल्यासाठी असे काही सुंदर आणि मजेदार मराठी जोक्स उपलब्ध करून देणार आहोत कि, जे वाचून आपण लोटपोट होऊन हसाल. हे Marathi Jokes आपले टेंशन, ताणतणाव कुठच्याकुठे पळून लावेल…!

Funny-Jokes-in-Marathi-for-Whatsapp
Funny Jokes in Marathi for Whatsapp

मित्रांनो आपल्या सर्वाना हे माहितच असेल कि निसर्गाने मानवाला हास्याची खूप मोठी आणि कशाचीही तुलना न करता येण्याजोगी देणगी दिलेली आहे. परंतु सध्याच्या ताणतणावाच्या आणि धावपळीच्या युगात आपण हसणे जवळपास विसरलोच कि काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Table of Contents

आपल्या चेहऱ्यावर काही काळासाठी का होईना थोडेसे हास्य खुलावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे भन्नाट आणि अतिशय मनोरंजक मराठी विनोद आपल्यासाठी उपलब्ध करून देत आहोत. जे आपल्याला नक्की आवडतील अशी आम्हाला खात्री आहे.

चला तर मग सुरु करूया…

Funny Jokes in Marathi for Whatsapp

बंड्या – चलते चलते युही रुक जाता हु मै,
बैठे बैठे युही खो जाता हु मै,
क्या यही प्यार है?

बंड्याची मैत्रीण – बावळट, अशक्तपणा आलाय तुला…!
दुसरे काही नाही.

नवरा तिच्या गरोदर बायकोला दवाखान्यात घेऊन जातो.
तेवढ्यात एक माणूस विचारतो – तुमची बायको आहे काय?

नवरा – हो…!

माणूस – प्रेग्नंट आहेत काय?

नवरा (चिडून) – नाही नाही…
कोण म्हणाले…! तिने तर फुटबॉल गिळलाय…!
निघ xxxxxx

देव – मी तुझ्यावर प्रसन्न आहे. काय पाहिजे…?

गण्या – पैशांनी भरलेली Bag, नोकरी आणि
एक मोठ्ठी गाडी ज्यामध्ये खूप सुंदर मुली असतील.

देव – तथास्तु
(गण्या आता कंडक्टर आहे)

पोलीस – काय रे कुठे चाललाय एवढ्या रात्री…?

बंड्या – प्रवचन ऐकायला…

पोलीस – कोणत्या विषयावर प्रवचन आहे…?

बंड्या – दारूपासून होणारे दुष्परिणाम

पोलीस – एवढ्या रात्री कोण देत प्रवचन…?

बंड्या – माझी बायको…

एक कटू सत्य

नॉर्मल माणूस वडापाव खातो, मग तोच
आजारी पडला कि हॉस्पिटलमध्ये Apple खातो.

आणि

त्याचे नातेवाईक बाहेर उभे राहून वडापाव खातात.

लोक बोलतील असं कर
तसं कर
पण तुम्ही
    .
    .
येड्यागतच करायचं…!

भले तुम्ही जिमला जाऊन
कितीही बॉडी बनवा…
    .
    .
शाम्पूची पुडी दातांनीच फोडावी लागते.

पूर्वी दोघांचे भांडण सुरु झाले तर
तिसरा सोडवायला जायचा…
आता
    .
    .
तिसरा त्या भांडणाचा व्हिडिओ बनवतो.

नवी नवरी सासूच्या पाया पडते.
सासू – सुखी राहा.

सून – तुम्ही राहू देणार का?

विशेष सूचना
कोरोना हा नाक आणि तोंडाद्वारे प्रवेश करतो.

त्यामुळे
नको तिथे नाक खुपसू नका
आणि
नको तिकडे तोंड चालवू नका.

Jokes in Marathi Text

दोन मित्र फोनवर बोलत असतात.
पहिला – Hallo भाई काय करतोस…?

दुसरा – मस्त रे एकदम, काय म्हणतोस…?

पहिला – अरे एक काम होते.

दुसरा – हा कर मग,
थोड्या वेळाने निवांत बोलू.

मूर्ख असल्याचे सिद्ध करण्याची संधी प्रत्येकाला मिळते.
काही जण त्यातही
घाई करतात.

कृपया माझ्या शांततेला माझी कमजोरी समजू नका.
मी मनातल्या मनात पण शिव्या देतो.

पूर्वी मी खूप कष्टाळू होतो.
आता
कष्ट टाळू झालोय…

नवरा – किती काम करशील.
आपण तुझ्यासाठी एक कामवाली ठेवू.

बायको – अजिबात नाही.
आठवत नाही का…?
मी सुद्धा तुमच्याकडे कामवालीच होते.

बायको – नेहमी माझं अर्ध डोक दुखत राहते.
वाटतंय डॉक्टरला दाखवायला हवं…

नवरा – अरे त्यात काय दाखवायचं…!
जितकं आहे तितकंच दुखणार ना…!

बस्स…! तेव्हापासून नवऱ्याचे संपूर्ण अंग दुखत आहे.

आज मी हेल्मेट घातल्यामुळे वाचलो.
मित्राच्या गाडीवर मैत्रिणीला घेऊन फिरत होतो.
सिग्नलला थांबलेलो असताना शेजारी सासू आणि बायको
एका रिक्षात येऊन थांबले.
सिग्नल सुटेपर्यंत काय हाल झाले म्हणून सांगू…!
खरंच हेल्मेटचा लई फायदा होतो मित्रांनो…

च्यायला
जेव्हापासून सरकारी नोकरी लागली आहे,
तेव्हापासून
    .
    .

प्रत्येक मुलीचा बाप सासराच दिसतोय.

एक लडकी को देखा तो ऐसा लगा.

दुसरी लडकी को देखा तो वैसा लगा.
पर
    .
    .
जब दोनो ने थप्पड मारा तो एक जैसा लगा.

पेपरमध्ये प्रश्न होता.
शास्रीय कारणे द्या.
डोक्यावर पांघरून घेऊन झोपू नये.

एकाने उत्तर लिहिले…
कारण कोण झोपलंय ते कळत नाही.
मास्तरांनी बदाबदा बडवला.

घरात बायकोने फरशी पुसल्यावर असं
चालावं लागतंय
जस काय
    .
    .
आतंकवाद्यांनी बॉम्ब पुरवून ठेवलेत.
तुझे ते मंद हसणे
तुझे ते मंद लाजणे.
तुझे ते मंद आवाजात बोलणे.
तुझे ते मंद चालणे…

मंद कुठली…!
(प्रियकर दवाखान्यात आहे)

तीन उंदीर गप्पा मारत असतात.
पहिला – मी विषारी गोळ्या आरामात चघळतो.
दुसरा – मी पिंजऱ्यातील पनीर आरामात खाऊन बाहेर येतो.

तिसरा लगेच उठतो आणि जायला लागतो,
पहिला आणि दुसरा विचारतात,
काय झालं कुठ चालला…?

तिसरा – आलोच, मांजरीचा कीस घेऊन…

मेंदू हा 24 तास काम करत असतो.
फक्त तो दोन वेळाच बंद पडतो.
एक परीक्षेच्या वेळी आणि
दुसरे
    .
    .
बायको पसंत करताना…!

हे बघ,
माणसाचे “केस गेलेले” असले तरी चालतील.
पण
माणूस हा “गेलेली केस” असू नये.

बायको (लाजत) – अहो सांगा ना, मी तुम्हाला किती आवडते…?

नवरा – खूप खूप खूप आवडते गं…!

बायको – असं नाही, खूप खूप म्हणजे किती सांगा ना…?

नवरा – म्हणजे इतकी आवडते कि, असं वाटत
तुझ्यासारख्या 5-6 अजून कराव्यात…

(नवरा बिचारा दोन दिवसापासून उपाशी आहे)

च्यायला
कधी कधी तर असं वाटतंय
माझ्या जिंदगीत
कोणीतरी झोपेच्या
गोळ्या मिसळल्यात…!
नुस्ती झोप…

डॉक्टर – तुझे तीन दात कसे तुटले…?

रुग्ण – बायकोन दगडासारखी भाकरी तयार केली होती.

डॉक्टर – मग खायला नकार द्यायचा ना…?

रुग्ण – तेच तर केलं होत.

भक्त – देवा,
मी पापी आहे.
मला दुःख द्या.
दर्द द्या. मला बरबाद करून टाका.
माझ्यामागे भूत सोडा…

देव – नाटक का करतोयस…!
सरळ सरळ सांग ना, तुला बायको पाहिजे.

जेव्हा तुम्ही रडत असता,
तेव्हा कोणी नाही बघत.

जेव्हा तुम्ही चिंतीत असता,
तेव्हा कोणी नाही बघत.

जेव्हा तुम्ही संकटात असता,
तेव्हादेखील कोणी नाही बघत…

पण फक्त एक दिवस एखाद्या पोरीबरोबर फिरायला निघाले तर,
आख्खा गाव आणि शहर बघतो.

Group Admin ला मराठी शब्द…
    .
    .
“टोळी मुकादम”.

Jokes in Marathi Language

एक भिकारी देवाला म्हणतो…
हे देवा मला खाण्यासाठी असं काहीतरी दे जे,
खाल्ल्यावरसुद्धा संपले नाही पाहिजे…

देव – हे घे पूर्ण एक चिंगम…

नवरा – माझ्या छातीत खूप दुखायला लागलंय…
ताबडतोब अँब्युलंसला फोन लाव…

बायको – हो लावते, तुमच्या मोबाईलचा
पासवर्ड सांगा बर…!

नवरा – राहू दे, थोडं बर वाटतंय आता…!

आलेल्या पाहुण्यांना ग्रीन टी पाजण्याचे फायदे
    .
    .
ते आपल्याला मॉडर्न समजतात.
दुधाचा खर्च वाचतो
आणि
त्यासोबत बिस्किटंदेखील द्यावी लागत नाही.

पोलीस – तू गंपूचे पैसे चोरलेत हे तुला मान्य आहे का?

चोर – मी चोरले नाही…?
त्यानेच त्याच्या हाताने मला काढून दिले…

पोलीस – कधी…?

चोर – जेव्हा मी त्याला बंदूक दाखवली तेव्हा.

आजचा सुविचार

जो मित्र तुम्हाला त्याच्या मोबाईलचा
पॅटर्न लॉक सांगतो,
    .
    .
त्याच्या मैत्रीवर कधीही शंका करू नका…!

डॉक्टर – बाई, तुमच्या नवऱ्याच्या सगळ्या टेस्ट झाल्यात
आणि
सगळेच रिपोर्ट नॉर्मल आले आहेत…
काही कळतच नाहीये,
यांना नेमकं काय झालंय ते…?

बाई (काळजीच्या सुरात) – अहो डॉक्टर साहेब, ते
पोस्ट मार्टम का काय असत, ते तरी करून पहा एकदा…!!!

(पेशंट फरार आहे…)

रुम‬ वर राहणारे मुले भांडी तो पर्यंत धूत नाहीत .
    .
    .
जो पर्यंत ‪चहा‬ कढईत बनवायची वेळ येत नाही…!!!

तलवार पास होने से कुछ नहीं होता,

तलवार चलाना भी आना चाहीये…

असे status टाकणारे पोर डॉक्टरने
इंजेक्शन काढले की,

मोठमोठ्याने रडतात…!!!

माझे काही मित्र एवढे रिकामटेकडे आहेत

कि,

बसल्या बसल्या

मुंग्यांचा रस्ता अडवून बोलतात…

आता कुठून जातेस बघतोच…!!!

नोकरीला लागलेला मित्र
आणि
लग्न झालेली मैत्रीण
    .
    .
हात केला तर फक्त हसून जातात.
पण थांबत नाही…
आता हा लॉकडाऊन इतकही वाढवू नये कि,
आमचे काही बेवडे मित्र घरीच दारू बनवायला
सुरु करतील.

दुनियेतील सर्वात अवघड काम
म्हणजे
बिनडोक्याचे मित्र सांभाळणे.

खोटं बोलायलाची पण काही लिमिट असते राव…

काल एकाला उधारी मागण्यासाठी
घरच्या लँडलाईन वर फोन केला,

तर तो म्हणतो,

“अरे यार, थोडा वेळाने फोन कर…
मी आता गाडी चालवतोय…..”

आत्ता like ,Comment सुद्धा
लग्नाच्या आहेरा प्रमाणे झाली आहे…
    .
    .
तु दिली तरच मी देणार…!!!

फक्त मोबाईलाच माहीत असतं,
की,
    .
    .
आपला मालक काय गुणांचा आहे…!!!

खरं सांगा…

व्हिडिओ कॉल केल्यावर आपण
    .
    .
स्वतःलाच जास्त बघतो…!!!

एकदा नवरा बायको डिस्कव्हरी बघत असतात.

चॅनेलवर म्हैस दिसते…

नवरा – ती बघ तुझी नातेवाईक

बायको
– अय्या… सासूबाई .

बायको तिच्या मैत्रिणीला – अग काल दिवसभर नेट चालत नव्हते…

मैत्रीण – मग काय केले…?

बायको – काही नाही ग, नवऱ्याबरोबर गप्पा मारत होते.
चांगला वाटला ग स्वभावाने…

एक मित्र आपल्या पिकनिकसाठी
मित्रांना स्मशानभूमीत घेऊन जातो…

सगळे मित्र – ऐ आम्हाला कुठ घेऊन आलास्?

मित्र – अरे वेडयांनो, “लोक मरतात ” इथं यायला !!!

आज तर माणुसकीवरून विश्वासच उडाला माझा…

ज्या मित्राच्या लग्नात आम्ही,
आया है राजा, लोगो रे लोगो…
वर नाचलो होतो…

तोच मित्र आज भांडी घासत होता…

Marathi Vinod

बायको – तुम्ही काल खूप प्यायला होता.

नवरा – नाही गं.

बायको – तुम्ही नळापाशी बसून म्हणत होता,
रडू नको सगळं ठीक होईल…..

बायकोमुळे त्रासून गेलेला नवरा त्याच्या घरच्या

कुत्र्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलतो…

तुझ्यात आणि माझ्यात फक्त दोन पायांचा
फरक आहे…!!!

नवरा – साजणी, तुझ्या केसांच्या मखमली
जाळ्याला सांभाळत जा ग जरा…

बायको (लाजत) – तुम्ही पण ना…
इश्श…

नवरा – आई शप्पथ…
जर पुन्हा जेवणात तुझा केस सापडला ना,
तर साजणीवरून गजनी बनवून टाकेल तुला…

तीन मित्र बोलत असतात…

पहिला मित्र – माझ्या बायकोन जुडवा पिच्चर बगीतला
आणि
तिला जुडवा पोर झाली…

दूसरा मित्र – व्हय र, माझ्यापण बायकोन
3 इडीयट बगीतला तिला 3 पोर झाल्यात…

हे ऐकूण तीसरा मित्र पळत सुटतो….

बाकीचे दोघे -अरे कुट पळतोयस…?

तिसरा मित्र – आमची खुळी अब तक छप्पन बघायला गेलीये…!!!

माणूस – साहेब माझी बायको हरवलीय ….

हे बघा हे पोस्ट ऑफिस आहे,
पोलिस स्टेशन नाही…

तक्रार द्यायला पोलीस स्टेशन मध्ये जा ….

माणूस – च्यायला, आनंदाच्या भरात कुठे जाऊ तेच कळत नाही…..

भावनिक पोस्ट…..
    .
बायको घरी नसली की घर खायला उठत..

आणी

मग घाबरलेला जीव प्यायला बसतो….

एका मित्राने मला दहा हजार रुपये मागितले…

मी म्हटलो – पैसे तर नाहीत पण तु माझ्याकडून
तेवढ्या पैशाची अपेक्षा ठेवली…
लय, बरं वाटल.

नवरा – (खूप संतापून) फोन का नाही उचलला?
    .
    .
बायको – (चिडून) मी रिंगटोनवर नाचत होते…

नवरा – जर मी नेता झालो ना,
तर आख्या देशाला बदलून टाकील…

बायको – जरा कमी पेत जा…
लुंगी समजून माझी साडी नेसली तुम्ही…
ती बदला आधी…!!!

20 – 25 तत्ववेत्ते हिमालयात जात होते…

एक न्यूज रिपोर्टर – तुम्ही सर्व लोक कुठे चालला आहात…?

तत्ववेत्ते – हिमालयात, समाधी घ्यायला…

न्यूज रिपोर्टर – पण का…?
असं काय घडलंय…!

तत्ववेत्ते – जेव्हापासून Whatsapp आलंय,
तेव्हापासून मोठ-मोठे ज्ञानी, तत्ववेत्ते पैदा होऊन राहिलेत,
आता संसाराला आमची काही गरज नाहीये…!

बंता – बायकोबरबरचं भांडण संपलं का?

संता – ती गुडघे जमिनीवर टेकवून माझ्यासमोर आली.

बंता – गुडघे टेकवून ती म्हणाली तरी काय?

संता – काही नाही,
ती एवढंच म्हणाली की
पलंगाखालून बाहेर या…
मी आता तुमच्यावर ओरडणार नाही…!!!

बॉस – ऑफिसला का नाही आलास?
पाउस तर थांबला होता.

गण्या – ते News वाले सांगत होते,
कोठेही जाऊ नका, बघत रहा…

डॉक्टर (संताला) – सांगण्यास वाईट वाटतंय कि,
तुमची एक किडनी फेल झाली आहे…!

हे ऐकल्यावर संता खूप रडतो…

मग तो शांत होऊन डॉक्टरला विचारतो…
किती गुणांनी…?

संता पोलिसात भरती होतो…

एकदा तो पोलीस इन्स्पेक्टरला फोन लावतो…

संता – साहेब, इथं एका महिलेने आपल्या
पतीला गोळी मारून त्याचा खून केलाय…!

पोलीस इन्स्पेक्टर – का…?

संता – तिने पुसलेल्या फरशीवरून तो चालत गेला, म्हणून…

पोलीस इन्स्पेक्टर – मग त्या महिलेला अटक केली का नाही…?

संता – नाही …अजून फरशी थोडीशी ओली आहे…!!!

एका समुद्रात जहाज बुडत असत…

संता – इथून जमीन किती लांब आहे ?
बंता – एक किलोमीटर…

संता लगेच पाण्यात उडी मारतो
संता – कुठल्या बाजूला

बंता – खालच्या…!!!

एक प्रवासी रेल्वेतून संताला विचारतो – हे कोणते स्टेशन आहे…

हे ऐकताच संता मोठमोठ्याने हसायला लागतो

आणि

त्या प्रवाशाला म्हणतो,
अरे पागल, हे रेल्वे स्टेशन आहे…

(संता हॉस्पिटलमध्ये आहे…)

काल मला 10 जणांनी खूप मारला..

संता – मग तू काय केलास?

बंता – मी म्हटलं,
साल्यानो दम असेल तर एक एक जण या…

संता – मग?

बंता – मग काय,
साल्यांनी एके ऐकाने येऊन परत मारलं…!!!

संता खूप मोठमोठ्याने रडत असतो…

बंता – काय झालं…? का रडत आहेस…?

संता – अरे काय करू???
ज्या मुलीला विसरायचा प्रयत्न करतोय,
तिच नावच आठवत नाहीये…!!!

एक दारुड्या लोळून गाणी म्हणत असतो.
     
मग तो उलटा होऊन परत गायला सुरुवात करतो.

शेजारून चाललेला एक माणूस – हे काय?

दारुड्या – कॅसेटची दुसरी बाजू लावलीय…

पेशंट – डॉक्टर साहेब , तुम्ही सांगितल्या पासून दारू पित नाही ,
फक्त कोणी आग्रह केला तरच घेतो ?????

डॉक्टर – हे कोण तुमच्या बरोबर ?

पेशंट – ह्यालाच ठेवलाय आग्रह करायला…!!!

Funny Marathi Jokes

मित्राला भेटण्यासाठी हॉस्पिटल मध्ये गेलो तर तो म्हणतो…

दर्द दिलो के कम हो जाते
    .
    .
अगर…
    .
    .
सफरचंद के बदले गाय छाप ले आते…!!!

शिक्षक: “मी तुझा जीव घेईन”
याच इंग्रजीत भाषांतर कर…

पप्पू – ते इंग्रजी गेलं उडत…
तुम्ही हात तरी लाऊन बघा…

शाळेत इंग्लिश चे लेक्चर चालू असते.
मास्तर – गण्या “It” केव्हा वापरतात?
गण्या – घर बांधताना…!
(लई चोपला मास्तरांनी)

पेशंट – डॉक्टर, तुम्ही दिलेलं औषध कुठेच मिळालं नाही.

डॉक्टर – अरेच्चा… मी औषधाच नावच लिहायला विसरलो…
हि तर माझी सही आहे…!

डॉक्टर – तुमच्या पतीस विश्रांतीची गरज आहे.
मी झोपेच्या गोळ्या लिहुन देतो.

पेशंटची पत्नी – किती वेळा देऊ.

डॉक्टर – देऊ नका. तुम्ही घ्यायच्यात…!!!

एका चॅनेलवर एका कार्यक्रमात विचारलेला प्रश्न :-
मुलगी – माझं वय अठरा वर्षे आहे.
माझा रंग गोरा आहे.
माझी त्वचा खुप मुलायम आणि नाजुक आहे.
मी रात्री काय लावुन झोपू?
    .
    .
डॉक्टरांचा सल्ला – दाराची कडी.

मोलकरिण – बाईसाहेब तुमच्या मुलाने मच्छर खाल्ले…

बाईसाहेब – माझ तोंड काय बघतेस डॉक्टरला बोलाव…

मोलकरिण – आता घाबरण्याचे कारण नाही बाईसाहेब…
मी त्याला All Out पाजले आहे…!!!

एका माणसाला डॉक्टर साहेबांची मजा घ्यायची हुक्की येते.
तो दवाखान्यात जातो.

माणूस – डॉक्टरसाहेब, तुम्हाला टाके घालता येतात का?

डॉक्टर – हो येतात की… कशाला घालायचे आहेत?

माणूस – ही घ्या चप्पल.
हिचा बंद तुटलाय, जरा टाके घालून द्या.

डॉक्टर – निघ… xxx

किती सुंदर होते ते लहानपणीचे दिवस…

फक्त दोन बोटे जोडली कि,

“दोस्तीला पुन्हा सुरुवात व्हायची…”

आता क्वार्टर पाजल्याशिवाय दोस्ती होतच नाही…

माजले साले दूसर काही नाही…!!!

आता झोप पण एवढी झाली आहे,
स्वप्न तर पडत आहेत,

पण

त्याच्यासोबत जाहिरातीपण दिसायला लागल्यात…!

मी – हे देवा, मी आपल्यातले “परके”
आणि
परक्यातले “आपले” कसे ओळखू…?

देव – ग्रामपंचायतीला उभा रहा…!

रात्री माझ्या डोक्यात फक्त
एकच विचार येतो…
    .
    .
चादरीत वार कुठून येतंय…!!!

कंडक्टर – लेडीज सीटवर का बसला आहेस?

मुलगा – फेसबुकवर माझे नाव प्रिया आहे.

नोकर – साहेब मला केराच्या टोपलीत
शंभराच्या पाच नोटा सापडल्या, ह्या घ्या.

मालक – मीच फेकून दिल्या होत्या, नकली आहेत त्या…

नोकर – म्हणूनच परत करीत आहे…!

माझा एक मित्र आहे,
तो इतके दर्द भरे स्टेटस टाकतो कि,
कधी कधी तर
    .
    .
मी पण त्याच्या गर्लफ्रेंडला मिस करतो…!!!

तो आला…
थांबला…
लाजला…
आजूबाजूला पाहिलं…
अन,
हळूच बोलला, – 20 च टाका…!

गाडीच्या माग लिहील होत,
सरकार फक्त आमचच…!

हॉलीवूड आणि बॉलीवूडची Acting एकीकडे

आणि

नातेवाईकांकडे पैसे उसने मागितले तर,
त्यांची Acting एकीकडे…

(दोन्हीही पाहण्यासारख्या  असतात…)

मुलगा बाबांच्या लग्नाची सीडी बघत असतो.

मुलगा –  बाबा मला पण तुमच्या लग्नासारख्या
माझ्या लग्नात पण आयटम गर्ल्स नाचवायच्या आहेत…?

आई – मुर्खा, त्या तुझ्या मावश्या आहेत…!

जीवनात सर्व काही असावं…!
पण फक्त,
    .
    .
चड्डीत मुंगी नसावी.

पेशंट – डॉक्टर, वजन कमी करण्यासाठी तुम्ही
दिलेल्या या गोळ्या जेवणाआधी घ्यायच्या कि,
जेवणानंतर घ्यायच्या…?

डॉक्टर – त्या गोळ्या जेवणाऐवजी घ्यायच्या…!!!

Very Funny Jokes in Marathi

लोक बोलतात एकदा आपल्याला कोणी फसवले कि,
त्या व्यक्तीकडे परत जायचं नसत…
    .
    .
पण काय करणार सासरवाडीला जावंच लागत…!

गल्लीमध्ये कुत्र सुद्धा ओळखत नसणारी
पोर
    .
    .
त्याच्या Bio मध्ये लिहितात,
“सिर्फ नाम हि काफी है…”

अर्ज किया है…

बघणार असेल कोणी तर
दाढी करण्यात अर्थ आहे…

जर कोणीच बघणार नसेल तर
अंघोळसुद्धा व्यर्थ आहे…!

देवाची कृपा आणि तुम्हा सर्वांचे आशीर्वाद
यामुळेच मी BMW घेऊ शकलो…
    .
    .
BMW (Bisleri Mineral Water)
काय करू खूप तहान लागली होती…

शाळेत इंग्लिशचे लेक्चर चालू असते.

मास्तर – गण्या “it” केव्हा वापरतात…?

गण्या – घर बांधताना…!

(मास्तरांनी लई धुतला…)

जर मी मेलो तर
अजिबात नाराज होऊ नका…
अन अजिबात रडू नका…
रळ वरती निघून या…
    .
    .
आपण पिंपळाच्या झाडावर बसून लोकांना घाबरवू…!!!

शिक्षक – 350 रुपयात 1 डझन आंबे आले,
तर 1 आंबा कसा पडला?

विद्यार्थी – पिशवी फाटली असेल.

शिक्षक – भारतात सगळ्यात जास्त पाऊस कुठे पडतो?
बराच वेळ विचार करून ADMIN ने उत्तर दिले,
    .
    .
“जमिनीवर !!!”

ADMIN लहानपणापासून हुशार आहे,
पण कधी गर्व करत नाही.

गब्बर – ये हात मुझे दे दे ठाकूर

ठाकूर – (वैतागून) घे, माझे हात घे,
विरूचे हात घे,
जयचे हात घे,
बसंतीचे.
पण हात घे…

गब्बर – माफ कर यार,
तू तर लईच सिरीयस झालास…!

एक मतदार वोटिंग मशीन समोर बराचवेळ उभा असतो

मतदान अधिकारी – काय झालं?

मतदार – रात्री कुणी पाजली त्याचं नावंच आठवत नाहीये…!

तर मित्रांनो हे होते काही भन्नाट आणि मजेदार मराठी जोक्स जे आपल्याला हसून हसून बेजार करतील. आम्हाला खात्री आहे कि, आम्ही जे हे मराठी जोक्स आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत, ते आपल्याला नक्की आवडतील.

आम्ही याठिकाणी दर्जेदार आणि नवीन जोक्स आपल्यासाठी उपलब्ध करून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. जर हे जोक्स आपल्याला आवडले असतील तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा. जेणेकरून त्यांच्या ताणतणावग्रस्त आयुष्यात त्यांनादेखील दोन क्षण हसण्याचा योग येईल.


Share :

Leave a Comment