जगातील सर्वात रहस्यमयी कैलास पर्वताबद्दल 10 चकित करणारी रोचक तथ्य जाणून घ्या

Kailash Parvat Rahasya in Marathi - या लेखात आपण जगातील सर्वाधिक रहस्यमयी असलेल्या कैलास पर्वताबद्दल आपल्याला चकित करणारी रोचक तथ्य जाणून घेणार आहोत.

Kailash Parvat Information in Marathi

या जगात अशा काही अद्भुत आणि चकित करणाऱ्या गोष्टी आहेत कि, ज्या पाहून किंवा ज्याविषयी ऐकून आपण नक्कीच आश्चर्य व्यक्त करतो. काही काही गोष्टींचा शोध तर विज्ञानदेखील लावू शकलेले नाही. आपण म्हणतो कि विज्ञानाकडे सर्व प्रश्नांची उत्तरे असतात, मात्र या जगात अशा काही बाबी आहेत कि, ज्याचे उत्तर आजपर्यंत विज्ञानालादेखील सापडलेले नाही.

आजच्या या लेखात आपण अशाच एका रहस्यमयी आणि पवित्र असलेल्या आणि ज्याच्यापुढे विज्ञानाने देखील हात टेकलेले आहे, अशा कैलास पर्वताबद्दल काही रोचक तथ्य जाणून घेणार आहोत कि, जे वाचून आपण नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. या गोष्टी बहुतेक आपण कुठेही ऐकल्या किंवा वाचल्या नसतील.

अशी मान्यता आहे कि, भगवान शिव आणि देवी पार्वती यांचे निवासस्थान म्हणून कैलास पर्वत ओळखला जातो. बहुतेक लोकांची अशीही धारणा आहे कि, भगवान शंकर आपल्या परिवारासोबत आजही कैलास पर्वतावर स्थित आहेत. याचबरोबर भारतीय संस्कृतीतील मस्त्यपुराण, स्कंदपुराण यांसारख्या अनेक पुराणांमध्ये कैलास पर्वताचे स्वतंत्रपणे वर्णन करण्यात आले आहे.

Kailash-Parvat-Rahasya-in-Marathi

मित्रांनो कैलास पर्वत जगातील सर्वाधिक रहस्यमयी आणि पवित्र पर्वत मानला जातो. या लेखात आपण कैलास पर्वताबद्दल अशाच काही रोचक बाबी अभ्यासुया...

अलौकिक शक्ती

कैलास पर्वत आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशात एक वेगळ्याच प्रकारचे वातावरण आहे, असे बहुतेक वैज्ञानिकांचे म्हणजे आहे. कारण जेव्हा वैज्ञानिक जार निकोलाई रोमनोव आणि त्यांच्या टीमने काही तिबेटी धर्मगुरूंची भेट घेतली, त्यावेळी त्यांनीदेखील हेच सांगितले कि, कैलास पर्वताच्या चारही दिशेला एक वेगळ्याच अलौकिक शक्तीचा प्रत्यय आपल्याला येतो.

पृथ्वीचा केंद्रबिंदू

बहुतेक शास्रज्ञ कैलास पर्वताला पृथ्वीचा केंद्रबिंदू मानतात. आपल्या सर्वाना हे माहितीच असेल कि, पृथ्वीच्या एका बाजूला उत्तर ध्रुव तर दुसऱ्या बाजूला दक्षिण ध्रुव आहे. आता आश्चर्याची बाब म्हणजे या दोन्ही धृवांच्या मधोमध आहे हिमालय पर्वत आणि हिमालयाच्या अगदी मधोमध आहे कैलास पर्वत. त्यामुळे बहुतेक शास्रज्ञ कैलास पर्वताला पृथ्वीचा केंद्रबिंदू मानतात. काय आपल्याला हे माहित होते का? कमेंट करून जरूर कळवा...!

रहस्यमय स्वस्तिकचे दर्शन

सूर्योदयाच्या वेळी कैलास पर्वताच्या काही भागात रहस्यमयी स्वस्तिकचे दर्शन होते. हे देखील एक आश्चर्यच मानता येईल. स्वस्तिक या चिन्हाला हिंदू संस्कृतीत खूपच मनाचे स्थान आहे.

अजेय पर्वत

आता हि माहिती वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल कि, माउंट एव्हरेस्ट हा कैलास पर्वतापेक्षा तब्बल 2 हजार मीटरने अधिक उंच आहे. कारण एव्हरेस्टची उंची 8850 मीटर एवढी आहे तर, कैलास पर्वताची उंची 6640 मीटर इतकी आहे. म्हणजेच माउंट एव्हरेस्ट हा पर्वत कैलास पर्वतापेक्षा अधिक उंच आहे. माउंट एव्हरेस्ट हे शिखर आजपर्यंत हजारो जणांनी सर केले आहे, मात्र आजपर्यंत एकही व्यक्तीला कैलास पर्वत सर करता आलेले नाही.

रहस्यमयी पर्वत

कैलास पर्वत हा इतर पर्वतांप्रमाणे नसून हा पर्वत अतिशय पवित्र आणि रहस्यमयी मानला जातो. एका गिर्यारोहकाने त्याच्या पुस्तकात सांगितले आहे कि, ज्यावेळी त्याने हा पर्वत चढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याच्या शरीरावरील केस आणि नखे अतिशय वेगाने वाढू लागली.

अजून एका गिर्यारोहकाने सांगितले कि, ज्यावेळी मी कैलास पर्वताजवळ गेलो, त्यावेळी माझे हृदय अतिशय वेगाने धडधडत होते. परंतु ज्यावेळी मी त्या पर्वतापासून थोडे दूर होऊ लागलो त्यावेळी माझे मन हलके होत गेले.

बहुतेक लोकांनी त्यांच्या अनुभव कथनात असे सांगितले आहे कि, ज्यावेळी ते कैलास पर्वत चढण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळी त्यांना कैलास पर्वताचे शिखर तर दिसते मात्र ते अचानक दिशाहीन होतात किंवा त्याच जागी फिरत राहतात. कधी कधी अचानक काहीही कारण नसताना हिमवादळे येतात, परिस्थिती अचानकच बिघडते.

डमरूचा आवाज

कैलास पर्वताचा आकार हा एखाद्या शिवलिंगाच्या आकाराप्रमाणे असून त्याजवळ असणाऱ्या कैलास मानससरोवराजवळ एक आवाज नियमित ऐकू येतो. तो आवाज अगदी लक्ष देऊन ऐकला तर तो डमरूच्या नादासारखा भासतो.

वैज्ञानिकांनी या गोष्टीचा शोध लावण्याचा भरपूर प्रयत्न केला मात्र त्यांना याचे उत्तर मिळाले नाही. काही संशोधकांच्या म्हणण्याप्रमाणे पर्वतावर येणारे वारे पर्वतावरील दगड आणि बर्फावर आदळत असल्यामुळे असा आवाज येतो. मात्र याबद्दल ते ठोस माहिती देऊ शकले नाही.

मानससरोवर आणि राक्षससरोवर

कैलास पर्वताच्या पायथ्याजवळ दोन सरोवरे आहेत. त्यातील एक म्हणजे पवित्र असा मानससरोवर आणि दुसरा म्हणजे अशुभ राक्षस सरोवर. मानससरोवर संपूर्ण जगभरातील शुद्ध असा नैसर्गिक पाण्याचा झरा आहे तर दुसऱ्या बाजूला क्षारांनी युक्त आणि पिण्यालायक नसलेल्या पाण्याचे सरोवर आहे.

मानससरोवराचा आकार हा आकाशातून पाहिल्यास सूर्याप्रमाणे दिसतो तर राक्षस सरोवर आकाशातून पाहिल्यास चंद्राच्या आकाराप्रमाणे दिसतो. रावणाने याठिकाणी महादेवाची उपासना करून वरदान प्राप्त करून घेतले होते, अशी मान्यता आहे.

हे दोन्ही जलाशय एकमेकांपासून खूपच जवळ आहेत, तरीदेखील या दोन्ही तळ्यांच्या पाण्यात आणि जैवविविधतेत खूप वेगळेपणा आहे. राक्षसतळ्यात कोणतीही वनस्पती आणि जलचर प्राणी आढळून येत नाही. तसेच त्यातील पाणी नेहमी अशांत असते. याउलट कितीही वारे वाहिले तरी मानससरोवरातील पाणी हे नेहमी स्वच्छ आणि शांत असते.

आध्यात्मिक केंद्र

कैलास पर्वत हिंदू, जैन, बौद्ध आणि तिबेटी बौद्ध या चारही धर्माचे आध्यात्मिक केंद्र मानले जाते. कैलास पर्वतावर चढाई करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. कारण भारत आणि जगभरातील लोकांचे मत आहे कि, हे एक पवित्र ठिकाण आहे. त्यामुळे यावर कुणालाही चढाई करू देऊ नये.

पवित्र नदींचे उगमस्थान

कैलास पर्वत चार महान नदीचे उगमस्थान मानले जाते. त्यात सिंधू, ब्रह्मपुत्रा, सतलज आणि घाग्रा या पवित्र नद्यांचा समावेश होतो. हिंदू संस्कृतीत या सर्व नद्यांना अतिशय पवित्र मानले जाते.

ओमकाराचा नाद

कैलास पर्वताचा आकार हा एखाद्या शिवलिंगाच्या आकाराप्रमाणे आहे. कैलास पर्वत ओम पर्वत या नावानेही ओळखला जातो. बहुतेक लोकांचे असे म्हणणे आहे कि, कैलास पर्वताच्या परिसरात गेल्यावर नीट लक्ष देऊन ऐकले तर ओमकाराचा ध्वनी ऐकू येतो.

तर मित्रांनो, हे होते कैलास पर्वताबद्दल काही अद्भुत आणि रोचक तथ्य. आम्हाला खात्री आहे कि, हि माहिती आपल्याला नक्कीच आवडली असेल. या माहितीच्या माध्यमातून आपल्याला कैलास पर्वताबद्दल नवीन माहिती मिळाली असेल. विज्ञानाकडे प्रत्येक गोष्टीचे उत्तर असते असे आपण म्हणतो, मात्र जगात अशा काही गोष्टी अस्तित्वात आहेत कि, ज्याचे उत्तर अजूनपर्यंत विज्ञानदेखील शोधू शकले नाही. विज्ञान कितीही पुढे गेलं तरी अजूनही काही प्रश्नांची उत्तरे विज्ञानालाही शोधता आलेली नाहीत.

हि माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रीणींना अवश्य शेअर करा. जेणेकरून त्यांनादेखील कैलास पर्वताबद्दल रोचक आणि अद्भुत तथ्य वाचण्यास मिळतील.

आता Net Marathi टेलिग्रामवर देखील उपलब्ध आहे. आमचे Telegram Channel जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.