Sasu Sun Jokes in Marathi
मित्रांनो, या लेखात आपण सासू सुनेवरील काही मजेदार आणि भन्नाट मराठी जोक्स वाचणार आहोत कि, जे वाचून आपणदेखील खळखळून हसाल. आम्ही आपल्यासाठी येथे भरपूर सासू-सुनेचे जोक्स उपलब्ध करून दिलेले आहेत.
आपल्याला माहितच आहे कि, सासू-सुनेचे नाते हे खूपच मजेदार नाते असते. कधी कधी सासू-सुनेचा दैनंदिन संवाद चाललेला असताना अशा काही मजेदार घडामोडी घडतात कि, आजूबाजूला उपस्थित असणाऱ्या व्यक्तींना हसू आवरत नाही. असेच काहीसे मजेदार Marathi Jokes आम्ही याठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत, ते नक्की वाचा.
चला तर मग सुरु करूया…

Sasu Sun Jokes
एकदा एका स्रीला देव प्रसन्न होतात.
देव – एक वरदान माग.
स्री – मला तीन वरदान पाहिजेत.
देव – ठीक आहे, पण त्यासाठी तुला एक अट मान्य करावी लागेल…?
स्री – कोणती…?
देव – मी तुला जे देईन त्याच्या दहापट मी तुझ्या सासूला देईन.
(देवाला वाटले ती स्री निरुत्तर होईल.)
स्री – चालेल.
देव – मग ठीक आहे, माग वरदान…
स्री – मला सर्वात सुंदर बनव.
देव – तथास्तु…
(इकडे सासू दहापट सुंदर होते.)
स्री – मला भरपूर संपत्ती द्या.
देव – तथास्तु…
(इकडे सासूला सुनेपेक्षा दहापट संपत्ती जास्त मिळते.)
स्री – मला एक हलकासा हार्ट अटॅक येऊ द्या.
देव – तथास्तु…
(इकडे सासूला सुनेपेक्षा दहापट हार्ट अटॅक येतो. सासू सरळ वर…)
आता सासूची संपत्ती देखील सुनेचीच होते.
सासू – अगं सूनबाई उठा आता, सूर्य उगवला सुद्धा…
सून – तुम्हाला तेवढंच दिसणार.
सूर्य माझ्या आधी झोपायला जातो,
ते पण बघत जा जरा…!
सासू आणि सून यांच का पटत नाही…?
माहिती आहे का?
.
.
.
.
नावातच मोठी चूक आहे,
सा – सारख्या
सु – सूचना
आणि
सु – सूचना
न – नको…
सासुबाई – सुनबाई टिकली लाव.
सून – जीन्स वर टिकली नाही लावत कोणी.
सासू बाई – अग भवाने,
जीन्स वर नाही सांगत मी…
कपाळावर लावायला सांगत आहे टिकली…!
सासू – सुनबाई, तू जलेबी किती दिवसांपासून बनवतेस…?
सून – गेल्या दहा वर्षापासून…
सासू – तुला लाज नाही वाटत मग.
इतक्या दिवसांपासून जलेबी बनवतेस…
तरी अजूनही तुला ती सरळ बनवता येत नाही.
(सासू जोमात, सून कोमात)
सासू सुनेचा जोरदार वाद चालला होता.
कोणताही पक्ष मागे हटण्यास तयार नव्हता.
सासरेबुवा वर्तमानपत्रात डोके खुपसून बसले होते.
वैतागलेल्या बंड्याने पत्नीला बाजूला घेऊन सांगितले – हे बघ, उगाच वाद वाढवू नकोस,
आई अजून फार तर एक-दोन वर्षांत आटपेल,
कशाला वाईटपणा घेतेस…
थोड्या वेळाने बंड्याने आईला सांगितले –
आई, तुझे आता वय झाले आहे.
विनाकारण वाद घातला नाहीस तर,
आणखी पंधरा-वीस वर्षे आरामात जगशील…
सासू सुनेचे वाद नंतर कधीही झाले नाहीत…!!!
पहिली सासू – माझी सून सारखा Whatsapp चा डी पी बदलत असते गं.
नाश्त्या नंतर एक,
लंच नंतर एक,
आणि
डिनर नंतर एक…
सारखं आपलं मॉडेलिंग,
छे छे बाई…
मला अजिबात आवडत नाही.
आमच्यावेळी नव्हतं असं हो.
दुसरी सासू – अगं पण तु कशाला
नाश्त्यानंतर, लंच नंतर, डिनर नंतर लोकांचे डी पी बघत बसते?
जपाची माळ ओढत बस की निवांत…!
नवी नवरी सासूच्या पाया पडते.
सासू – सुखी रहा…
सून – तुम्ही राहू देणार का?
घर आवरताना सासूला सुनेचा बायोडेटा सापडला,
जो लग्नासाठी तयार केलेला होता.
त्यात आवड या सदरात, “स्वयंपाक करण्याची भयंकर आवड आहे.”
असं लिहिले होते.
सासुबाईनी त्यात दुरुस्ती केली.
“भयंकर स्वयंपाक करण्याची आवड आहे.”
(सासू जोमात, सून कोमात)
सासूबाई – हे तुझ्या आईचं घर नाही,
नीट राहायचं…!
सुनबाई – तुमच्या तरी कुठे आईचं आहे…?
तुम्हीपण नीट राहा…!
पत्रिका मुलाची आणि मुलीची नव्हे,
तर
सासू आणि सुनेची जुळली पाहिजे,
संसार सुखाचाच होईल…!
मुलगा बिच्चारा कोणत्याही परिस्थितीत जुळवून घेतो.
नवीन लग्न झालेल्या सुनेला सासू म्हणते,
“हे बघ आजपासून तू मला आई म्हणायचं,
आणि तुझ्या सासऱ्याना बाबा म्हणायचं…!”
संध्याकाळी जेव्हा तिचा नवरा घरी येतो,
तेव्हा ती म्हणते…
“आई, दादा आला…”
(पोरग चक्कर येऊन पडल राव)
सून पुस्तक पाहून स्वयंपाक करत असते.
सासू – काय गं, फ्रीजमध्ये देवघरातील घंटा
का ठेवली…?
सून – ते पुस्तकात लिहिलंय, इन सब का मिश्रण
बनाके एक घंटा फ्रीज मे रखिये…
(सासू अजूनही देवघरात हात जोडून बसल्या आहेत.)
सासू – अग, एक काळ असा होता कि,
मी पाच रुपयात किराणा, दुध, पाव आणि अंडी
घेऊन येत होते.
सून – पण आता ते शक्य नाही,
कारण तिथे सीसीटीव्ही बसवलाय…!
1990 मध्ये सुना घाबरत होत्या,
सासू कशी भेटणार…
.
.
.
.
आता सासू घाबरते,
सून कशी भेटणार…
(सबका दिन आता है…!)
सून – सासूबाई तुमचे सगळे दागिने मला द्या.
सासू – मग मी काय घालू…?
सून – तुम्ही सूर्यनमस्कार घाला…
उत्तम आरोग्य हाच खरा दागिना…
सून – सासूबाई मी तुम्हाला कामात
मदत करू का?
सासू – का, गं, नेट पॅक संपला वाटत…!
सासू – काय गं, तुझ्या मोबाईलला काय झालं…?
सून – बिघडलाय, किती वेळा सांगू…
सासू – सांगत रहा,
बर वाटत…
(सासू रॉक्स, सून शॉक्स)
सासू – सुनबाई, तू सांगितलं नाहीस,
तुझ्या अंगात येत म्हणून…
सून – काय…
सासू – तुझा केस विस्कटलेला डी पी बघितला…
सून – अहो सासूबाई, तो अंघोळ झाल्यावर
काढलेला सेल्फी होता…
सासूबाई – अग सुनबाई याने बघ Pan Card
गिळलय, काही तरी कर पटकन…?
सुनबाई – शांत व्हा, सासूबाई…
त्यांना आधार कार्ड पण गिळायला सांगा.
दोन्ही लिंक झाल्याशिवाय काहीच करू शकत नाही.
Sasu Sun Marathi Jokes
सासूचे आशीर्वाद घेणे हि श्रद्धा आहे,
आणि
सासू चांगलं वागेल हि अंधश्रद्धा…
भावी सासू – मी तुझ मराठी ऐकल्यावरच ठरविण कि,
तू माझी सून होण्याच्या लायकीची आहेस कि नाही…!
तुझ शिक्षण किती…?
मुलगी – नेत्र नेत्र चहा…
भावी सासू – म्हणजे…?
मुलगी – आयआयटी…
सुनबाई – अहो, सासूबाई तुमची गुलाबी साडी
इस्री करता करता थोडीशी जळाली…
सासूबाई – हरकत नाही. माझ्याकडे तशीच अजून एक साडी आहे.
सुनबाई – माहित होत मला,
म्हणून तर त्या साडीचा तेवढा तुकडा कापून मी
ह्या साडीला जोडला.
(हुशार सुनबाई)
सासू – अग सुनबाई, उठ
मला करंजी तळायच्या आहेत…
सून – मग मी काय कढईत झोपले आहे का?
सासू – सुनबाई तू तुझ्या आईबरोबर जशी
राहायचीस तशीच माझ्याबरोबर पण राहा.
(दुसऱ्या दिवशी सकाळी)
सुनबाई – आई माझ्यासाठी
एक कप चहा ठेवा आणि नाश्त्याला पोहे बनवा.
सुनबाई आणि नारळ
.
.
.
.
कसे निघतील हे आधीच सांगणे खूप
अवघड आहे.
(एक वैतागलेली सासू)
Sasu Sun Jokes in Marathi
तर मित्रांनो, आम्हाला खात्री आहे कि, हे सासू-सुनेचे भन्नाट आणि मजेदार Marathi Jokes वाचल्यावर आपण नक्कीच खूप हसला असाल. आम्ही आपल्यासाठी येथे भरपूर नवीन आणि मजेदार जोक्स उपलब्ध करून देत असतो. जर हे मराठी जोक्स आपल्याला आवडले तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा.
अशाच प्रकारचे मनोरंजक जोक्स वाचण्यासाठी वेळोवेळी www.Netmarathi.com या वेबसाईटला भेट द्या.