Teacher Student Jokes in Marathi
नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण शिक्षक-विद्यार्थी या संवर्गातील काही भन्नाट मराठी जोक्स वाचणार आहोत. हे जोक्स आपल्याला नक्की आवडतील, अशी आम्हाला खात्री आहे.
आम्ही या वेबसाईटवर कोणतेही जोक्स उपलब्ध करून देताना त्याचा दर्जा राखतो. आम्ही येथे उपलब्ध करून देत असलेले शिक्षक-विद्यार्थी जोक्स आपल्याला नक्कीच आवडतील.
आम्ही येथे उपलब्ध करून देत असलेले शिक्षक-विद्यार्थी जोक्स हे फक्त आणि फक्त वाचकांच्या मनोरंजनासाठी उपलब्ध करून देत आहोत. आम्हाला शिक्षक वर्गाबद्दल पूर्णतः आदर आहे. हे Marathi Jokes उपलब्ध करून देताना कोणाची बदनामी करण्याचा आमचा कोणताही हेतू नाही.
चला तर मग मित्रांनो सुरु करूया...
![]() |
Teacher Student Jokes in Marathi |
Teacher and Student Jokes in Marathi
शिक्षक - बंडू, उठ ,
मला सांग 55 भागिले 11 किती?
बंडू - 5
शिक्षक - बाकी?
बंडू - बाकी काही नाही, निवांत
(लय हाणला)
शिक्षक: “मी तुझा जीव घेईन”
याच इंग्रजीत भाषांतर कर...
पप्पू - ते इंग्रजी गेलं उडत...
तुम्ही हात तरी लाऊन बघा...
मास्तर - मुलांनो, सांगा बर,
5 वजा 5 बरोबर किती...?
सगळी मुले शांत...
मास्तर - सांग बंड्या, जर तुझ्याकडे 5 इडल्या आहेत
आणि
मी 5 इडल्या खाल्ल्या,
तर तुझ्याकडे काय उरले?
बंड्या - सांबर आणि चटणी...
शिक्षक - चल सांग, Monkey ला मराठीत काय म्हणतात?
पप्पू - माकड म्हणतात.
शिक्षक - तू पुस्तकात बघून सांगितलं ना...!
पप्पू - नाही सर, मी तुमच्याकडे बघून सांगितले.
गुरुजी - बंडू खर खर सांग नाहीतर
चड्डी काढून मारेन तुला...
बंडू - पण सगळी चूक माझी असताना,
तुम्ही का चड्डी काढताय...
(लई चोपला भो)
शिक्षणाधिकारी - काय हो, मास्तर तुमच्या वर्गात हुशार
विद्यार्थी कोण आहे?
मास्तर - वर्गात सगळ्यात हुशार विद्यार्थी बंडू आहे.
शिक्षणाधिकारी - बंडू मला सांग सहा पंचे किती?
बंडू - सहा पंचे पंचेचाळीस
शिक्षणाधिकारी - काय हो मास्तर तुम्ही तर म्हणत होतात,
कि बंडू सगळ्यात हुशार आहे म्हणून.
मास्तर - अहो सर, बंडूच थोडस जवळच उत्तर देतो,
बाकी सगळे शंभराच्या वर उत्तर देतात.
शाळेत इंग्लिश चे लेक्चर चालू असते.
मास्तर - गण्या "It" केव्हा वापरतात?
गण्या - घर बांधताना...!
(लई चोपला मास्तरांनी)
शिक्षक - बंडू पेपर लिहायचा सोडून कशाचा विचार करतोस.
बंडू - कुठल्या प्रश्नाचे उतर कुठल्या खिशात आहे,
याचा विचार करतोय सर.
शिक्षक - सांग मला, यमुना नदी कोठून वाहते?
बंड्या - जमिनीवरून
शिक्षक - नकाशात पाहून सांग, कोठून वाहते...?
बंड्या - नकाशात कशी वाहीन सर.
नकाशा ओला नाही का होणार...!
शिक्षक - पाल कोण आहे?
पप्पू - पाल हा एक असा गरीब मगरीचा प्रकार आहे,
जो कुपोषणाची शिकार झाला आहे.
गुरूजी - गण्या, सांग बरे , प्रेम अन दारू
यामध्ये काय फरक आहे...?
गण्या - सोप्पय गुरूजी...
दारू जास्त झाली तर मुले उल्टी करतात.
अन
प्रेम जास्त झाल तर मुली उल्टी करतात...
(लई चोपला गुरुजींनी)
आमच्या लहानपणी 2G, 3G, 4G
अस काहीच नव्हत...
फक्त गुरुG होते,
एक कानाखाली मारली कि,
पोर आपोआप रेंजमध्ये यायचे...!
बाबा - काय रे तुझ्या वर्गात सगळे पास झाले का?
चंदू - हो, आम्ही सगळे पास झालो,
पण आमच्या Madam मात्र नापास झाल्या.
बाबा - काय, त्या कशा नापास होतील, गाढवा...?
चंदू - हो बाबा, त्या अजून त्याच वर्गाला शिकवतात...
पप्पू 5 मिनिटात पेपर देऊन जाऊ लागतो..
शिक्षक - का रे पप्पू...
पेपर मधल काही येत नाही का?
पप्पू - तसं नाही सर...
मला उद्याच्या पेपरचा अभ्यास करायचा आहे,
म्हणून लवकर चाललोय...
शिक्षक - काय रे बंड्या, तू वर्गात सारखा
मुलींशी गप्पा का मारत असतोस...?
बंड्या - काय सांगू गुरुजी, मी गरीब घरचा आहे,
मला Whatsapp परवडत नाही.
गुरुजी - बंड्या...
आज डब्याला काय आणल आहेस...!
बंड्या - गुरुजी...पुरणपोळी आणली आहे...
गुरुजी - मला देशील का तुझा डबा...
मी आज डबा आणला नाही...
बंड्या - हो देईन...
गुरुजी - पण तुझ्या आईने विचारल्यावर,
काय सांगशील.
बंड्या - सांगीन कुत्र्याने खाल्ला म्हणून...
(गुरुजींनी कुत्र्यासारखा मारला)
शिक्षिका - एकीकडे पैसा, एकीकडे अक्कल,
काय निवडाल?
विद्यार्थी - पैसे.
शिक्षिका - चूक. मी अक्कल निवडली असती.
विद्यार्थी - तुमच बरोबर आहे बाई,
ज्याच्याकडे जे नसत त्याने तेच घ्यायचं असत.
शिक्षक - नालायका, तू तुझ्या आयुष्यात एखादे तरी
Book उघडले आहे का...?
संता - हो, सर मी रोज उघडतो...
शिक्षक - कोणते?
संता - Facebook
शिक्षक - 350 रुपयात 1 डझन आंबे आले,
तर 1 आंबा कसा पडला?
विद्यार्थी - पिशवी फाटली असेल.
शिक्षक - आजचा ऑनलाईन क्लास संपला.
काही डाउट असेल तर प्रश्न विचारा.
विद्यार्थी - सर, तुम्हाला चहा द्यायला आली होती,
ती तुमची मुलगी होती का?
बंगळूर मध्ये एका शिक्षकाने वर्गातील एका मुलाला
कानाखाली मारले.
त्यामुळे त्यांना 50,000 रूपये दंड आकारण्यात आला
व
तो दंड त्या विद्यार्थ्याला देण्यात आला...
आमच्या वेळेला जर असे असते तर
.
.
.
.
आज माझ्या कडे 2/4 बंगले, 3/4 कार,
10 एकर शेतीचा मी मालक असतो...
(इतका मार खाल्लाय राव)
शिक्षक - सांगा पाहू, विद्यार्थी आणि डॉक्टर
यांच्यामध्ये काय साम्य आहे?
हात वर करून बंड्या सांगतो,
"सर ऑपरेशन झाल्यावर डॉक्टर आणि पेपर
झाल्यावर विद्यार्थी एकच सांगतात...
शिक्षक - काय ते?
बंड्या -आम्ही आमच्या परीने चांगले प्रयत्न केले, पण
आताच काही सांगू शकत नाही.
शिक्षक - बंड्या, माशी आणि डासामध्ये काय
फरक आहे?
बंड्या - गुरुजी, माशी लोकांना फक्त तपासते,
डास डायरेक्ट इंजेक्शन देतो.
वर्गात मराठीचा तास सुरु होता.
प्राध्यापक शब्द शिकवीत होते.
त्यानी एका विद्यार्थ्याला विचारले, "कविता आणि निबंध यातला फरक सांगा."
"प्रेयसी एक शब्द बोलली तरी ती कविता असते
आणि
बायकोचा एकच शब्द म्हणजे निबंध !"
विद्यार्थ्याने उत्तर दिलं.
शिक्षक अजुन विचार करत आहेत
ह्याचे लग्न झालेले नसताना उत्तर बरोबर आल कस...?
एकदा एका शाळेतील सर्व शिक्षकांना
एका विमानात बसवलं जाते.
मग त्यांना सांगितलं जात कि,
हे विमान तुमच्या विद्यार्थ्यांनी बनवलं आहे.
सर्व शिक्षक पटापट विमानातून खाली उतरतात.
फक्त शाळेचे मुख्याध्यापकच बसून राहतात.
बाकीच्या शिक्षकांनी त्यांना विचारले, "तुम्हाला भीती नाही
वाटत का?"
मुख्याध्यापक म्हणाले, "मला माझ्या विद्यार्थ्यांवर पूर्ण भरवसा आहे.
हे विमान चालूच होणार नाही."
Teacher and Student Jokes
गुरूजी मराठी व्याकरण शिकवत होते.
"मराठी व्याकरणात दोन प्रयोग आहेत,
कर्मणी प्रयोग आणि कर्तरी प्रयोग.
'मी व्हिस्की पितो' किंवा 'मी रम पितो'
या वाक्यांमध्ये कोणता प्रयोग येतो...?
बंडया - तरतरी प्रयोग..!
शिक्षक - सांग, मोटार सायकलची किती चाके असतात...?
पिंट्या - 6 चाके.
शिक्षक - कस काय?
पिंट्या - 4 मोटारची आणि 2 सायकलची...
शिक्षक - अंड्यातून कोंबडीचे पिल्लू कसे बाहेर येते,
सांग पाहू...?
विद्यार्थी - सर हे काही विशेष नाही,
खरे आश्चर्य हे आहे कि, ते आत घुसलेच कसे?
शिक्षक - जर कुणी शाळेच्या समोर बॉम्ब ठेवला तर काय कराल?
गण्या - 1-2 तास बघणार कोणी नेला तर ठिक आहे.
नाहीतर Staff Room मधे जमा करणार.
नियम म्हणजे नियम
शिक्षक - आज तू उशिरा का आलास?
शाळा तर 8 वाजता सुरु होते...
विद्यार्थी - सर, तुम्ही माझी काळजी करत नका जाऊ.
खुशाल शाळा सुरु करत जा...!
(लई चोपला शिक्षकांनी)
विज्ञानाच्या तासाला मास्तर सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन प्रयोगशाळेत गेले.
मास्तरांनी त्यांच्या खिशातून दहा रुपयांचं नाण काढलं अन ते ऍसिडमध्ये टाकले.
मास्तरांनी विद्यार्थ्यांना विचारलं, - आता मला सांगा, हे नाण ऍसिडमध्ये विरघळून जाईल का?
गण्या - मास्तर, नाण अजिबात विरघळणार नाही...
मास्तर - शाब्बास, पण तुला कस माहित...?
गण्या - मास्तर, जर ते नाण विरघळणार असत, तर तुम्ही ते आमच्याकडून घेतले असत, स्वतः च्या खिशातलं नसत टाकलं.
शिक्षक - आधी काय येणार सांग बरे,
चिकन कि अंडे...?
दगडू - त्यात काय एवढ विशेष, आपण ज्याची ऑर्डर
दिली तेच आधी येणार ना...!
बंड्याचे आजोबा त्याच्या शाळेत बंड्याला भेटायला जातात.
आजोबा - (शिक्षकांना) जरा बंड्याला बोलवता का?
शिक्षक - अहो, तो तर आज तुमच्या दहाव्याला गेला आहे.
शिक्षक - बंड्या ऊठ.
सांग बरं आपल्या देशाचा मृत्यूदर किती आहे?
बंड्या - 100 टक्के
शिक्षक - कसं काय?
बंड्या - कारण, जो जन्माला येतो तो मरतोच ना...!
सर - किती निर्लज्ज आहेस तु गण्या?
तु 100 पैकी फक्त 5 गुण मिळवले
आणि
तरी सुध्दा हसत आहेस मुर्खा...?
गण्या - सर , मी हसत आहे
कारण
उत्तरपञिकेत मी तर पिक्चरच गाण लिहल होत फक्त,
तर मग हे 5 गुण आले कुठुन...!
शाळेच्या मागच्या नदीत मुख्याध्यापक बुडत असतात.
पप्पू ते पाहतो आणि जोरजोरात ओरडत सुटतो..
.
.
.
.
उद्या शाळेला सुट्टी आहे रे...!
शाळेत जात असताना होणाऱ्या
पोटदुखीचा
.
.
.
.
जगातदेखील उपाय नाही.
पेपर मधे प्रश्न होता...
शास्रीय कारणे द्या...
डोक्यावर पांघरुण घेऊन झोपू नये...
एका कार्ट्याने ऊत्तर लिहिले...
कारण कोण झोपलय ते कळत नाही
(मास्तरांनी बदाबदा बडवला)
गुरुजी - चिंटू, तू काल शाळेत का आला नव्हतास...?
चिंटू - गुरुजी, मी पडलो होतो आणि लागले होते.
गुरुजी - कुठे पडला होतास आणि कुठे लागले होते...?
चिंटू - पलंगावर पडलो होतो
आणि
झोप लागली होती.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चार पानी निबंध लिहायला सांगितला.
विषय होता, ‘आळस म्हणजे काय?’
एका विद्यार्थ्याने चारही पानं कोरी ठेवली
आणि
शेवटी फक्त तीनच शब्द लिहीले.
यालाच म्हणतात आळस...
(शिक्षकांनी लई मारला)
मास्तर - मुलांनो, सांगा
"She was a new student and
looking happy".
या वाक्याच मराठीत रुपांतर करा.
विद्यार्थी - कुण्या गावाच आल पाखरू,
बसलंय डोलात अन
खुदू खुदू हसतय गालात...
(मास्तरांनी अख्खा वर्ग धुतला)
शिक्षक - चिंटू, अरबी समुद्र कुठे आहे?
चिंटू - माहित नाही सर
शिक्षक - बाकावर उभा राहा.
चिंटू - (बाकावर उभा राहून) - तरी दिसत नाही सर...!
शिक्षिका - चिंटू, तुला 50 मार्क देताना मला आनंद होतोय.
चिंटू - मॅडम तुम्ही आपला आनंद द्विगुणित करू शकता.
शिक्षिका - ते कसे?
चिंटू - पूर्ण 100 मार्क देऊन...!
हेडमास्तर - का रे बंड्या शाळेत यायला आज उशीर का झाला?
बंड्या - काय करणार बाईक खराब झाली होती सर.
हेडमास्तर - बस ने येता येतं नव्हतं का गधड्या?
बंड्या - मी म्हटलं होतं सर पण, तुमची मुलगी ऐकेल तर शप्पथ...!
मास्तर - कॉफी शॉप आणि
वाइन शॉप मध्ये काय फरक आहे?
विद्यार्थी - सोप्प आहे सर...
प्रेमाची सुरुवात कॉफी शॉप मध्ये होते...
आणि शेवट वाइन शॉप मध्ये...
शिक्षक - तू मोठा झाल्यावर काय करशील?
पिंट्या - लग्न
शिक्षक - तसे नाही, म्हणजे तू काय बनशील?
पिंट्या - बाप...!
गुरुजी - मुलांनो सांगा, एक किलो कापूस जड की एक किलो लोखंड जड.
दगडू - लोखंड
गुरुजी - दोघाचंही वजन एक किलोच आहे, मग लोखंड कसं जड?
दगडू - लोखंडच जड
गुरुजी - अरे एका पारड्यात लोखंड आणि एका पारड्यात कापूस ठेवला तर तराजू समांतर राहील.
दगडू - नाही गुरुजी लोखंडच जड
गुरुजी - गधड्या दोघांचही वजन सारखच आहे…
दगडू - तुम्ही मला एक किलो कापूस फेकून मारा,
मी तुम्हाला एक किलो लोखंड फेकून मारतो,
मग कळेल तुम्हाला काय जड आहे ते...!
शिक्षक - तू शाळेत कशासाठी येतोस...?
धोंडू - विद्येसाठी...
शिक्षक - मग तू आज वर्गात झोपला का होतास?
धोंडू - आज विद्या आली नाही ना...!
शिक्षक - मुलांनो तिसर महायुद्ध झाल तर काय होईल?
विद्यार्थी - सर फार गंभीर परिणाम होतील.
शिक्षक - सांग काय परिणाम होतील ?
बाळू - सर इतिहासाच्या पुस्तकात आणखी एक धडा जोडला जाईल.
शिक्षक मंत्र्याच्या मुलाला प्रश्न विचारतात.
शिक्षक - सांग बघू, पूर आणि दुष्काळ यात काय फरक आहे?
मुलगा - खूप फरक आहे सर.
शिक्षक - तो कसा...?
मुलगा - दुष्काळ असला कि माझे वडील जीपने दौरा करतात, आणि
पूर असला कि, हेलिकॉप्टरने.
Teacher Student Funny Jokes in Marathi
शिक्षक - राजू तु जेवण्यापूर्वी प्रार्थना करतोस का?
राजू - नाही सर, तशी गरज नसते.
माझी आई फार चांगला स्वयंपाक करते.
शिक्षक - संता, अशी एखादी गोष्ट सांग बर कि,
जी आजपासून दहा वर्षापूर्वी आपल्याकडे नव्हती.
संता - मी...
शिक्षक - देशातील सर्वात खतरनाक नदी कोणती आहे?
विद्यार्थी - भावना
शिक्षक - ते कस काय?
विद्यार्थी - कारण सर्व यात वाहत जातात.
शिक्षक - सांग बर सायकल आणि बसमध्ये काय फरक आहे?
विद्यार्थी - सोप आहे सर, आपण बसचे Stand कुठेही घेऊन जाऊ शकत नाही,
पण
सायकलचे Stand सायकल बरोबर घेऊन जाऊ शकतो.
गुरूजी - तुझी हजेरी कमी आहे...
तू परीक्षेला नाही बसू शकत...
गण्या - काही अडचण नाही, गुरुजी,
मी उभ्याने पेपर देईन.
शिक्षक - झंप्या तू नेहमी शाळेत टोपी घालून का येतोस...?
झंप्या - कारण कुणाला कळायला नको...
कि
माझ्या डोक्यात काय चालले आहे ते...
बंडूचे वडील शिक्षकांना...
माझा मुलगा अभ्यासात कसा आहे...?
शिक्षक - अस समजा कि आर्यभट्टने शून्याचा शोध
याच्यासाठीच लावला कि काय...!
एक ह्रदय हेलावून टाकणारा प्रसंग
गुरुजी ओळखलंत का मला?
हो ओळखलं ना.
2014 ची तुकडी ना?
.
.
.
.
3 महिन्याची ट्युशनची फी बाकी आहे तुझी...
काय दिवस आलेत...!
आज कालच्या मुलांच्या शाळेच्या पहिल्या दिवशी
त्यांचे शिक्षक मुलांना गुलाबाचे फुल देऊन स्वागत करतात.
.
.
.
.
आणि
आमच्यावेळी पहिल्या दिवशी कचरा गोळा करायला लावायचे.
शिक्षक - बंडू सांग बर Ford म्हणजे काय...?
बंडू - Ford एक गाडी आहे.
शिक्षक - मग Oxford म्हणजे काय?
बंडू - किती सोपय गुरुजी.
Oxford म्हणजे बैलगाडी...!
मास्तर - दिप्या तू मोठेपणी कोण होणार?
दिप्या - मी खुप श्रीमंत होणार, माझ्याकडे बंगला,
2-3 गाड्या, दिमतिला 10 नोकर असतील. सतत परदेश प्रवास करणार.
मास्तर - बस बस.
आता सायली तू सांग.
तू मोठेपणी कोण होणार?
सायली - दिप्याची बायको.
शिक्षक - मायक्रोसॉफ्ट एक्सेल म्हणजे काय?
विद्यार्थी - मायक्रोसॉफ्ट एक्सेल म्हणजे सर्फ एक्सेलचा नवीन प्रकार,
ज्याचा वापर कॉम्प्युटर धुण्यासाठी केला जातो.
शिक्षक - वर्गात एकमेकांबरोबर भांडणे का नाही करायला पाहिजे...?
बंड्या - कारण, आपल्याला हे माहित नसत कि परीक्षेच्या वेळी
आपला नंबर कोणाच्या मागे येईल.
शाळेत वर्गामध्ये एक मुलगा मॅडमला विचारतो.
मी कसा आहे...?
मॅडम - तू खुप छान आहेस रे...
मुलगा - मग मॅडम, तुमच्याकडे बोलणी करायला
मी आई बाबांना कधी पाठवू?
मॅडम - वेडा आहेस का तू?
काय बोलतोयस तू?
मुलगा - अहो मॅडम...
टयुशन्ससाठी हो...!
तुम्ही पण ना...
लगेच गैरसमज करून घेता...
प्राध्यापक - क्लास सुटायच्या आत हे बाहेर कुठे चाललंय?
विद्यार्थी - सर, त्याला झोपेत चालायची सवय आहे.
शिक्षक - या म्हणीचा अर्थ सांगा.
"सापाच्या शेपटीवर पाय देणे "
गण्या - बायकोला माहेरी जाण्यापासून रोखणे...!
शिक्षक - गोलू, मी तुला एक फटका मारला.
याचा भविष्यकाळ करून सांग...
गोलू - सर मधल्या सुट्टीत तुमची गाडी पंक्चर होणार.
गुरूजी - सांग बर बंडू
कडधान्य म्हणजे काय?
बंडू - गुरूजी, शेताच्या कडं कडं नी जे धान्य उगवते.
त्यास कडधान्य असे म्हणतात.
शिक्षक गण्याला
शिक्षक - दहा नारळांपैकी सात नारळ नासले तर
किती नारळ शिल्लक राहतील.
गण्या - दहा.
शिक्षक - ते कसे?
गण्या - नासलेले नारळ सुद्धा नारळच राहतील.
त्यांचा काय फणस होणार आहे का, मास्तर...!
शिक्षक - लिहा मुलांनो,
दुनिया गोल आहे.
विद्यार्थी - तुम्ही सांगता म्हणून लिहितोय सर,
नाहीतर दुनिया लई हरामखोर आहे.
शिक्षक - सुंदर मुलीला इंग्रजीतून काय म्हणाल...?
बंड्या - I Love you
(शिक्षकांनी लई हाणला बंड्याला)
शिक्षक - सांगा, लाकूड पाण्यावर
का तरंगते...?
विद्यार्थी - कारण लाकडाला पोहता येत असेल.
शिक्षक - पाण्याचे सूत्र सांगा.
पप्पू - O2+GR1+RK3
शिक्षक - हे काय आहे, चुकीचे आहे हे...!
पप्पू - बरोबर आहे सर, हे गटारीचे पाणी आहे.
शिक्षक - तुला पक्षांविषयी माहिती आहे का?
विद्यार्थी - हो आहे.
शिक्षक - मग सांग कोणता पक्षी उडू शकत नाही...?
विद्यार्थी - मेलेला...
गुरुजी - काय रे वर्गात डुलक्या देतोयस?
विद्यार्थी - नाही गुरुजी...
.
.
.
.
गुरुत्वाकर्षणाने डोकं खाली पडतय...!
शिक्षक - संता सांग ताजमहाल कोणी बांधला...?
संता - कारागीराने
शिक्षक - तसं नाही. बनवला कोणी होता...?
संता - ठेकेदाराने...!
परीक्षेला 10 मार्कासाठी आलेला एक प्रश्न...
मुंग्यांना कसे माराल?
उत्तर -
पहिले साखरेला मिरची पावडर लावून मुंग्यांच्या वारुळापाशी ठेवून द्या.
हे खाद्य खाल्यावर मुंग्या पाणी पाणी करत नळावर जातील
आणि
ओल्या होतील
मग परत सुकण्यासाठी आगीजवळ जातील,
आगीत एक फटाका फोडा...
मुंग्या जखमी होतील त्यांना आइ सी यु मध्ये ठेवल्यावर
त्यांच्या तोंडावरील प्राणवायूचा मास्क काढून टाका...
तात्पर्य - 10 मार्कासाठी विद्यार्थी काय पण करू शकतील...
सर - सांगा पाहू सगळ्यात जुना प्राणी कोणता?
मंजू - झेब्रा.
सर - असं का बरं?
मंजू - कारण तो ब्लॅक अण्ड व्हाईट असतो ना...
शब्दाने शब्द वाढतात
म्हणून
आम्ही तोंडी परिक्षेमध्ये शांत बसायचो...!
शिक्षक - एक अशा जागेच नाव सांग
जिथे खूप सारे लोक असतील, तरीपण
तुला एकटे एकटे वाटेल...?
विद्यार्थी - परीक्षा हॉल...
आम्हीपण शाळेत सकाळी सकाळी शपथ घ्यायचो
आणि
दुपारी पळून जायचो...!
हद झाली राव..
आजकाल 9-10 वी चे मूलं स्टेटस टाकत आहे...
Feeling Love
Heart Broken
.
.
.
.
अन आम्ही जेव्हा शिकत होतो.
तेव्हा feeling तर दूरची गोष्ट हाय..
.
.
.
.
स्वप्नात पन गणिताचे शिक्षक मारताना दिसायचे.
शिक्षक - बंडू तू उभा राहा.
मी जो प्रश्न विचारीन त्याचे पटापट उत्तर दे.
बंडू - ठीक आहे सर
शिक्षक - आपला जिल्हा कोणता आहे?
बंडू - पटापट
शिक्षक - जो मूर्ख आहे त्याने उभा राहा.
पप्पू उभा राहतो.
शिक्षक - तू का उभा राहिलास...?
तू मूर्ख आहे का?
पप्पू - नाही सर, तुम्ही एकटेच उभे होतात
म्हणून मी पण उभा राहिलो.
मला पाहवलं नाही ते.
सर - सांग बंड्या तुझा जन्म कुठे झाला?
बंड्या - औरंगाबाद
सर - चल त्याची स्पेलिँग सांग बरं...
बंड्या थोडा विचार करतो
आणि म्हणतो
नाही, नाही... माझा जन्म पुण्यात झाला...!
शिक्षक - न्यूटनचा नियम सांग.
विद्यार्थी - सर पूर्ण नाही येत.
शिक्षक - जितका येतोय तेवढा सांग.
विद्यार्थी - तर याला म्हणतात न्यूटनचा नियम...
काल बऱ्याच वर्षांनी माझ्या शाळेत गेलो.
सुदैवाने काही शिक्षकांची भेट झाली.
मी अतिशय नम्रपणे
व
दाटलेल्या कंठाने त्यांना म्हणालो...
"आज मी जो काही आहे, तुमच्यामुळे आहे
लगेच दोघेजण म्हणाले...
"हे बघ, तू आम्हाला दोष देऊ शकत नाही.
आमच्या परीने आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न केले होते.
शिक्षक - कोणता पक्षी सर्वात वेगवान धावतो.
विद्यार्थी - सर, हत्ती
शिक्षक - नालायका, काय करतात वडील तुझे...?
विद्यार्थी - सर ते शार्प शुटर आहेत.
शिक्षक - शाब्बास,
मुलांनो, लिहा सर्वात वेगवान धावणारा पक्षी, "हत्ती".
शाळा तपासणी अधिकारी - बाळ तुझ नाव काय?
बाळ - पांडू
शाळा तपासणी अधिकारी - बाळा पांडू नाही,
पांडुरंग बोलायचं...
शाळा तपासणी अधिकारी दुसऱ्या एका विद्यार्थ्याला...
हा बाळ तुझ काय नाव आहे?
दुसरा मुलगा - बंडूरंग...
शिक्षक - हा तू सांग, अक्कल मोठी कि म्हैस...?
विद्यार्थी - सर, आधी जन्मतारीख तर सांगा ना...!
शिक्षक - बाळ, वर्गात थोड लक्ष देतोस का...?
बाळ - सर, मी शक्य तितक कमीच लक्ष देतोय.
Teacher Student Jokes in Marathi
तर मित्रांनो, आम्हाला खात्री आहे कि, हे आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेले शिक्षक-विद्यार्थी मराठी जोक्स आपल्याला नक्कीच आवडतील आणि ते वाचून आपण नक्कीच हसाल. जर हे मराठी जोक्स आपल्याला आवडले असतील तर ते आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा. जेणेकरून ते देखील हे भन्नाट जोक्स वाचून फ्रेश होतील.
अशाच प्रकारचे भन्नाट जोक्स वाचण्यासाठी वेळोवेळी www.Netmarathi.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या.