असे कोणते फळ आहे जे बाजारात विकले जात नाही? 20 मुलाखत प्रश्न | Interview Questions in Marathi

Share :

Interview Questions in Marathi – येथे आपण काही ट्रिकी मुलाखतीचे प्रश्न व त्याची उत्तरे पाहणार आहोत. हे प्रश्न आपल्या ज्ञानात नक्कीच भर घालतील. नक्की वाचा…

Interview Questions in Marathi

मुलाखत हा शब्द ऐकला की आपल्याला चार ते पाच अनुभवी व्यक्तींच्या समोर बसलेला व घाबरगुंडी उडालेला चेहरा दिसतो. कदाचित आपण हा अनुभव घेतला देखील असेल. कारण आजकाल सरकारीच नव्हे तर प्रायव्हेट क्षेत्रातही नोकरी मिळविण्यासाठी मुलाखत द्यावी लागते. काहींना हा शब्द ऐकूनच घाम फुटू लागतो. ते काही का असेना पण जर नोकरी हवी असेल तर हा अनुभव प्रत्येकालाच घ्यावा लागतो.

कधी कधी मुलाखत घेणारे व्यक्ती हे असे काही प्रश्न विचारतात की मुलाखत देणाऱ्याचे डोके चक्रावून जाते. अशाच काही प्रश्नांची या ठिकाणी आम्ही माहिती उपलब्ध करून दिलेली आहे, जे वाचून आपल्या ज्ञानात नक्कीच भर पडेल आणि जर हे प्रश्न आपल्याला मुलाखतीत विचारले गेले तर तुम्ही नक्कीच त्याची उत्तरे देऊ शकाल.

Interview Questions in Marathi
Interview Questions in Marathi

चला तर मग पाहूया असे ट्रिकी प्रश्न आणि त्यांची उत्तरे…

प्रश्न – असा कोणता दुकानदार आहे, जो तुमच्याकडून मालही घेतो आणि पैसेही घेतो?
उत्तर – न्हावी

प्रश्न – जर तुम्ही लाल दगड निळ्या समुद्रात टाकला तर काय होईल?
उत्तर – तो दगड ओला होईल

प्रश्न – असे कोणते फळ आहे जे बाजारात विकले जात नाही?
उत्तर – मेहनतीचे फळ

प्रश्न – असा कोण आहे जो आपली सगळी कामे हाताऐवजी नाकाने करतो?
उत्तर – हत्ती

प्रश्न – तुम्ही नाश्त्यामध्ये काय खाऊ शकत नाही?
उत्तर – जेवण

प्रश्न – सांगा बर असे कोण आहे जे फाटते पण त्यातून आवाज येत नाही?
उत्तर – दूध

प्रश्न – ते कोणते मंदिर आहे, जे दिवसातून दोनदा गायब होते?
उत्तर – श्री स्तंभेश्वर महादेव मंदिर

प्रश्न – जर रामराव हे काजलचे वडील आहे, तर मग रामराव हे काजलच्या वडिलांचे काय आहे?
उत्तर – नाव

हे वाचामराठी कोडी व त्याची उत्तरे – Marathi Kodi | Puzzles in Marathi

प्रश्न – एका रिकाम्या बॉक्स मध्ये आपण किती सफरचंद ठेवू शकतो?
उत्तर – एक, कारण त्यानंतर बॉक्स रिकामा राहणार नाही.

प्रश्न – कोणत्या महिन्यात लोक सर्वात कमी झोपतात…?
उत्तर – फेब्रुवारी

प्रश्न – कोणत्या प्राण्याचे हृदय हे त्याच्या डोक्यावर असते?
उत्तर – समुद्री खेकडे

प्रश्न – रामच्या वडिलांना एकूण चार मुले आहेत.
पहिल्या मुलाचे नाव – ABC
दुसऱ्या मुलाचे नाव – DEF
तिसऱ्या मुलाचे नाव – GHI
तर मग चौथ्या मुलाचे नाव काय?
उत्तर – राम

प्रश्न – अशी कोणती वस्तू आहे, जी जळतही नाही आणि पाण्यात बुडतही नाही?
उत्तर – बर्फाचा तुकडा

प्रश्न – असा कोणते ठिकाण आहे, ज्याठिकाणी सोने ATM मध्ये उपलब्ध असते?
उत्तर – दुबई

प्रश्न – असा कोण आहे, ज्याला कुठेही तिकीट खरेदी करावे लागत नाही?
उत्तर – नवजात शिशु

प्रश्न – असा कोणता देश आहे, जेथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे मोफत आहे?
उत्तर – लक्झेम्बर्ग

प्रश्न – गुलाब, झेंडू आणि जास्वंद यात काय साम्य आहे?
उत्तर – हे तिन्ही फुले आहेत.

हे वाचामानवी जीवनाशी संबंधित 25+ मजेदार तथा रोचक तथ्य

तर मित्रांनो, आपल्याला हे ट्रिकी मुलाखत प्रश्न (Mulakhat Questions Marathi) नक्कीच आवडले असतील अशी आम्हाला खात्री आहे. जर आपल्याला हि माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींना अवश्य शेअर करा. आमच्या या माहितीने आपल्या ज्ञानात नक्कीच भर पडली असेल. अशाच माहितीसाठी येथे वेळोवेळी भेट द्या.

Related post :

1. विमानात पायलट आणि को-पायलटला वेगळं जेवण का दिलं जातं? माहित आहे का…

2. मृत समुद्राची ही रोचक तथ्ये जाणून घ्या, काही तर आहेत भन्नाट | Dead Sea in Marathi

3. जिभेच्या संदर्भात काही आश्चर्यकारक तथ्य | Facts About Tongue in Marathi

4. जगातील सर्वात रहस्यमयी कैलास पर्वताबद्दल 10 चकित करणारी रोचक तथ्य जाणून घ्या


Share :

Leave a Comment