पहाटे उठण्याचे हे अद्भुत फायदे जाणून घ्या | Sakali Lavkar Uthnyache Fayde

Share :

Sakali Lavkar Uthnyache Fayde – या लेखात आपण सकाळी / पहाटे  लवकर उठण्याचे काही अद्भुत फायदे जाणून घेणार आहोत. आपल्याला या लेखाचा खूप फायदा होईल…

Sakali Lavkar Uthnyache Fayde

पूर्वीच्या काळी आपल्याकडे लवकर झोपून पहाटे लवकर उठण्याची परंपरा होती. सध्याच्या स्पर्धेच्या युगात आपण स्वतः चे अस्तित्व टिकविण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो. त्यासाठी आपल्याला कधी कधी रात्री उशिरापर्यंत काम करावे लागते. अशा वेळी रात्री उशिरा झोपल्यावर मग आपण सकाळी उशिरापर्यंत अंथरुणातच पडून असतो. कधी कधी दुपारपर्यंत देखील आपल्यातील काही मंडळी पहुडलेली असल्याचे आपल्या निदर्शनास आले असेल.

Sakali-Lavkar-Uthnyache-Fayde
Sakali Lavkar Uthnyache Fayde

आपण आपल्या वाड-वडिलांकडून ऐकले असेलच कि, ते रोज पहाटे उठून व्यायाम करणे, शेतातील कामे करणे, न्याहारी करणे याप्रकारे त्यांच्या दिवसाची सुरुवात असायची. त्यामुळे ते दिवसभर अगदी कार्यक्षम असायचे.

Table of Contents

आजच्या या लेखात आपण पहाटे लवकर उठण्याचे काही अद्भुत फायदे जाणून घेणार आहोत, कि जे वाचून आपणही नक्कीच पहाटे लवकर उठण्याचा विचार कराल.

Benefits of Waking up Early Morning in Marathi

सकाळी लवकर उठण्याचे फायदे

उत्साही वातावरण

सकाळचे वातावरण फारच उत्साहपूर्ण आणि आनंददायक असते. जर आपण पहाटे लवकर उठलो तर आपल्याला या उत्साही वातावरणाचा अनुभव घेता येतो. सकाळची वेळ हि ब्रह्ममुहूर्ताची वेळ मानली जाते. या मुहूर्ताला अतिशय महत्व आहे. या वेळी व्यायाम करणे, ध्यान धारणा करणे, प्राणायाम करणे, सूर्यनमस्कार करणे फायदेशीर असते. त्यामुळे पहाटे लवकर उठण्याचा हा देखील एक फायदा सांगता येईल.

आत्मविश्वास वाढतो

सकाळच्या वेळी आपण व्यायाम, सूर्यनमस्कार, प्राणायाम ध्यान धारणा केली तर आपल्या आत्मविश्वासात नक्कीच वाढ झालेली आपल्याला पहावयास मिळेल.

स्वतः साठी वेळ

सध्याच्या काळात आपण दुसऱ्यासाठी भरपूर वेळ देत असतो तरी स्वतः साठी वेळ काढणे अतिशय अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे जर आपण पहाटे लवकर उठलो तर आपण स्वतः ला वेळ देऊ शकतो. पहाटे उठण्याचा हा देखील एक फायदा सांगता येईल.

हे वाचा – गरम किंवा कोमट पाणी पिण्याचे हे आहेत अद्भुत फायदे…

कामात मन लागते

सकाळी लवकर उठल्यामुळे आपले मन हे अतिशय प्रसन्न आणि प्रफुल्लीत राहते. त्यामुळे आपण जे काही काम हाती घेतो त्यामध्ये आपली गोडी वाढते. त्या कामात आपले मन लागते. त्यामुळे हा देखील एक फायदा सांगता येईल.

सकारात्मकता

पहाटे लवकर उठल्यामुळे आपल्याला शांत आणि प्रसन्न वातावरणाचा अनुभव घेता येतो. त्यामुळे जेव्हा आपले मन प्रसन्न व आनंदी असते अशावेळी आपल्या विचारसरणीमध्ये एक सकारात्मकपणा आलेला आपल्याला पहावयास मिळतो. त्यामुळे पहाटे लवकर उठण्याचा हा देखील एक फायदा सांगता येईल.

वाचन

सकाळचे वातावरण शांत आणि निवांत असते. अशावेळी आपण पहाटे उठून वाचन केले तर आपल्याला एक वेगळ्याच प्रकारची अनुभूती मिळते. सकाळच्या वेळी वातावरण शांत असल्याने आपल्याल वाचनात अजिबात अडचणी येत नाहीत.

कार्यक्षमतेत सुधारणा

ज्यावेळी आपण सकाळी लवकर उठतो त्यावेळी आपला मेंदू अतिशय कार्यक्षम असतो. एखादे काम करताना आपल्याला अजिबात थकवा आलेला जाणवत नाही. त्यामुळे जर आपल्याला कार्यक्षमतेत सुधारणा करावयाची असेल तर आपण पहाटे उठलेले नक्कीच चांगले…

ताण तणावाचे योग्य व्यवस्थापन

ज्यावेळी आपण सकाळी लवकर उठतो त्यावेळी आपल्याला आपली दैनंदिन कामे करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. कामे वेळेत होत असल्याने आपल्याला कामाचे अजिबात टेंशन येत नाही. त्यामुळे पहाटे लवकर उठल्यामुळे ताण तणावाचे योग्य व्यवस्थापन करता येते.

हे वाचा – रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाय

तर मित्रांनो, हे होते सकाळी लवकर उठण्याचे काही अद्भुत फायदे. आता आपण सकाळी उशिरा उठल्यामुळे काय काय तोटे होतात, ते जाणून घेऊया.

सकाळी उशिरा उठण्याचे काही तोटे

दिवसभर चिडचिड होणे

बहुतेक लोकांना रात्री उशिरापर्यंत जागरण करण्याची सवय असते. त्यामुळे मग सकाळी लवकर उठणे शक्य होत नाही. सकाळी उशिरा उठल्यामुळे आपण आपली कामे वेळेत करू शकत नाही. काम करण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ उपलब्ध होत नाही. त्यामुळे आपली चिडचिड होते व कधी कधी आपण नैराश्यात देखील जातो.

कामाचा ताण निर्माण होतो

सकाळी उशिरा उठल्यामुळे आपल्याला आपले दैनंदिन कामे उरकण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे आपण धावपळ करीत आपली कामे करण्याचा अट्टाहास करतो, परंतु यामुळे आपल्यावर कामाचा ताण निर्माण होतो. आपली चिडचिड होते.

थकवा जाणवणे

जे लोक सकाळी उशिरापर्यंत झोपून राहतात, त्यांच्यात हि समस्या हमखास पहावयास मिळते. कारण उशिरा उठल्यामुळे शारीरिक कसरत, व्यायाम, प्राणायाम, सूर्यनमस्कार यासाठी वेळच मिळत नाही. कारण उशिरा उठल्यामुळे दैनंदिन इतर कामेच करण्याकडे आपला ओढा असतो. त्यामुळे शरीराकडे आपले दुर्लक्ष होते. शरीरावर त्याचे वाईट परिणाम होतात. परिणामी यामुळे दिवसभर थकवा जाणवतो.

आरोग्य बिघडते

सकाळी उशिरा उठल्यामुळे आपले आरोग्य बिघडते. कारण आपण सकाळी उशिरा उठल्यामुळे शरीरासाठी विशेष वेळ देऊ शकत नाही. सकाळचे वातावरण हे अतिशय प्रसन्न असते, त्या वातावरणास आपण मुकतो. त्यामुळे सकाळी उशिरा उठण्याचा हा सर्वात मोठा तोटा मानता येईल. कारण आरोग्य हीच खरी संपत्ती, अशी म्हण आपल्याकडे रूढ आहे.

सकाळी लवकर उठण्यासाठी काही टिप्स

दृढनिश्चय करा

रात्री झोपताना हा दृढनिश्चय करा की, तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे.

हळूहळू सुरुवात करा

एकदम पहाटे उठण्यापेक्षा थोडेसे हळूहळू सुरुवात करा. उदा. जर आपल्याला पहाटे पाच वाजता उठायचे असेल तर एकदम पाच वाजता उठू नका. याने तुम्हाला थोडीशी मरगळ आलेली जाणवेल. तसेच तुम्ही अंथरुणातच पडून राहाल. त्याऐवजी अर्ध्या अर्ध्या तासाचे टप्पे बनवा. म्हणजेच जर तुम्ही रोज सकाळी सात वाजता उठत असाल तर पहिल्या दिवशी साडे सहा वाजता उठा. त्याच्या दुसऱ्या दिवशी सहा वाजता उठा. मग साडे पाच व मग पाच वाजता उठण्याची सवय लावा. याने तुम्हाला कंटाळादेखील येणार नाही व आपले ध्येयदेखील सध्या होईल.

रात्री लवकर झोपा

शक्यतो रात्री लवकर झोपा. जेणेकरून सकाळी आपली झोप पूर्ण होऊन सकाळी उठण्याचा अजिबात कंटाळा येणार नाही.

रात्री हलका आहार घ्या

रात्रीचा आहार हा शक्यतो हलका ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्ही जितका जड आहार घ्याल तितकीच तुम्हाला जास्त झोप येण्याची शक्यता वाढते.

चहा, कॉफी टाळा

झोपेच्या अगोदर चहा, कॉफी यासारखे तत्सम पदार्थ टाळा.

तर मित्रांनो, हे होते पहाटे लवकर उठण्याचे काही अद्भुत फायदे, उशिरा उठण्याचे काही तोटे व सकाळी लवकर उठण्यासाठी काही महत्वपूर्ण टिप्स आणि ट्रिक्स. आम्हाला खात्री आहे कि या लेखाची आपल्याला सकाळी / पहाटे उठण्यासाठी मदत होईल.

हे वाचा – रागावर नियंत्रण कसे मिळवावे? How To Control Anger in Marathi

अशाच प्रकारचे लेख वाचण्यासाठी वेळोवेळी येथे भेट द्या. हि माहिती आपल्या मित्र मंडळींना अवश्य शेअर करा. जेणेकरून त्यांनादेखील सकाळी लवकर उठण्याचे फायदे कळतील.


Share :

Leave a Comment