जिभेच्या संदर्भात काही आश्चर्यकारक तथ्य | Facts About Tongue in Marathi

Share :

Facts About Tongue in Marathi – या लेखात आपण जिभेच्या संदर्भात काही आश्चर्यजनक तथ्य जाणून घेणार आहोत. जे वाचून आपल्या ज्ञानात नक्कीच भर पडेल…

Facts About Tongue in Marathi

जीभ हा शरीराच्या महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. जीभ आहे म्हणून आपण जिवंत आहोत, असे जर म्हटले तर ते वावगे ठरू नये. कारण प्राचीन काळापासून जीभ आपल्याला विविध बाबींविषयी ज्ञान उपलब्ध करून देण्यासंबंधीचे कार्य करते. त्यामध्ये अन्न हे कडू आहे कि गोड, ते चांगले आहे कि खराब आहे या संबंधीचे ज्ञान आपल्याला जीभ उपलब्ध करून देते.

आपल्या शरीराच्या प्रत्येक भागातील प्रत्येक अवयवाचे एक महत्व आणि कार्य असते. आपल्या शरीरातील असाच एक महत्वपूर्ण अवयव म्हणजे आपली “जीभ”. जीभ हा आपल्या शरीरातील एक महत्वाचा अवयव आहे. मुख्यतः कोणत्याही पदार्थाची चव चाखण्यासाठी आपण जिभेचा उपयोग करतो. खाद्यपदार्थांच्या चवीच्या आकलनामध्ये जीभ ही महत्वपूर्ण भूमिका अदा करते हे आपल्या सर्वांना माहिती असेलच. आजच्या या लेखात आपण जीभेबद्दल काही महत्वाच्या आणि रोचक गोष्टी जाणून घेणार आहोत कि ज्याबद्दल आपण यापूर्वी ऐकले नसेल.

Facts-About-Tongue-in-Marathi
Facts About Tongue in Marathi

चला तर मग सुरु करूया…

मानवी जिभेचा पुढील भाग हा गोड चव ओळखतो तर जिभेचा मागील भाग हा कडू चव ओळखतो.

कुत्रे आणि मांजरीसारख्या सस्तन प्राण्यांमध्ये जीभ ही बहुतेकदा शरीर साफ करण्यासाठी वापरली जाते. या प्राण्यांच्या जिभेचा पृष्ठभाग अगदी खडबडीत असतो.

जिभेमध्ये असलेल्या टेस्ट सेन्सरमध्ये तब्बल 10 हजाराहून अधिक चवींचे ज्ञान असते.

तुम्हाला हे माहित असणे आवश्यक आहे की, जिभेच्या पुढील भागाचा लवचिक भाग शब्दांचा अचूक उच्चार करण्यात सर्वात महत्वाची भूमिका बजावतो.

जिभेचा बहुतेक भाग हा स्नायू आणि ऊतींनी बनलेला असतो. म्हणून जेव्हा कधी जिभेला नुकसान किंवा दुखापत झाली असेल तेव्हा जीभ आपल्या शरीराच्या इतर भागांपेक्षा वेगाने जखम भरते.

जीभ ही नैसर्गिक क्लिनर म्हणून काम करते. खाल्ल्यानंतर जीभ दातांमध्ये अडकलेले अन्न अगदी सहजरीत्या काढून टाकते, ज्यामुळे तुमचे तोंड स्वच्छ राहते.

तुम्हाला माहित आहे का की, जीभ आठ स्नायूंनी बनलेली असते.

मानवी जिभेमध्ये सरासरी 3,000 ते 10,000 चवीच्या कळ्या असतात.

जिभेचा रंग हा आपल्या आरोग्याविषयी महत्वपूर्ण माहिती प्रदान करतो. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीच्या जिभेचा रंग हा गुलाबी असेल तर ती व्यक्ती निरोगी समजली जाते. परंतु जर एखाद्या व्यक्तीला ऍलर्जी किंवा संसर्ग झाला असेल तर जिभेचा रंग थोडासा पिवळसर किंवा फोडांसह लाल झालेला दिसून येतो.

वाघ आणि सिंहांसारख्या मोठ्या आणि हिंस्र प्राण्यांच्या जिभेवर अनेक काटेरी रचना असतात. यामध्ये इतर प्राण्यांची कातडी सोलून काढण्याचे सामर्थ्य असते.

तुम्हाला हे माहिती आहे का कि, ज्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याच्या बोटांचे ठसे हे वेगवेगळे असतात, त्याचप्रमाणे प्रत्येक मनुष्याच्या जिभेचे ठसेही वेगवेगळेच असतात.

ज्यावेळी आपण झोपतो त्यावेळी आपली जीभसुद्धा काम करत नाही.

कोणत्याही अन्नाची चव आपली जीभ आणि नाक एकत्रितपणे ओळखतात.

जीभ आपल्या स्वरावर नियंत्रण ठेवते.

खूप वेळ धावल्यावर कुत्र्याची जीभ तोंडाबाहेर का लटकते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? कारण जास्त रक्तप्रवाहामुळे कुत्र्याच्या जिभेचा आकार वाढतो आणि जिभेवरील ओलावा हा रक्तप्रवाह थंड करण्याचे काम करते.

आपल्या तोंडातील बहुतेक जीवाणू आपल्या जिभेवर आढळतात.

तोंडात सुमारे 50 टक्के बॅक्टेरिया तुमच्या जिभेवर असतात. त्यामुळे श्वासातील ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी जीभ स्वच्छ करणेही खूप गरजेचे आहे.

जीभ हि आवाजातील बदलांना मदत करते.

साप त्यांच्या काटेरी जिभेचा वापर करून वास घेतात आणि आपली शिकार शोधतात.

सरासरी स्रियांची जीभ हि पुरुषांपेक्षा लहान असते.

सर्व प्राण्यांमध्ये सर्वाधिक मोठी जीभ कोणाची असेल तर ती आहे ब्लू व्हेलची. ब्लू व्हेलच्या जिभेचे अंदाजे वजन तब्बल 2 टनांपेक्षा जास्त आहे.

जगातील सर्वात लांब जीभ सुमारे 5.86 इंच असल्याचे सांगण्यात येते.

तर मित्रांनो, आम्हाला खात्री आहे कि, जिभेच्या संदर्भात काही आश्चर्यकारक तथ्य या लेखाने आपल्या ज्ञानात नक्कीच भर पडली असेल. आम्ही आपल्याला परिपूर्ण माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे, जर काही माहिती नजरचुकीने राहिली असेल तर आपण आम्हाला कळवू शकता.

जर हि माहिती आपल्याला आवडली असेल तर आपण ती आपल्या मित्र मैत्रीणीना अवश्य शेअर करा. अशाच माहितीसाठी आपण वेळोवेळी Net Marathi या वेबसाईटला अवश्य भेट द्या.


Share :

Leave a Comment