Samadhi Sthal List in Marathi – या लेखात आपण आपल्या देशातील महापुरुषांच्या समाधी स्थळांविषयी महत्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. नक्की वाचा…
Samadhi Sthal List in Marathi
नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण अतिशय महत्त्वपूर्ण माहिती अभ्यासणार आहोत. ही माहिती आहे आपल्या देशातील महापुरुषांच्या समाधी स्थळांविषयी. मित्रांनो जर आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर याबद्दल आपल्याला माहिती ही असायलाच हवी. कारण बहुतेक स्पर्धा परीक्षेमध्ये याविषयी आपल्याला प्रश्न विचारला जातो.
![]() |
Samadhi Sthal List in Marathi |
जे वाचक स्पर्धा परीक्षेची तयारी करत नसतील त्यांनी देखील ही माहिती लक्षात ठेवायलाच हवी. कारण आपल्या देशातील महापुरुषांनी आपल्या देशाला प्रगतीपथावर आणण्यासाठी भरपूर कष्ट आणि हाल अपेष्टा सहन केल्या आहेत. त्यामुळे आपल्या महापुरुषांच्या कार्याविषयी आणि त्यांच्याशी निगडित इतर बाबींविषयी आपल्याला निश्चितच माहिती हवी.
Table of Contents
आज आपण भारतातील प्रसिध्द व्यक्तींची समाधी स्थळे व त्यांच्याविषयी अगदी महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया…
राजघाट
राजघाट याठिकाणी भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे समाधी स्थळ आहे. हे ठिकाण दिल्ली येथे यमुना नदीकिनारी आहे. दिनांक 30 जानेवारी 1948 रोजी सायंकाळी नवी दिल्ली येथे त्यांची गोळी मारून हत्या करण्यात आली होती.
शांती वन
हे समाधी स्थळ भारताचे प्रथम पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे आहे. हे ठिकाणही दिल्ली येथेच आहे.
विजयघाट
विजयघाट हे ठिकाण भारताचे माजी पंतप्रधान श्री. लाल बहादूर शास्री यांचे समाधी स्थळ आहे. हे ठिकाण दिल्ली येथे स्थित आहे.
समता स्थळ
हे समाधी स्थळ भारताचे माजी उप पंतप्रधान जगजीवन राम यांचे आहे. दिल्ली येथे हे समाधी स्थळ आहे.
चैत्यभूमी
भारतीय संविधानाचे शिल्पकार तथा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे समाधीस्थळ आहे. हे ठिकाण मुंबई (दादर) येथे आहे.
अभय घाट
भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे हे समाधी स्थळ आहे. हे ठिकाण अहमदाबाद (गुजरात) येथे स्थित आहे.
एकता स्थळ
भारताचे आठवे राष्ट्रपती ग्यानी झैलसिंह यांचे समाधी स्थळ आहे. हे एकता स्थळ भारताची एकता आणि अखंडतेच प्रतिक मानले जाते. हे स्थळ नवी दिल्ली येथे दरिया गंज या भागात आहे.
किसान घाट
हे समाधी स्थळ भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचे आहे. हे स्थळ दिल्ली येथे आहे.
वीर भूमि
नवी दिल्ली येथे स्थित असलेले हे समाधी स्थळ भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे समाधी स्थळ आहे. वीर भूमि दिल्ली येथे स्थित आहे.
शक्ति स्थल
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांचे हे समाधी स्थळ आहे. इंदिरा गांधी यांनी 3 वेळेस भारताचे पंतप्रधान पद भूषवले आहे.
महाप्रयाण
भारताचे प्रथम राष्ट्रपती तथा भारतरत्न डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे हे समाधी स्थळ आहे. हे समाधीस्थळ पटना येथे स्थित आहे.
नारायण घाट
हे समाधी स्थळ भारताचे माजी पंतप्रधान गुलझारीलाल नंदा यांचे समाधी स्थळ आहे. यांनी दोन वेळेस भारताचे हंगामी पंतप्रधान पद भूषवले आहे.
उदय भूमी
भारताचे माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन यांचे हे समाधी स्थळ आहे. दिनांक 9 नोव्हेंबर 2005 रोजी यांचे नवी दिल्ली येथे निधन झाले होते.
प्रीतिसंगम
भारताचे माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे हे समाधी स्थळ आहे. हे ठिकाण सातारा जिल्ह्यात कराड येथे स्थित आहे.
कर्म भूमी
भारताचे 9 वे राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा यांचे हे समाधी स्थळ आहे.
स्मृती स्थळ
भारताचे दहावे पंतप्रधान श्री. अटल बिहारी वाजपेयी यांचे हे समाधी स्थळ आहे. दिनांक 16 ऑगस्ट 2018 रोजी यांचे निधन झाले होते. स्मृती स्थळ हे नवी दिल्ली येथे स्थित आहे.
तर मित्रांनो आम्हाला खात्री आहे कि आम्ही दिलेली ही माहिती भारतातील प्रसिध्द व्यक्तींची समाधी स्थळे या माहितीने आपल्या ज्ञानात नक्कीच भर पडली असेल. जर ही माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटत असेल तर आपल्या मित्र- मंडळी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांना देखील आपल्या देशाच्या महापुरुषांबद्दल माहिती मिळेल.
अशाच दर्जेदार माहितीसाठी वेळोवेळी www.Netmarathi.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या.