तुमची WhatsApp चॅटिंग लपून-छपून वाचली जात आहे, मग फक्त एवढे काम करा...

How to Unlink Devices on Whatsapp in Marathi - तुमची WhatsApp चॅटिंग कुणीतरी गुपचूप लपून छपून वाचत आहे का? जर तुम्हालाही हि भिती असेल तर हा लेख जरूर वाचा...

How to Unlink Devices on Whatsapp

मित्रांनो सध्या आपल्यापैकी बहुतेक जण WhatsApp चा वापर करत असालच. आपण आपल्या दैनंदिन कामकाजातील बहुतेक कामे ही WhatsApp च्या माध्यमातून करत असतो. बहुतेक जण तर अगदी सेन्सिटिव्ह माहिती देखील व्हाट्सएप्प चॅटिंगच्या माध्यमातून शेअर करत असतात. व्हाट्सएप्पने आपले दैनंदिन जीवन जरी वेगवान बनवले असले तरी प्रत्येक व्यक्तीला ही काळजी नेहमी सतावत असते की, काय माझी ही पर्सनल चॅटिंग कोणी वाचत असेल काय...?

इन्स्टंट मेसेजिंग Application WhatsApp मध्ये दिवसेंदिवस नवनवीन फीचर्स Add होत असतात. नुकतेच व्हाट्सएप्पने आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन अपडेट उपलब्ध करून दिले आहे. या नवीन अपडेटचे नाव आहे मल्टी डिव्हाइस सपोर्ट. या फिचर्सचे वैशिष्ट्य म्हणजे याद्वारे आपण आपल्या व्हाट्सएप्प अकाऊंटला प्रायमरी फोनशिवाय तब्बल चार अन्य डिव्हाइसवर वापरू शकतो. याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बाकीच्या डिव्हाइसवर WhatsApp चालवण्यासाठी तुमच्या प्रायमरी डिव्हाइसमध्ये इंटरनेट चालू असणे आवश्यक नाही. तुम्ही ऑफलाईनदेखील त्याचा वापर करू शकता.

How-to-Unlink-Devices-on-Whatsapp-in-Marathi
How to Unlink Devices on Whatsapp in Marathi

कधी कधी आपण कामानिमित्त म्हणा किंवा इतर कारणासाठी दुसऱ्या कोणाच्या तरी मोबाईल किंवा लॅपटॉप, कॉम्प्युटरमध्ये आपले WhatsApp चालू करतो. यासाठी आपण WhatsApp वेबची मदत घेतो. परंतु आपले काम झाले कि आपण ते अकाऊंट लॉगआउट न करता तसेच तो टॅब बंद करून टाकतो आणि निघून जातो. आपल्या लक्षातच राहत नाही कि, आपले अकाऊंट या या ठिकाणी लॉग इन आहे.

जर तुमचे अकाउंट अनेक ठिकाणी लॉग इन जर असेल आणि ते जर तुमच्या लक्षात राहिले नसेल तर हा तुमच्या प्रायवसीसाठी मोठा धोका ठरू शकतो. कोणीही इतर व्यक्ती ते अकाऊंट Access करून तुमची सर्व चॅटिंग वाचू शकतो किंवा इतर ठिकाणी शेअर करू शकतो. त्यासाठी हा धोका टाळण्यासाठी आम्ही आपल्याला काही टिप्स सांगणार आहोत, त्या नक्की फॉलो करा.

आपल्या लिंक डिव्हाइसला असे करा अनलिंक

  • सर्वप्रथम आपल्या अँड्रॉइड किंवा IOS डिव्हाइसमध्ये WhatsApp ओपन करा.
  • आता वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात आपल्याला तीन डॉट दिसत असतील. त्यावर क्लिक करा.
How-to-Unlink-Devices-on-Whatsapp
How to Unlink Devices on Whatsapp
  • आता त्या ठिकाणी आपल्याला एक लिस्ट दिसेल. त्यामधील Linked Devices या पर्यायावर क्लिक करा.
How-to-Unlink-Devices
  • आता आपल्यासमोर सर्व डिव्हाइसची यादी दिसेल. जर आपले अकाऊंट एखाद्या ठिकाणी लॉग इन असेल तर आपल्याला खालील चित्रात दाखविल्याप्रमाणे दिसेल.
How-to-secure-whatsapp-chatting
  • या ठिकाणी अशा सर्व डिव्हाइसची यादी आपल्यासमोर दिसेल, ज्या ज्याठिकाणी तुमचे अकाऊंट लिंक असेल. आता ज्या डिव्हाइसमधून आपल्याला लॉग आउट करायचे आहे, त्यावर एकदा क्लिक करा. आता Log Out या Tab वर क्लिक करा.
How-to-secure-whatsapp

व्वा... मस्त...! 😍

आता आपले अकाऊंट सुरक्षित होऊन जाईल.

महत्वपूर्ण सूचना - जर आपले अकाऊंट कुठेच लॉग इन नसेल तर आपल्याला खालीलप्रमाणे चित्र दिसेल. मग मात्र आपल्याला काहीही काळजी करण्याचे कारण नाही. 👍
Unlink-Devices-on-Whatsapp

तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आपले WhatsApp अकाऊंट आणि आपली चॅटिंग सुरक्षित करू शकतो. जर आपल्या अजूनही काही शंका असतील तर आम्हाला नक्की कळवा. जर हि माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांनादेखील हि माहिती अवश्य शेअर करा. जेणेकरून त्यांनादेखील त्यांचे व्हाट्सएप्प अकाऊंट आणि चॅटिंग सुरक्षित ठेवता येईल.

अशाच माहितीसाठी आपण वेळोवेळी Net Marathi या वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि आपल्या मित्र-मैत्रिणींना देखील सांगा.