ब्लॉगर ब्लॉगमध्ये Google Analytics कसे Add करावे? | Google Analytics in Marathi

Share :

Google Analytics in Marathi – ह्या लेखात आपण Google Analytics ब्लॉगर ब्लॉगमध्ये कसे Add करावे? याची माहिती जाणून घेणार आहोत… नक्की वाचा…

How to add google analytics to blogger in Marathi

ज्यावेळी आपण एखादा ब्लॉग तयार करतो, त्यावेळी त्याच्याबद्दलचा आढावा घेणे हि सर्वात महत्वाची बाब आहे. कारण आपण लिहित असलेल्या कोणत्या पोस्ट वाचकांच्या सर्वाधिक पसंतीस उतरत आहेत. कोणत्या पोस्ट अपडेट करणे जरुरीचे आहे, याबद्दलची सर्वच माहिती एक यशस्वी ब्लॉगर होण्यासाठी आपल्याला जाणून घेणे आवश्यक असते.

Table of Contents

आज या लेखात आम्ही आपल्याला यासंदर्भातच अतिशय सुटसुटीत आणि स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन करणार आहोत. जेणेकरून तुम्हाला कोणत्याही बाबतीत अडचण येणार नाही. चला तर मग सुरु करूया…

How-to-add-google-analytics-to-blogger-in-Marathiब्लॉगर ब्लॉगवर Google Analytics कसे Add करावे? या अगोदर आपण Google Analytics म्हणजे नेमके काय आहे? त्याचे आपल्याला काय फायदे आहेत? ते कसे Add करावे? याबद्दल आपण या लेखात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Google Analytics म्हणजे नेमके काय आहे?

Google Analytics हे एक गुगलचेच प्रोडक्ट आहे, कि ज्याच्या मदतीने ब्लॉगर किंवा वेबसाईट ओनर आपल्या वेबसाईटचा आढावा घेऊ शकतात. त्यामध्ये

  • वाचक आपल्या ब्लॉगवरील कोणती पोस्ट सध्या वाचत आहे?
  • तो आपल्या ब्लॉगवर कोणत्या माध्यमातून आला आहे? जसे, सर्च करून, इमेजद्वारे, सोशल मिडिया द्वारे, इ.
  • तो स्री आहे कि पुरुष आहे?
  • तो कोणत्या माध्यमातून आला आहे? जसे, मोबाईल, कॉम्प्युटर इ.
  • तो कोणत्या मोबाईलचा वापर करत आहे?

मित्रांनो, गुगल आपल्यासाठी इतकी महत्वपूर्ण माहिती देते कि, जर आपण त्या माहितीवर व्यवस्थित संशोधन केले तर आपल्याला आपला ब्लॉग यशस्वी करण्यासाठी या माहितीचा खूपच बहुमूल्य उपयोग होईल.

आता आपण Google Analytics चे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया…

Google Analytics चे फायदे (Benefits)

तसं बघितलं तर Google Analytics चे खूप सारे फायदे सांगता येतील. त्यामध्ये

ब्लॉगचा आढावा

आपल्या ब्लॉगचा संपूर्ण आढावा घेता येणे. जसे कि आपल्या ब्लॉगवरील कोणती पोस्ट वाचकांच्या सर्वाधिक पसंतीस पडली. कोणत्या पोस्टला वाचकांचा कमी प्रतिसाद लाभला इ. यावरून आपण एक अंदाज घेऊ शकतो, कि कशा पोस्ट आपण लिहावयास पाहिजे.

वेळ

वाचक सरासरी आपल्या ब्लॉगवर किती वेळ थांबला हे देखील Google Analytics च्या माध्यमातून आपल्याला समजते. वाचक जितका जास्त वेळ आपल्या ब्लॉगवर टिकून राहील, गुगल आपल्याला त्याचप्रमाणात Ranking प्रदान करील. कारण गुगलला हे वाटेल कि, या ब्लॉगवर वाचक जास्त वेळ वाचन करतात, म्हणजे नक्कीच या ब्लॉगमध्ये महत्वपूर्ण माहिती दिली जात असणार.

Bounce Rate समजण्यास मदत

ज्यावेळी वाचक आपल्या ब्लॉगवर येतो, त्यावेळी तो Bounce Back तर करत नाही ना, हे देखील आपल्याला Google Analytics च्या माध्यमातून समजण्यास मदत होते.

Session बद्दल माहिती

ज्यावेळी एखादा वाचक आपल्या ब्लॉगवर येतो त्यावेळी तो युजर म्हणून एकच असतो मात्र जर तो एका दिवसात दोन वेळेस आपल्या ब्लॉगवर आला तर ते Session मध्ये मोजताना दोन वेळेस मोजले जाईल. वाचक जर दिवसातून दोन ते तीन वेळेस जरी आपल्या वेबसाईटवर येत असतील तर त्याबद्दलहि गुगल आपल्याला महत्वपूर्ण माहिती प्रदान करते.

हे वाचाब्लॉगर काय आहे व ब्लॉगरची काही वैशिष्ट्ये – Blogger in Marathi

आता ज्याबद्दल आपल्या सर्वानांच उत्सुकता आहे, त्या विषयाला सुरुवात करूया कि, Google Analytics आपल्या ब्लॉगर ब्लॉगला कसे Add करावे?

सुरुवात करण्याअगोदर काही सूचना देत आहोत, त्या व्यवस्थित अभ्यासा.

ज्यावेळी आपण आपल्या ब्लॉगमध्ये कोणताही बदल करतो, त्यावेळी त्याचा Backup आपल्याकडे असणे अतिशय आवश्यक आहे. कारण जर काही बदल करताना आपल्याला ब्लॉगमध्ये काही Error आला, तर आपण आपल्याकडे असलेल्या Backup चा आपला ब्लॉग परत जसाच्या तसा Restore करण्यासाठी उपयोग करू शकतो.

How to get backup of Blogger in Marathi

त्यासाठीच्या अतिशय सोप्या स्टेप्स खालीलप्रमाणे – 

1) सर्वप्रथम आपण ब्लॉगरमध्ये Log in करा.

2) आता आपल्याला डाव्या बाजूला खूप सारे पर्याय दिसत असतील. त्यातून Theme या Tab वर क्लिक करा. त्यासाठी खालील इमेजची मदत घ्या.

add-google-analytics-to-blogger

3) आता आपल्यापुढे My theme या सेक्शनच्या अंतर्गत Customise हा Tab दिसत असेल. आता आपल्याला Customise Tab च्या पुढचा जो उलटा त्रिकोणचा Icon दिसत आहे, त्यावर क्लिक करायचे आहे.

(लक्ष द्या – Customise वर क्लिक करू नका, उलटा त्रिकोणचा जो Icon दिसत आहे, फक्त त्यावरच एकदा क्लिक करा.) त्यासाठी खालील इमेजची मदत घ्या.

google-analytics

4) आता ज्यावेळी आपण त्या उलट्या त्रिकोणावर क्लिक कराल, त्यावेळी आपल्यासमोर खालील इमेजमध्ये दाखवल आहे, त्याप्रमाणे खूप सारे पर्याय दिसतील.

analytics-to-blogger

5) आता आपण Backup या पर्यायावर क्लिक करा. आता आपली फाईल डाउनलोड होईल. तिला व्यवस्थित अशा ठिकाणी सेव्ह करून ठेवा जेथे ती सुरक्षित राहील.

ब्लॉगरच्या थीमचा आपण Backup घेतला कि, आता आपण आपल्या थीममध्ये बदल करू शकतो. कारण ज्यावेळी आपण Backup न घेता थीममध्ये बदल करतो, अशावेळी जर एखादा Error आला तर मग आपण आपली सर्व मेहनत गमावून बसतो.

आता आपण Google Analytics आपल्या ब्लॉगवर कसे Add करावे, याविषयी अगदी स्टेप बाय स्टेप माहिती घेऊया…

How to connent blog to google analytics in Marathi

1) सर्वप्रथम आपण Google वर जाऊन तेथे सर्च बारमध्ये Google Analytics असे टाईप करून सर्च करा. आपल्या माहितीसाठी खालील इमेजमध्ये तसं दर्शवल आहे.

google-search

2) आता आपल्यापुढे Google Analytics ची अधिकृत वेबसाईट येईल. त्यावर क्लिक करा. आता आपल्याला Log in करा असे म्हटले जाईल. आता आपण आपल्या Email च्या सहाय्याने Log in करा.

google

3) ज्यावेळी आपण Log in कराल त्यावेळी वर चित्रात दाखवल्याप्रमाणे आपल्याला एक पेज दिसेल. असं पेज दिसल्यावर अजिबात गोंधळून जायचं नाही. आपण फक्त Start Measuring या Tab वर क्लिक करा. किंवा जस चित्रात दाखवले आहे, त्याप्रमाणे त्या बटनावर क्लिक करा.

Analytics-in-Marathi

4) आता आपल्याला Account Details विचारले जातील. त्यामध्ये Account Name विचारले जाईल. येथे अजिबात गोंधळून जायचे नाही. कारण बहुतेक वाचक येथेच गोंधळून जातात कि, Account च नाव कोणते द्यायचे? मित्रांनो, येथे Account Name मध्ये सरळ सरळ आपल्या ब्लॉगचं नाव लिहायचे आहे.

आता आपल्याला त्याच्याच खाली खालीलप्रमाणे चित्र दिसेल.

analytics-to-blogger

5) आता याठिकाणी जसे आहे तसेच पर्याय ठेवा. आणि फक्त Next या Tab वर क्लिक करा. ज्यावेळी आपण नेक्स्ट या Tab वर क्लिक करता त्यावेळी आपल्याला खालीलप्रमाणे चित्र दिसेल.

connent-blog-to-google-analytics

6) आता आपल्याला Property Name विचारेल. येथे सरळसरळ आपल्या ब्लॉगचे नाव लिहून द्या. त्याच्या खालील पर्यायात आपल्याला आपली कंट्री सिलेक्ट करायची आहे. तेथे India हा पर्याय निवडा. आता त्याच्या खालील पर्यायात करन्सी या Tab मध्ये Indian Rupee हा पर्याय निवडा. बाकी काहीही न करता थेट Next या बटनावर क्लिक करा. ज्यावेळी आपण Next या बटनावर क्लिक करता त्यावेळी आपल्यासमोर खालीप्रमाणे चित्र दिसेल.

blogger-in-Marathi

7) आता आपल्याला आपल्या ब्लॉगची Category विचारली जाईल. आपल्याला आपल्या ब्लॉगची Category तेथे नमूद करावयाची आहे. Category नमूद केल्यावर आपल्याला आपला Bussiness किती मोठा आहे, ते विचारले जाईल. आपण तेथे सरळ सरळ विचार न करता Small या पर्यायावर क्लिक करा. (जर आपला व्यवसाय खूपच मोठा असेल तर मग आपण आपल्या व्यवसायाला अनुसरून तेथे पर्याय निवडा.)

add-google-analytics-to-blogger

8) ज्यावेळी आपण Bussiness ची माहिती भरता त्यावेळी आपल्यापुढे वर चित्रात दाखविल्याप्रमाणे खूप सारे Tab दिसतात. याठिकाणी अजिबात न गोंधळात आम्ही ज्या ज्या Checkbox ला क्लिक केले आहे, त्याप्रमाणे आपणही करा आणि Create या बटनावर क्लिक करा.

blogger

9) ज्यावेळी आपण Create या बटनावर क्लिक करता, त्यावेळी आपल्यासमोर वर चित्रात दाखविले आहे, त्याप्रमाणे एक Pop up दिसेल. याठिकाणी जास्त काहीही न करता फक्त Country Select करा. (जर कोणाला ते Agreement वाचायची इच्छा असेल तर त्यांनी ते अगदी सविस्तर वाचून घ्या.😥😀) आता Checkbox वर क्लिक करून I Accept या बटनावर क्लिक करा.

analytics

10) आता आपल्यापुढे वर दर्शविल्याप्रमाणे एक Pop up येईल. काहीही न करता फक्त त्याला Save म्हणा.

set-up-google-analytics-on-blogger

11) ज्यावेळी आपण Save करता त्यावेळी आपल्यासमोर वर दाखविले आहे तसा Dashboard दिसेल. आपण आता वर चित्रात दाखविले आहे, त्याप्रमाणे Web या पर्यायावर क्लिक करा.

set-up-google-analytics

12) ज्यावेळी आपण Web या पर्यायावर क्लिक करता, त्यावेळी आपल्यासमोर असा Pop up येईल. याठिकाणी अजिबात घाबरून जायचे नाही. फक्त थोडीशी काळजी घेणे आवश्यक आहे. आता आपल्यापुढे वर चित्रात दिसत असल्याप्रमाणे Website Url विचारले जाईल.

महत्वपूर्ण सूचना – आपल्या ब्लॉगला जर आपण https सुरु केले असेल तर https राहू द्या, जर आपण https सुरु केले नसेल तर फक्त http राहू द्या. (आपल्या ब्लॉगला https सुरु आहे कि नाही हे पाहण्यासाठी आपल्या ब्लॉगच्या होमपेजला भेट द्या. त्याची लिंक कॉपी करून कुठेतरी पेस्ट करा. जर आपल्या ब्लॉगचे url https://yourblog.blogspot.com असे असेल तर आपल्या ब्लॉगला https सुरु आहे असे समजा.)

13) आता त्याच्या पुढच्या रकान्यात आपल्याला आपल्या वेबसाईटचे नाव लिहावयाचे आहे. आता आपण ज्याठिकाणी आपल्या ब्लॉगच्या होमपेजची लिंक कॉपी करून ठेवली असेल तेथे जा. त्यातून फक्त आपल्या ब्लॉगची लिंक कॉपी करा. उदा. जर तुमचा ब्लॉग https://www.yourblog.blogspot.com असा असेल तर त्या रकान्यात फक्त www.yourblog.blogspot.com असे लिहा. जर आपला ब्लोग फक्त https://yourblog.blogspot.com असा असेल, म्हणजेच त्यामध्ये www नसेल तर फक्त आपण yourblog.blogspot.com असे त्या रकान्यात लिहा.

14) आता त्याच्या पुढे Stream name मध्ये थेट आपल्या ब्लॉगचे नाव लिहून द्या.

Enhanced measurement सुरु ठेवा. ज्याप्रमाणे चित्रात दाखविले आहे, त्याप्रमाणे.

15) आता आपण create stream या पर्यायावर क्लिक करा.

add-google-analytics-to-blogger

16) ज्यावेळी आपण Create Stream या पर्यायावर क्लिक करता त्यावेळी आपल्यापुढे असा pop up उघडून येईल. येथे अजिबात गोंधळून न जाता फक्त Global Site Tag या पर्यायावर क्लिक करा. ज्याप्रमाणे चित्रात दाखविले आहे त्याप्रमाणे करा.

add-google-analytics-to-blogger-in-Marathi

17) ज्यावेळी आपण Global Site Tag या पर्यायावर क्लिक करता त्यावेळी आपल्यासमोर असा एक बॉक्स ओपन होऊन त्यामध्ये विशिष्ट एक html code दिसून येतो. आता आपण तो कॉपी करून घ्या. त्यासाठी त्याच्या पुढेच दिलेल्या Icon वर क्लिक करा. किंवा त्या सर्व कोडला सिलेक्ट करून कॉपी करा.

analytics-to-blogger

18) आता आपण आपल्या ब्लॉगरच्या Dashboard वर या. तेथे Theme या पर्यायावर क्लिक करा. हे सर्व पर्याय तुम्हाला चित्रात दाखविल्याप्रमाणे डाव्या बाजूला दिसत असतील.

add-google-analytics-to-blogger-in-Marathi

19) ज्यावेळी तुम्ही Theme या बटनावर क्लिक कराल, त्यावेळी तेथे वर दाखविलं आहे, त्याप्रमाणे Dashboard दिसेल. आता अजिबात न गोंधळून जाता चित्रात दाखविले आहे त्याप्रमाणे Customize च्या पुढचा जो उलटा त्रिकोण दिसत आहे, त्यावर क्लिक करा.

(लक्ष द्या – Customize वर क्लिक करू नका. फक्त त्या उलट्या त्रिकोणावर क्लिक करा.)

ज्यावेळी आपण त्या उलट्या त्रिकोणावर क्लिक करता, त्यावेळी आपल्यासमोर खालीलप्रमाणे पर्याय दिसतील.

How-to-add-google-analytics-to-blogger-in-Marathi

20) आता आपण Edit HTML या पर्यायावर क्लिक करा. याठिकाणी हि कृती अतिशय शांततेत करावयाची आहे. अजिबात घाई न करता, गोंधळून न जाता या कृती करा.

ज्यावेळी आपण Edit HTML या पर्यायावर क्लिक करता, त्यावेळी आपल्यासमोर खालीलप्रमाणे चित्र दिसेल.

analytics-to-blogger

21) आता आपल्यापुढे काहीतरी विचित्र अक्षरे दिसत असतील. हा सर्व आपल्या थीमचा HTML कोड आहे. खूप अवघड आणि विचित्र अक्षरे दिसतात म्हणून घाबरू नका. आपल्याला फक्त आणि फक्त येथे तो कोड पेस्ट करावयाचा आहे, जो आपण Google Analytics मधून कॉपी केला आहे.

आता काळजीपूर्वक आपल्याला एक कोड शोधावयाचा आहे. तो म्हणजे <head>

22) आता आनंदाची बाब म्हणजे हा कोड इतरत्र कुठेही शोधायची गरज नाही. आपल्या समोर तो पहिल्या पाच ते सहा नंबरच्या ओळीत किंवा थोडेफार मागे पुढे असू शकतो. आपल्याला तो लगेच लक्षात येईल. ज्यावेळी आपल्याला तो कोड सापडेल. त्यावेळी त्याच्या पुढे म्हणजे <head> च्या पुढे एकदा क्लिक करा. आणि Enter हे बटन दाबा.

23) आता एक मोकळी लाईन तयार झाली असेल. तेथे तो Google Analytics चा कोड पेस्ट करून द्या. जो आपण Google Analytics मधून कॉपी केला होता. pest केल्यावर हा कोड सेव्ह करा. सेव्ह करण्यासाठी चित्रात दाखविल्याप्रमाणे त्या आयकॉन वर क्लिक करा. जोपर्यत तो कोड पूर्णपणे सेव्ह होत नाही, तोपर्यंत तेथेच थांबा. ज्यावेळी तो कोड सेव्ह होईल, आणि तशी सूचना तुम्हाला तेथे दिसेल, त्यावेळी तेथून बाहेर पडा.

24) आता आपला कोड व्यवस्थित सेव्ह झाला आहे कि नाही हे बघण्यासाठी आपण स्वतः आपल्या ब्लॉगच्या होमपेजला भेट द्या. आता आपण आपल्या Google Analytics च्या अकाऊंटमध्ये जा. तेथे Home या बटनावर क्लिक करा. तशी इमेज खाली दर्शविली आहे.

google-analytics-on-blogger

25) आता आपल्यापुढे Users, New Users असे पर्याय दिसत असतील आणि तेथे काहीतरी संख्या दिसत असेल. सध्या आपल्या ब्लॉगवर किती वाचक आहे, ती संख्या तेथे दर्शविली जाईल. अशाप्रकारे Google Analytics आपल्या ब्लॉगर ब्लॉगला जोडले जाईल.

हे वाचाSEO काय आहे आणि त्याचे महत्व – What is SEO in Marathi

तर मित्रांनो, आम्हाला खात्री आहे कि, ब्लॉगर ब्लॉगमध्ये Google Analytics कसे Add करावे या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळाले असेल. हि माहिती आपल्या मित्र-मैत्रिणींना अवश्य शेअर करा. अशाच प्रकारच्या माहितीसाठी वेळोवेळी Netmarathi या वेबसाईटला भेट द्या.


Share :

Leave a Comment