भारतातील कोणकोणत्या राज्यातून कर्कवृत्त गेलेले आहे? जाणून घ्या भन्नाट ट्रिक्स…

Share :

Karkvrut in Marathi – आजच्या या लेखात आपण कर्कवृत्त भारतातील किती आणि कोणत्या राज्यातून जाते? हे लक्षात ठेवण्याची भन्नाट ट्रिक्स जाणून घेणार आहोत. नक्की वाचा…

कर्कवृत्त (Tropic of Cancer) कोणत्या राज्यातून जाते?

जर आपल्याला या प्रश्नाचे उत्तर लक्षात ठेवताना अडचणी येत असतील तर काळजी करण्याचे कारण नाही. आम्ही तुम्हाला याठिकाणी अशी काही क्लृप्ती सांगणार आहोत कि ज्याच्या मदतीने आपण या प्रश्नाचे उत्तर कधीच विसरणार नाही.

Table of Contents
karkvrut-in-marathi
Karkvrut in Marathi

कर्कवृत्त किती राज्यातून जाते?

कर्कवृत्त भारतातील एकूण 8 राज्यातून गेलेले आहे.

कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्यातून जाते?

कर्कवृत्त भारतातील ज्या राज्यातून गेले आहे त्या राज्यांची यादी खालीलप्रमाणे –

  1. मिझोराम
  2. छत्तीसगढ
  3. गुजरात
  4. राजस्थान
  5. मध्य प्रदेश
  6. पश्चिम बंगाल
  7. त्रिपुरा
  8. झारखंड

भारतातील ज्या ज्या राज्यातून कर्कवृत्त गेलेले आहे ती राज्य वरीलप्रमाणे आहेत.

हे वाचामराठी कोडी व त्याची उत्तरे – Marathi Kodi

मित्रांनो आपल्या सर्वाना हे माहिती आहे कि, अशा प्रकारचे प्रश्न देखील विविध स्पर्धा परीक्षांमध्ये येत असतात. त्यामुळे आपण या महत्वपूर्ण प्रश्नांकडे दुर्लक्ष न करता त्यांचा व्यवस्थित पणे अभ्यास करून कुठल्याही परीक्षेस सामोरे जाणे संयुक्तिक ठरेल यात शंकाच नाही. या व्यासपीठाच्या मदतीने अशाच स्वरूपाच्या नवनवीन क्लृप्त्या येथे शिकणार आहोत, त्यामुळे आपण वेळोवेळी येथे भेट देऊन माहिती ग्रहण करा.

मित्रांनो जास्त वेळ न घेता जाणून घेऊया कि कोणती ती ट्रिक्स आहे कि, ज्याचा मदतीने आपण अगदी सहजपणे भारतातील कोणकोणत्या राज्यातून कर्कवृत्त गेले आहे ते अगदी सहजपणे लक्षात ठेवू शकतो.

लक्षात ठेवण्याची भन्नाट ट्रिक्स

आता आपण अगदी सहजपणे या राज्यांची यादी कशी लक्षात ठेवायची हि बघूया.

मित्रांनो जर आपण वरील प्रमाणे प्रत्येक राज्यांच्या नावाचे आद्याक्षर घेतले तर एक नवीन व अतिशय कल्पक नाव तयार होते, ते कोणते –

“मि छ गु रा म प त्रि झा”

म्हणजेच मि पासून मिझोराम, छ पासून छत्तीसगढ अशा प्रकारे सर्व राज्यांची आद्याक्षरे घेऊन मिछगुरामपत्रिझा हे नाव तयार होते. आपण फक्त हा शब्द “मिछगुरामपत्रिझा” लक्षात ठेवला तरी आपले भारतातील कोणत्या राज्यातून कर्कवृत्त गेले या प्रश्नाचे उत्तर 100 टक्के बरोबर येईल.

लक्षात ठेवा – मिछगुरामपत्रिझा

तर मित्रांनो बघितले किती सोपी पद्धत आहे. आम्हाला विश्वास आहे कि आपल्याला हि क्लृप्ती निश्चितच आवडली असणार!

हे वाचाअसे कोणते फळ आहे जे बाजारात विकले जात नाही? मुलाखत प्रश्न

मित्रांनो अशाच टिप्स व ट्रिक्स साठी वेळोवेळी Netmarathi या Website ला अवश्य भेट द्या. हि माहिती आपल्या मित्र व मैत्रीणींना जरूर Share करा.


Share :

Leave a Comment