Marathi Katha – जर आपण मराठी कथा वाचण्यास इच्छुक असाल तर आम्ही आपल्यासाठी येथे हजारो Marathi Katha, Kadambari, Goshti उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
Marathi Katha | मराठी कथा
नमस्कार वाचकांनो, जर आपण मराठी कथा (Marathi Katha) वाचण्यास इच्छुक असाल तर आपल्यासाठी आम्ही येथे सर्वोत्तम मराठी कथा व कादंबरी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामध्ये प्रेम कथा, आत्मकथा, ऐतिहासिक कथा, अनुभव कथा, बालकथा, भय कथा, बोध कथा, धार्मिक कथा, गुप्तहेर कथा, मुलाखत, कुटुंब कथा, लघु कथा, मैत्री कथा, प्रवास वर्णन कथा, प्रेरणादायी कथा, रहस्य कथा, रोमांचक कथा, विज्ञान कथा, विनोदी कथा, विरह कथा व इतरही अनेक घटकांमधील कथांचा समावेश आहे.
जरूर वाचा…
कथांची श्रेणी
कथा (Marathi Katha) म्हणजे काय?
एखाद्या विशिष्ट घटनांचे किंवा प्रसंगांचे स्थलकाळाच्या माध्यमातून तसेच विविध पात्रांच्या माध्यमातून शब्दांची सुयोग्य सांगड घालून केलेले अस्सल चित्रण म्हणजेच कथा. आपल्यापैकी सर्वांनाच दर्जेदार आणि सर्वोत्तम कथा वाचणे आवडते. कथा हि आपल्याला त्या काळात घेऊन जाते आणि आपल्याला एक मनोरंजनाची मेजवानी उपलब्ध करून देते. कथालेखन हा मराठी भाषेतील उपयोजित लेखन प्रकारातील एक महत्वाचा घटक आहे. आपल्या सर्वांना गोष्टी वाचण्यास आणि ऐकण्यास खूपच आवडते. लहानपणी आपल्यापैकी बहुतेकांनी आपल्या आजी-आजोबांकडून नक्कीच कथा ऐकल्या असतील.
कथा हि विशिष्ट घटना, प्रसंग इ. शी संबंधित असू शकते. कथेची उद्दिष्ट्ये हि मनोरंजन, ज्ञानात भर घालणे अशीदेखील असू शकतात. चांगली दर्जेदार कथा हि अनेकदा वाचली जाते आणि प्रत्येक वेळी वाचताना त्यात नवीनपणा जाणवतो. त्यामुळेच अशा कथा आम्ही आपल्यासाठी येथे उपलब्ध करून देणार आहोत. कथा लिहिताना आपल्याला वाचक आणि श्रोते यांच्यामध्ये विचारांची सांगड घालावी लागते. एक चांगली कथा जी एकदा वाचली किंवा ऐकली कि ती आपल्याला मोलाचा आनंद देते.
कथा लिहिताना खालील बाबी नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजे…
- कथेचे शीर्षक नेहमीच आकर्षक असावे.
- सर्वप्रथम आपण हि बाब लक्षात घेतली पाहिजे कि, कथेमध्ये वाक्य आणि परिच्छेद हे लहान लहान असावेत.
- वाक्य व परिच्छेद अत्यंत विस्तृत, मोठे नसावेत.
- कथेत प्रसंगानुसार वातावरण निर्मिती करावी.
- कथेची भाषा हि फार क्लिष्ट असू नये.
- कथेतील भाषेचा, घटनांचा ओघ हा कालानुक्रमे असला पाहिजे.
- कथेची भाषा हि अगदी सोपी आणि अस्खलित असावी.
- कठीण आणि समजण्यास क्लिष्ट अशी वाक्यरचना कथा लिहिताना नसावी.
- कथा लिहिताना हि कंटाळवाणी होऊ नये, याची काळजी घ्यावी.
- कथेचा शेवट करताना सुंदर आणि सुलभ पद्धतीने करावा.
- कथा हि नेहमी भूतकाळात लिहावी.
- लेखनातील घटना, प्रसंगानुसार काळाचे योग्य भान राखले जाणे महत्वाचे आहे.
- कथा लिहिताना अर्थपूर्ण वातावरण निर्माण झाले पाहिजे.
- कथा संपताना वाचकांच्या मनात कथेविषयी कोणतेही प्रश्न शिल्लक असू नये.
- कथेतून वाचकांना दर्जेदार आणि सर्वोत्तम मनोरंजन प्राप्त झाले पाहिजे, याची काळजी घ्यावी.
कथेचे विविध प्रकार
- प्रेम कथा
- आत्मकथा
- ऐतिहासिक कथा
- अनुभव कथा
- बालकथा
- भय कथा
- बोध कथा
- धार्मिक कथा
- गुप्तहेर कथा
- मुलाखत
- कुटुंब कथा
- लघु कथा
- मैत्री कथा
- प्रवास वर्णन कथा
- प्रेरणादायी कथा
- रहस्य कथा
- रोमांचक कथा
- विज्ञान कथा
- विनोदी कथा
- विरह कथा
कथेतील महत्वाचे घटक
कथेतील काही महत्वाचे खालीलप्रमाणे आहेत, कि जे कथेला एक साचेबद्धपणा प्राप्त करून देतात.
- कथानक
- पात्रचित्रण
- वातावरण निर्मिती
- नाट्यमयता / संघर्ष
- संवाद
- भाषाशैली
कथेची वैशिष्ट्ये
- कथा हि वाचकांचे मनोरंजन करते.
- कथा हि वाचकांची उत्कंठा वाढवते.
- कथा एककेंद्री असते.
- कथा भूतकाळात लिहिली जाते.
- कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतला जातो.
- कथेतून एक अर्थपूर्ण मोलाचा उपदेश मिळतो.
कथा लिहिताना काही इतरही बाबी लक्षात घेतल्या तर कथा लिहिताना आणि वाचकांना ती वाचताना एक सुस्पष्टपणा, दर्जेदारपणा प्राप्त होईल.
- सर्वप्रथम दीर्घ कथा लिहिण्यापेक्षा लघुकथा लिहिण्याचा प्रयत्न करावा.
- सर्वसाधारणपणे आठशे ते हजार शब्दांत कथा लिहिलेली उत्तम.
- शक्यतो सुरुवातीला कथा लिहिताना त्यात कमीतकमी म्हणजे चार ते पाच पात्रांची संख्या असावी. कारण त्यामुळे कथा लिहिताना गोंधळ उडू शकतो.
- कथानक घडताना, कथेतील पात्रांना काय वाटले, त्यांच्या मनातील घालमेल, ते कसे व्यक्त झाले, हे सर्व नमूद केल्यास उत्तम.
- शक्यतो कथेचे एकाहून अधिक भाग करताना प्रत्येक भागाला अनपेक्षित वळण देण्याचा प्रयत्न करावा.
नेहमी विचारली जाणारी प्रश्ने (FAQ’s)
कथा (Marathi Katha) म्हणजे काय?
एखाद्या विशिष्ट घटनांचे किंवा प्रसंगांचे स्थलकाळाच्या माध्यमातून तसेच विविध पात्रांच्या माध्यमातून शब्दांची सुयोग्य सांगड घालून केलेले अस्सल चित्रण म्हणजेच कथा.
कथेचे किती प्रकार पडतात?
कथेचे प्रेम कथा, आत्मकथा, ऐतिहासिक कथा, अनुभव कथा, बालकथा, भय कथा, बोध कथा, धार्मिक कथा, गुप्तहेर कथा, मुलाखत, कुटुंब कथा, लघु कथा, मैत्री कथा, प्रवास वर्णन कथा, प्रेरणादायी कथा, रहस्य कथा, रोमांचक कथा, विज्ञान कथा, विनोदी कथा, विरह कथा व इतरही अनेक प्रकार पडतात.
कथेचे महत्वाचे घटक कोणते आहेत?
कथानक, पात्रचित्रण, वातावरण निर्मिती, नाट्यमयता / संघर्ष, संवाद, भाषाशैली हे कथेतील महत्वाचे घटक आहेत.
कथेची वैशिष्ट्ये कोणती आहेत?
कथा हि वाचकांचे मनोरंजन करते. ती एककेंद्री असते. त्यातून मोलाचा उपदेश मिळतो.