1 January Dinvishesh, Today History in Marathi | 1 जानेवारी दिनविशेष, घटना

1 January Dinvishesh, Today History in Marathi - 1 जानेवारी दिनविशेष, इतिहासात घडलेल्या घटना, घडामोडी, जन्म-मृत्यू, जागतिक, राष्ट्रीय दिवस माहिती वाचा.

1 January Dinvishesh

January-Dinvishesh

Table of Contents

जागतिक दिवस

जागतिक दिवस
नववर्ष दिन
जागतिक शांतता दिन
जागतिक कौटुंबिक दिवस
ख्रिस्ती नववर्षारंभ दिन

महत्वाच्या घटना

महत्वाच्या घटना
1756 - निकोबार बेटे डेन्मार्कच्या ताब्यात गेली आणि त्यांना 'न्यू डेन्मार्क' असे नाव देण्यात आले.

1785 - डेली यूनिवर्सल रजिस्टर म्हणजेच टाईम्स ऑफ लंडनने आजच्या दिवशी पहिला अंक प्रकाशित केला होता.

1808 - यू. एस. ए. (USA) मध्ये गुलामांच्या आयातीस बंदी घालण्यात आली.

1818 - भीमा कोरेगाव येथे एफ. एफ. स्टाँटन यांच्या नेतृव्ताखाली फक्त ५०० सैनिक असलेल्या दुसऱ्या बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्री बटालियनने पेशव्यांच्या 25,000 सैन्याचा पराभव केला.

1842 - बाबा पद्मनजी यांचे 'ज्ञानोदय' वृत्तपत्र सुरू झाले.

1848 - महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली.

1862 - इंडियन पीनल कोड (IPC) अस्तित्वात आले.

1880 - विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गो. ग. आगरकर यांनी पुणे येथे 'न्यू इंग्लिश स्कूल' ची स्थापना केली.

1883 - पुणे येथे नूतन मराठी विद्यालयाची स्थापना

1899 - क्यूबामधील स्पेनची राजवट संपुष्टात आली.

1900 - स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी मित्रमेळा या संघटनेची स्थापना केली.

1908 - 'संगीतसूर्य' केशवराव भोसले यांनी हुबळी येथे 'ललित कलादर्श' ही नाटक कंपनी स्वबळावर स्थापन केली.

1912 - याच दिवशी रिपब्लिक ऑफ चायनाची स्थापना झाली होती.

1915 - महात्मा गांधी यांना 'कैसर-ए-हिंद' चा पुरस्कार व्हायसरॉय यांच्या हातून मिळाला.

1919 - गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट अमलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली.

1920 - शंकरराव वासुदेव किर्लोस्कर यांनी छापखान्याची स्थापना केली. त्यातुनच किर्लोस्कर, स्त्री व मनोहर या मासिकांचे संपादन सुरू केले.

1923 - चित्तरंजन दास (देशबंधू) आणि मोतीलाल नेहरू यांनी स्वराज पक्षाची स्थापना केली.

1932 - डॉ. ना. भि. परूळेकर यांनी 'सकाळ' वृत्तपत्र हे सुरू केले.

1972 - वाघाला राष्ट्रीय प्राणी म्हणून निवडले गेले.

1973 - मानेकशॉ यांना फ़ील्ड मार्शलपदी नियुक्त केले गेले.

1995 - WTO ची स्थापना झाली.

2000 - ई कॉमर्स, ई मेल, इंटरनेट अशा इलेक्ट्रॉनिक सेवांमध्ये वापरण्यासाठी ग्रिनीच इलेक्ट्रॉनिक टाइम (GeT) या आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेची सुरुवात झाली.

2001 - कलकत्ताला अधिकृतरित्या कोलकत्ता म्हणून ओळखले जाऊ लागले.

2004 - चेकोस्लोवाकियाचे राष्ट्रपती व्हॅकलाव हवेली यांना गांधी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

जन्मदिवस/जयंती/वाढदिवस

जन्मदिवस/जयंती/वाढदिवस
1662 - बाळाजी विश्वनाथ भट तथा पहिला पेशवा यांचा जन्म (मृत्यू - 12 एप्रिल 1720)

1879 - इ. एम. फोर्स्टर - ब्रिटिश साहित्यिक यांचा जन्म (मृत्यू - 7 जून 1970)

1892 - महादेव देसाई - स्वातंत्र्य लढ्यातील नेते आणि महात्मा गांधींचे स्वीय सहाय्यक यांचा जन्म (मृत्यू - 15 ऑगस्ट 1942)

1894 - सत्येंद्रनाथ बोस - भारतीय भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म (मृत्यू - 4 फेब्रुवारी 1974)

1900 - श्रीकृष्ण नारायण रातंजनकर - आग्रा घराण्याचे गायक, शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरू यांचा जन्म (मृत्यू - 14 फेब्रुवारी 1974)

1902 - कमलाकांत वामन केळकर - भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक यांचा जन्म (मृत्यू - 6 डिसेंबर 1971)

1918 - शांताबाई दाणी - ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी यांचा जन्म (मृत्यू - 9 ऑगस्ट 2002)

1923 - उमा देवी खत्री उर्फ 'टुन टुन' - अभिनेत्री व गायिका यांचा जन्म (मृत्यू - 24 नोव्हेंबर 2003)

1928 - डॉ. मधुकर आष्टीकर - लेखक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष यांचा जन्म (मृत्यू - 22 मे 1998)

1935 - भारतीय अभिनेत्री शकीला यांचा जन्म.

1936 - राजा राजवाडे - साहित्यिक यांचा जन्म (मृत्यू - 21 जुलै 1997)

1941 - गोवर्धन असरानी ऊर्फ 'असरानी' - चित्रपट कलाकार यांचा जन्म

1943 - रघुनाथ माशेलकर - शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक, पद्मश्री, पद्मभूषण यांचा जन्म

1950 - दीपा मेहता - भारतीय वंशाच्या कॅनेडियन दिग्दर्शिका आणि पटकथालेखिका यांचा जन्म

1951 - नाना पाटेकर - अभिनेता यांचा जन्म

1953 - भारताचे माजी विदेश मंत्री सलमान खुर्शीद यांचा जन्म

1961 - मणिपूरचे मा. मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांचा जन्म.

1971 - संसदेचे मा. सदस्य ज्योतिरादित्य सिंधिया यांचा जन्म.

1975 - भारतीय चित्रपट सृष्टीची अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांचा जन्म.

1979 - भारतीय चित्रपट सृष्टीची अभिनेत्री विद्या बालन यांचा जन्म.

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतिदिन

मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतिदिन
1515 - लुई (बारावा) - फ्रान्सचा राजा यांचे निधन (जन्म - 27 जून 1462)

1748 - योहान बर्नोली - स्विस गणितज्ञ यांचे निधन (जन्म - 27 जुलै 1667)

1894 - हेन्‍रिच हर्ट्‌झ - जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन (जन्म -22 फेब्रुवारी 1857)

1944 - सर एडविन लुटेन्स - दिल्लीचे नगररचनाकार यांचे निधन (जन्म - 29 मार्च 1869)

1955 - डॉ. शांतिस्वरुप भटनागर - वैज्ञानिक यांचे निधन (जन्म - 21 फेब्रुवारी 1894)

1975 - शंकरराव वासुदेव किर्लोस्कर - उद्योजक, साहित्यिक व चित्रकार यांचे निधन (जन्म - 8 ऑक्टोबर 1891)

1983 - भारतातील प्रसिद्ध उद्योगपती डी. एन. खुरोदे यांचे निधन

1989 - दिनकर साक्रीकर - समाजवादी विचारवंत व पत्रकार यांचे निधन

2008 - भारताचे प्रसिद्ध लेखक प्रतापचंद्र चंदर यांचे निधन

2009 - रामाश्रेय झा - संगीतकार, वादक व शास्त्रीय संगीतातील विद्वान यांचे निधन (जन्म - 11 ऑगस्ट 1928)

महिन्यानुसार दिनविशेष

महिन्यानुसार दिनविशेष
जानेवारी फेब्रुवारी
मार्च एप्रिल
मे जून
जुलै ऑगस्ट
सप्टेंबर ऑक्टोबर
नोव्हेंबर डिसेंबर

हे वाचा - 2 जानेवारी दिनविशेष, इतिहासात घडलेल्या घटना

चूक कळवा