मृत समुद्राची ही रोचक तथ्ये जाणून घ्या, काही तर आहेत भन्नाट | Dead Sea in Marathi

Share :

Dead sea in Marathi – आजच्या या लेखात मृत समुद्राविषयी भन्नाट तथ्य आणि त्याची वैशिष्ट्ये वाचणार आहोत, नक्की वाचा, मृत समुद्र म्हणजे काय?

जग हे विविध रोचक आणि अविस्मरणीय तथ्यांनी आणि बाबींनी भरलेले आहे. जगभरात अशी काही ठिकाणे आहेत कि ज्याविषयी वाचले किंवा ऐकले तर प्रथम आपण त्त्यावर विश्वासच ठेवत नाही.

आपण हाच विचार करतो कि हे कसे शक्य आहे. परंतु मित्रांनो, आपल्या कल्पनेच्याही पुढे असलेल्या काही गोष्टी या विश्वात आहेत. अशाच प्रकारच्या एका तथ्याविषयी आपण येथे माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का कि, या पृथ्वीवर असा एक समुद्र आहे ज्याविषयी खूपच रोचक आणि आश्चर्यकारक गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

त्या समुद्राचे नाव आहे मृत समुद्र (Dead Sea). आपल्या आगळ्यावेगळ्या वैशिष्ट्यांसाठी हा समुद्र ओळखला जातो.

Dead sea in marathi
Dead sea in marathi

या समुद्राचे काही वैशिष्ट्ये, रोचक तथ्य आपण जाणून घेऊया.

Dead Sea in Marathi

मृत समुद्र म्हणजे काय?

मृत समुद्र हा इस्राएल व जॉर्डन यांच्या दरम्यान पसरलेला एक भूवेष्टित समुद्र आहे. हा समुद्र भौगोलिक दृष्टिकोनातून वस्तुतः तलाव प्रकारातच मोडतो.

हा समुद्र समुद्रसपाटीपासून सुमार 400 मीटर खोलीवर आहे. या पाण्यातील प्रचंड क्षारतेमुळे एकपेशीय प्राण्यांशिवाय इतर कुठलाही जीव येथे जिवंत राहू शकत नाही, त्यामुळे यास मृत समुद्र असे म्हणतात.

मृत समुद्राचा उत्तर भाग हा सर्वात मोठा आणि खोल आहे. या भागाची लांबी सुमारे 50 किलोमीटर आणि खोली सुमारे 400 मीटरपर्यंत आहे. या समुद्राची दक्षिणेकडील लांबी फक्त 11 किलोमीटर आहे तर खोली फक्त आणि फक्त 4 मीटर खोल आहे.

या समुद्राला मिळणारी एकमेव नदी म्हणजे जॉर्डन नदी. हि या समुद्राची एकमेव उपनदी आहे.

मृत समुद्राची क्षारता सर्वाधिक का आहे?

या समुद्राच्या पाण्याची क्षारता प्रती लिटर सुमारे 340 ग्रॅम एवढी आहे, म्हणजेच इतर समुद्राच्या पाण्याच्या तुलनेत तब्बल 33% अधिक खारट आहे. याचे कारण म्हणजे या समुद्राला मिळणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात येथील बाष्पीभवनाचा वेग जास्त आहे.

बाष्पीभवनाचा वेग जास्त असण्याचे कारण म्हणजे येथे पडणारा अत्यल्प पाऊस आणि उच्च तापमान.

हे वाचामाशी नेहमी तिचे समोरील दोन्ही पाय का घासते? तुम्हाला आहे का माहिती…

या पाण्यात विविध मूलद्रव्य आढळतात. त्यात सोडियम क्लोराईड, मॅग्नेशियम क्लोराईड, कॅल्शियम क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड आणि मॅग्नेशियम ब्रोमाइड यांचा समावेश होतो.

या समुद्राचा सुमारे 27 टक्के भाग हा घन पदार्थांनी बनलेला आहे. इतर समुद्राच्या पाण्यात तुलनेत या समुद्राच्या पाण्यात सुमारे 20 पट जास्त ब्रोमिन, 50 पट जास्त मॅग्नेशियम आणि 10 पट जास्त आयोडीन असते. त्यामुळेच हे पाणी न पिण्यालायक असते ना कोणत्या सजीवाच्या अधिवासाकरिता उपयोगी येते.

मृत समुद्राची काही रोचक तथ्ये

मृत समुद्राचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या समुद्रात कोणत्याही प्रकारचे जीव आढळत नाही. म्हणजेच या समुद्रात मासे, उभयचर प्राणी, सरपटणारे प्राणी, शार्क, कासव किंवा इतर वनस्पती देखील आढळत नाही. याचे कारण म्हणजे येथील पाण्याची असलेली क्षारता.

कधी कधी जॉर्डन नदीच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर काही मासे या समुद्रात येतात, परंतु या समुद्राच्या प्रचंड क्षारतेमुळे ते लगेच मरण पावतात.

या समुद्राचा काहीही उपयोग नाही असे जर तुम्हाला वाटत असेल तर ते अतिशय चुकीचे आहे. कारण येथील समुद्राच्या पाण्यात विविध प्रकारचे खनिजे असल्यामुळे या पाण्याला एक प्रकारचा औषधी गुणधर्म आहे.

या पाण्यामुळे आणि येथील चिखलामुळे विविध प्रकारचे त्वचाविकार बरे होत असल्याचे सांगितले जाते. तसेच येथे असलेला चिखल त्वचेला लावल्यामुळे त्वचा तजेलदार होते असेही काही जणांचे म्हणणे आहे.

ब्रोमिन आपल्या शरीरातील धमन्यांना शांत करतो, तसेच मॅग्नेशियम त्वचा रोगांपासून वाचवतो आणि आयोडीन विविध ग्रंथींची क्रियाशीलता वाढवण्यास मदत करतो.

या समुद्राच्या पाण्यातील औषधी गुणधर्मामुळे विविध कंपन्या त्यांच्या सौंदर्य प्रसाधन निर्मितीत या पाण्याचा वापर करतात.

हे वाचाकाही गमतीदार तथ्य जाणून घ्या, याबाबत तुम्हाला कदाचित माहिती नसेल…

या समुद्राचे अजून एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे या समुद्राच्या पाण्यात कोणतीही व्यक्ती किंवा प्राणी बुडून मरू शकत नाही. याचे कारण येथील पाण्याची असलेली उच्च घनता हे सांगितले जाते.

या समुद्राच्या वैशिष्ट्यपूर्ण आविष्कारामुळे येथे दरवर्षीच पर्यटकांची गर्दी असते. या समुद्राला अरबांचा समुद्र, अस्फाल्टचा समुद्र या नावांनीही ओळखले जाते.

मृत समुद्राचे वैशिष्ट्ये आपण अभ्यासली आहेत, तथापि 1960 पासून या समुद्राच्या पाण्याच्या पातळीत नेहमीच घट होत आलेली आहे.

तर मित्रांनो, आम्हाला खात्री आहे कि आम्ही आपल्याला मृत समुद्राविषयी दिलेली माहिती (Dead sea in Marathi) आपल्याला नक्कीच आवडली असेल.

जर हि माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा, जेणेकरून त्यांनाही मृत समुद्राविषयी माहिती मिळेल. अशाच प्रकारच्या दर्जेदार माहितीसाठी वेळोवेळी आमच्या Netmarathi या वेबसाईटला भेट द्या.

FAQ’s :

मृत समुद्राची क्षारता सर्वाधिक का आहे?

अत्यल्प पडणारा पाऊस आणि वेगाने होणारे बाष्पीभवन यामुळे मृत समुद्राची क्षारता सर्वाधिक आहे.

मृत समुद्राची क्षारता किती आहे?

मृत समुद्राच्या पाण्याची क्षारता प्रती लिटर सुमारे 340 ग्रॅम एवढी आहे.

मृत समुद्र कोठे आहे?

मृत समुद्र हा इस्राएल व जॉर्डन यांच्या दरम्यान पसरलेला समुद्र आहे.

मृत समुद्र म्हणजे काय?

मृत समुद्रात कुठलाही जीव जिवंत राहू शकत नाही, म्हणून याचे नाव मृत समुद्र असे आहे.


Share :

Leave a Comment