मोबाइल हॅक झाला आहे हे कसे ओळखावे? जाणून घ्या…

Share :

Mobile hack zala he kase olakhave – आज या लेखाच्या माध्यमातून आपण मोबाईल हॅक झालेला कसा ओळखावा आणि त्यावर उपाय याची माहिती जाणून घेणार आहोत. नक्की वाचा…

मोबाइल हॅक झाला आहे हे कसे ओळखावे?

सध्याचा जमाना हा स्मार्टफोनचा जमाना आहे. आजकाल रोज कोणत्या ना कोणत्या कंपनीचा स्मार्टफोन बाजारात आलेला आपण पाहतच असाल. मोबाईल हा आपल्या जीवनाचा अगदी अविभाज्य भाग झाला आहे. आपली कितीतरी कामे आपण या मोबाईलच्या सहाय्याने पार पाडत असतो. आजकाल कोणीही असा नाही कि जो स्मार्टफोन वापरत नसेल. मोबाईलशिवाय आयुष्य व्यतीत करणे आता प्रत्येकाला अवघड वाटू लागले आहे.

सध्या रोजच्या रोज तंत्रज्ञान इतके प्रगत होऊ लागले आहे कि, रोज काहीतरी अपडेट आपल्याला बघायला मिळते. मोबाईलच्या सहाय्याने एखादे काम अगदी चुटकीसरशी होते. अगोदर त्याच कामाला दिवस दिवस लागत असे. उदा. दुसऱ्याला पैसे पाठवणे, त्याच्याकडून पैसे स्वीकारणे, मोबाईलचे, लाईटचे बिल भरणे अशी कितीतरी कामे अगदी एका क्लिकमध्ये होऊन जातात.

mobile-hack-zala-he-kase-olakhave
मोबाइल हॅक झाला आहे हे कसे ओळखावे?

या सर्व बाबींमुळे मोबाईल हा अगदी अत्यावश्यक झाला आहे. परंतु मित्रांनो, याचबरोबर मोबाईल वापरताना आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते. कारण सध्या तंत्रज्ञानाचा जमाना आहे हि जरी चांगली गोष्ट असली तरी त्याचबरोबर काही वाईट गोष्टीसुद्धा जन्माला आल्या आहेत त्या म्हणजे हॅकिंग. हो मित्रांनो हॅकर्स आपल्या मोबाईलवर एखादी लिंक, एखादा मेसेज पाठवून किंवा एखादा खोटा इमेल पाठवून अगदी सहजपणे आपला मोबाईल फोन हॅक करू शकतात.

सर्वसामान्य लोकांना याची पुसटशीदेखील कल्पना नसते कि ते वापरत असलेला मोबाईल फोन हॅक झाला आहे. मोबाईल हॅक झाल्यामुळे लोकांचा खासगी डेटा, बँकिंगची माहिती जसे कि, डेबिट-क्रेडीट कार्ड नंबर, ATM चा पिन, खासगी फोटो, व्हिडीओ या सर्व माहितीवर हॅकर्स ताबा मिळवतात. त्यामुळे ज्या व्यक्तीचा मोबाईल हॅक झाला आहे, त्या व्यक्तीचे अतोनात नुकसान होते.

आज या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत कि, आपल्याला कसे कळेल कि आपला मोबाईल हॅक झाला आहे आणि जर मोबाईल हॅक झाला असेल तर नेमके काय करावे?

चला तर मग मित्रांनो सुरु करूया आजच्या लेखाला…

जास्त प्रमाणात डेटा खर्च होणे

जर आपल्या फोनमध्ये एखादा व्हायरस असेल किंवा आपला मोबाईल हॅक झाला असेल तर तुमचा डेटा हा जास्त प्रमाणात वापरला जातो. त्यामुळे जर इतर वेळी तुमचा डेटा शिल्लक राहत असेल आणि जर अचानक तो जास्त प्रमाणात संपायला लागला तर समजून जा कि काहीतरी गडबड आहे. कारण ज्यावेळी आपला फोन हॅक होतो त्यावेळी आपल्या फोनमधील डेटा ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर होत असतो. त्यातून आपली वैयक्तिक तसेच बँकिंगची माहिती पाठविली जाते. त्यामुळे अचानक जर तुमचा डेटा जास्त प्रमाणात वापरला जात असेल तर वेळीच सावध व्हा.

अचानकपणे App इनस्टॉल होणे

जर फोनमध्ये काही App हे अचानकपणे तुम्ही इनस्टॉल न करताही इनस्टॉल होत असेल तर समजून जा कि तुमचा फोन नक्कीच हॅक झाला आहे. आपण कोणते App इनस्टॉल केले आहे हे आपल्याला माहितच असते. अशावेळी आपण जर ते App इनस्टॉल केले नसेल तर तात्काळ ते डिलीट करून टाका.

मोबाईल खूपच हळू चालणे

जर आपला मोबाईल हॅक झाला असेल तर तो खूपच हळू चालतो. याचा असा अर्थ होत नाही कि, तुमचा मोबाईल फोन हळू चालतो म्हणजे तो 100 टक्के हॅकच झाला असेल. कारण या गोष्टी मोबाईलचा स्पेस, Software, Ram यावर अवलंबून असतात. परंतु जर तुमचा मोबाईल चांगला चालत असेल आणि जर अचानक त्याचा स्पीड कमी होऊन तो हळू हळू चालू लागला तर समजून जा तुमचा मोबाईल हॅक झाला आहे.

मोबाईलची बॅटरी लवकर संपणे

आपल्या मोबाईलची बॅटरी जर अचानकपणे लवकर संपायला लागली तर ते देखील मोबाईल हॅक झाल्याचे लक्षण आहे. कारण हॅकर आपल्या पाठीमागे मोबाईलमध्ये काही ना काही उद्योग करतच असतो. त्यामुळे आपल्या मोबाईलची बॅटरी लवकर संपते. त्यामुळे जर असे झाले तर समजून जा कि तुमचा मोबाईल हॅक झाला आहे.

तर मित्रांनो, वरील लक्षणे हि मोबाईल हॅक झाल्याची आहेत. आता आपण पाहूया कि आपला मोबाईल हॅक न व्हावा यासाठी काय काळजी घ्यावी. कारण आजकाल मोबाईल आणि त्यातील डेटा खूपच महत्वाचा झाला आहे.

मोबाईल हॅक होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी?

1. सर्वात महत्वाचे म्हणजे आपण जे App इनस्टॉल करतो ते फक्त आणि फक्त अधिकृत वेबसाईट जसे कि, Google Play Store यावरूनच इनस्टॉल करावे.

2. कोणत्याही वेबसाईटला भेट देण्यागोदर त्याचा URL तपासा. त्यामध्ये जर https असेल तरच त्या वेबसाईटला भेट द्या अन्यथा तेथून लगेच काढता पाय घ्या. उदा. आपल्या वेबसाईटचे URL आहे https://www.netmarathi.com यातील https मधील S चा अर्थ आहे Secure. म्हणजेच ज्या वेबसाईटच्या URL मध्ये https असते त्या वेबसाईट ह्या सुरक्षित असतात. त्यामुळे हि माहिती लक्षात ठेवा.

तर मित्रांनो, वरील लक्षणांवरून आपल्या लगेच लक्षात येईल कि, आपला मोबाईल फोन हा हॅक झाला आहे कि नाही ते. जर आपला फोन हॅक झाला अशी शंका जर आपल्याला आली तर आपण आपला मोबाईल रिसीट करा. मोबाईल रिसीट करण्याअगोदर आपल्याला हवा असणाऱ्या डेटाचा Backup नक्की घेऊन ठेवा. जर आपल्याला यामध्ये काही अडचण आली तर आपल्या जवळच्या मोबाईल तज्ञाला जाऊन भेटा.

जर आपल्याला हि माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींना अवश्य शेअर करा. तसेच अशा नाविन्यपूर्ण व दर्जेदार माहितीसाठी वेळोवेळी येथे भेट द्या.


Share :

Leave a Comment