तुमचाही मोबाइल इंटरनेट डेटा लवकर संपतोय? मग या स्टेप्स फॉलो करा…

Share :

Tips for Saving Mobile Data in Marathi – जर तुमच्याही मोबाईलचा इंटरनेट डेटा लवकर संपत असेल तर खालील स्टेप्स जरूर फॉलो करा. नक्कीच तुम्हाला फायदा होईल…

Tips for Saving Mobile Data in Marathi

सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात आपण आपली बहुतेक कामे हि इंटरनेटच्या माध्यमातून करत असतो. त्यात विविध Application चा वापर करणे, माहितीची देवाणघेवाण करणे, पैसे पाठवणे किंवा स्वीकारणे अशा स्वरुपाची बहुमूल्य कामे आपण इंटरनेटच्या माध्यमातून करत असतो. लॉकडाऊनपासून तर बहुतेक लोक हे वर्क फ्रॉम होम करतात. त्यामुळे साहजिकच डेटा हा सर्वांसाठी महत्वाचा झाला आहे.

जर आपण मोबाईलवरील इंटरनेटचा वापर करत असू तर बहुतेक जणांची अशी तक्रार असते कि मोबाईल डेटा लवकर संपतो.

Tips-for-Saving-Mobile-Data-in-Marathi
Tips for Saving Mobile Data in Marathi

जर आपल्यालाही हि समस्या असेल तर आजच्या या लेखातून आपण जाऊन घेऊ कि इंटरनेट डेटाची बचत कशी करावी?

लिमिट बॅकग्राऊंड डेटा वापर

या पर्यायाचा वापर करून आपण प्रत्येक ॲपनिहाय डेटा वापरावर नियंत्रण ठेवू शकतो. यासाठी आपण खालील स्टेप्स फॉलो करा.

  • प्रथम ज्या ॲप्लिकेशनचा आपल्याला बॅकग्राऊंड वापर मर्यादित करायचा आहे त्या ॲप्लिकेशनला सिलेक्ट करा.
  • आता मोबाईल डेटा अँड वायफाय या पर्यायावर क्लिक करा.
  • आता आपल्यापुढे दिसणाऱ्या पर्यायातून डिसेबल बॅकग्राऊंड डेटा या पर्यायाला क्लिक करा.
  • ही सेटिंग्ज करून आपण मोठ्या प्रमाणात आपल्या मोबाईल डेटाची बचत करू शकतो.

डिसेबल मिडिया ऑटो डाऊनलोड

आपल्यापैकी बहुतेक जण WhatsApp, WhatsApp Business, Telegram इ. Application चा वापर करत असतील. कधी कधी या Application मध्ये बरेच फोटो, व्हिडिओ हे ऑटोमॅटिक डाऊनलोड डाऊनलोड होत असतात. त्यामुळे हे डाऊनलोड होण्यासाठी मोठ्या प्रमाणात आपले इंटरनेट खर्च होते. त्यामुळे तात्काळ मिडिया ऑटो डाऊनलोड डिसेबल करा, जेणेकरून आपल्या इंटरनेट डेटाची बचत होईल.

डेटा सेव्हरचा वापर

आपल्या मोबाईल डेटाची बचत करण्यासाठी डेटा सेव्हर हा सर्वोत्तम पर्याय आहे. डेटा सेव्हर चालू करण्यासाठी खालीलप्रमाणे टिप्स फॉलो करा.

  • प्रथम आपल्या मोबाईलच्या सेटिंग्जमध्ये जा.
  • मग तेथे वर असणाऱ्या सर्च या पर्यायावर क्लिक करा.
  • आता आलेल्या पर्यायातून डेटा सेव्हर या पर्यायावर क्लिक करून त्याला अनेबल करा.

काही ॲप्ससाठी डेटा वापर मर्यादित करा

आपल्या मोबाईलमधील बहुतेक Application हे बॅकग्राऊंडला देखील काम करत असतात. त्यामुळे आपला मोबाईल इंटरनेट डेटा आणि मोबाईल बॅटरी दोन्हीही विनाकारण खर्च होतात. हे टाळण्यासाठी आपण ॲप्सचा डेटा वापर मर्यादित करा.

हे करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

  • आता Applications या पर्यायावर क्लिक करा.
  • आता ज्या App चा आपल्याला डेटा वापर मर्यादित करायचा आहे त्या Application वर क्लिक करा.
  • आता मोबाईल डेटा या पर्यायावर क्लिक करून आपण अगदी सहजपणे तेथे Application चा डेटा वापर मर्यादित करू शकता.

फोनसाठी डेटा मर्यादा सेट करा

  • सर्वात प्रथम सेटिंग्जमध्ये जा.
  • आता कनेक्शन या पर्यायावर क्लिक करा.
  • आता डेटा वापर या पर्यायावर क्लिक करा.
  • आता मोबाईल डेटा वापरावर जा आणि वरच्या उजव्या कोपऱ्यात दिलेल्या चिन्हावर क्लिक करा.
  • आता सेट डेटा चालू करा.
  • आता डेटा वॉर्निंगवर जा आणि डेटा लिमिट सेट करा.

तुम्ही सेट केलेली मर्यादा संपल्यानंतर फोनमधील डेटा आपोआप बंद होईल. जर आपण आपले नेट पुन्हा चालू करू इच्छित असल्यास ते आपण नेहमीप्रमाणे चालू करू शकतो.

तर मित्रांनो, आपण अशा प्रकारे थोडीशी सेटिंग करून आपल्या मोबाईलचा डेटा मोठ्या प्रमाणात वाचवू शकतो. आम्हाला खात्री आहे कि, हि माहिती आपल्याला नक्कीच आवडली असेल. जर हि माहिती आपल्याला आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा.

अशाच माहितीसाठी आपण वेळोवेळी Net Marathi या वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि आपल्या मित्र-मैत्रिणींना देखील सांगा.


Share :

Leave a Comment