Why are two Pilots given different food in Plane – विमानातील पायलट आणि को-पायलट यांना वेगवेगळ जेवण दिले जाते. तुम्हाला माहिती आहे का यामागील कारण…
विमानात पायलट आणि को-पायलटला वेगळं जेवण का दिलं जातं?
जर आपण विमानाने प्रवास केला असेल तर आपल्या हे निदर्शनास आले असेल की प्रत्येक विमानात दोन वैमानिक (पायलट) असतात. यामागे प्रवाशांची सुरक्षितता हे मुख्य कारण मानले जाते. परंतु आपल्याला ही माहिती आहे का की विमानामध्ये पायलट आणि को पायलट यांना वेगवेगळे जेवण दिलं जातं. यामागे एक मोठे कारण आहे, चला तर मग त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
विमानात पायलट आणि को-पायलटला वेगळं जेवण का दिलं जातं? |
विमान प्रवासामध्ये प्रवाशांची सुरक्षितता या गोष्टीवर विमान कंपन्या सर्वात जास्त भर देतात. ज्याप्रमाणे रेल्वे मध्ये दोन मोटरमन असतात आणि दोघांनाही वेगवेगळ्या सीटस असतात त्याच प्रमाणे प्रत्येक विमानात पायलट आणि को पायलट यांची नेमणूक केलेली असते आणि त्यांनाही बसण्यासाठी वेगवेगळ्या जागा असतात.
हे वाचा – या गावात प्रवेश करण्यापूर्वी काढावा लागतो चक्क शरीराचा हा अवयव…
जेव्हा जेव्हा पायलट आणि को-पायलट यांना जेवण दिले जाते, तेव्हा ते कधीही एक सारखे जेवण नसते. ते वेगवेगळे आणि वेगवेगळ्या ठिकाणी तयार केलेले असते. यामागे एक मोठं कारण सांगितलं जातं.
विमानातील दोन्ही पायलटला एक सारखे जेवण का दिले जात नाही?
खरेतर दोन्ही पायलटला एक सारखे जेवण न देण्यामागे जे कारण असते ते म्हणजे जर त्या दोघांना एक सारखे जेवण दिले आणि त्यामध्ये काही गडबड जर असेल तर ते जेवण ग्रहण केल्यास दोन्ही पायलटची तब्येत बिघडू शकते. अशावेळी त्या दोघांनाही उपचार घेण्याची गरज निर्माण होईल. अशा वेळी जर त्या दोघांची तब्येत बिघडली तर मग विमान चालवायचे कुणी असा प्रश्न निर्माण होईल आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसंदर्भात मोठा धोका निर्माण होईल.
विमानात अनेकदा अशा घटना घडत असतात. जर दोन्हीही वैमानिक एकाच वेळी आजारी पडले, तर विमानातील शेकडो प्रवाशांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यातील एकाला अन्नातून काही झालं, तर दुसरा पायलट तरी धडधाकट आणि फिट राहावा, या उद्देशानं पायलट आणि को-पायलट यांना वेगवेगळं अन्न देण्यात येतं.
हे वाचा – विमानाचा रंग हा पांढरा का असतो?
तर मित्रांनो, आम्हाला खात्री आहे कि विमानात पायलट आणि को-पायलटला वेगळं जेवण का दिलं जातं? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळाले असेल. जर आपल्याला हि माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींना अवश्य शेअर करा. तसेच अशा नाविन्यपूर्ण व दर्जेदार माहितीसाठी वेळोवेळी येथे भेट द्या.