Dhvani Darshak Shabd - आजच्या या लेखात आपण विविध प्रकारचे ध्वनीदर्शक शब्द व त्यांचा अभ्यास करणार आहोत. नक्की वाचा ध्वनीदर्शक शब्द...
ध्वनिदर्शक शब्द | Dhvani Darshak Shabd
- तारकांचा - चमचमाट
- पैंजणांची - छुमछुम
- घोड्याचे - खिंकाळणे
- पाण्याचा - खळखळाट
- तलवारींचा - खणखणाट
- पक्ष्यांचा मंजुळ आवाज - किलबिल
- पक्ष्यांचा - किलबिलाट
- बेडकाचे - डरावणे / डरकणे / डराव डराव
- विजांचा - कडकडाट
- म्हशीचे - रेकणे
- घुबडाचा - घुत्कार
- कबुतराचे / पारव्याचे - घूमने
- कोकिळेचे - कुहू कुहू
- अश्रूंची - घळघळ
- कावळ्याची - काव काव
- मांजरीचे - म्यॅव म्यॅव
- हत्तींचे - चीत्कारणे
- कोंबडयाचे - आरवणे
- पक्षांचे - कलकलाट
- कुत्र्याचे - भुंकणे
- गाईचे - हंबरणे
- मोराचा - केकारव
- ढगांचा - गडगडाट
- नाण्यांचा - छनछनाट
- सिंहाची - गर्जना
- डासांची - भुणभुण
- पाण्याचा - खळखळाट
- वाघाची - डरकाळी
- घंटांचा - घणघणाट
- हंसाचा - कलरव
- कोल्ह्याची - कोल्हेकुई
- माकडाचा - भुभुःकार
- गाढवाचे - ओरडणे
- मोरांची - केकावली
- चिमणीची - चिव चिव
- मुंग्यांचा - गुंजारव
- मधमाशांचा - गुंजारव
- सापाचे - फूस फुसणे
- पानांची - सळसळ
- पंखांचा - फडफडाट
- बांगड्यांचा - किणकिणाट
- रक्ताची - भळभळ
- पावसाची - रिमझिम / रिपरिप
तर मित्रांनो आम्हाला खात्री आहे की, आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेले हे ध्वनी दर्शक शब्द आपल्या नक्की उपयोगी येईल. स्पर्धा परीक्षेमध्ये अशा प्रकारच्या प्रश्नांवर जास्त भर असतो. त्यामुळे जर आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर या शब्दांना विशेष महत्त्व द्या.