Marathi Jokes | मराठी जोक्स

Marathi Jokes | Jokes in Marathi | मराठी जोक्स । 😂 हसून हसून बेजार व्हाल असे मराठी जोक्स...

दारू

योगेश पहिल्यांदाच मुलगी बघायला जातो.

मुलीचे वडील - तुम्ही, दारू पिता का ?

योगेश - आधी चहा, पोहे, मुलगी बघणे तर होऊ द्या... मग बसू!

😂😂😂😂😂

विष

पोलीस - बाई तुमचा नवरा कसा मेला?

बाई - विष खाऊन...


पोलीस - मग त्याच्या अंगावर या जखमा कशाच्या आहेत?


बाई - खातच नव्हता...

😂😂😂😂😂

ऑपरेशन

डॉक्टर - घाबरू नका देशपांडे... हे खूप छोटे ऑपरेशन आहे.

रुग्ण - धन्यवाद डॉक्टर... पण माझे नाव देशपांडे नाही.

डॉक्टर - हो मला माहित आहे... देशपांडे तुमचे नाव नाही, माझे नाव आहे. 

😂😂😂😂😂

पाणी

बंड्या - बाबा मला एक ग्लास पाणी द्या ना...!

बाबा - स्वतः उठून घे ना...!


बंड्या - बाबा प्लीज द्या ना...!


बाबा - आता थोबाडीत मारीन तुझ्या.


बंड्या - बाबा मला थोबाडीत मारायला याल तेव्हा पाणी घेऊन या...

😂😂😂😂😂