Marathi Mhani | मराठी म्हणी

Marathi Mhani | Mhani in Marathi | List of Marathi Mhani | Mhani with Meaning | Mhani on Food | Mhani Ani Tyanche Arth | Mhani Olkha | Mhani with Arth.

'अ' पासून सुरु होणाऱ्या म्हणी
✓ अति तेथे माती - कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त केल्यास त्यातून हानीच होते.

असतील शिते, तर जमतील भुते - तुमच्याकडे पैसा, संपत्ती असेल तर तुमच्यावर प्रेम करणारे खूप भेटतील, मात्र तुमच्यावर वाईट दिवस आले कि हे प्रेम करणारे लोक गायब होतात.

अति शहाणा, त्याचा बैल रिकामा - स्वतःला अतिशहाणा समजणाऱ्याचे कोणतेच काम यशस्वी होत नाही.
 
अगं अगं म्हशी मला कोठे नेशी - स्वत:ची चूक मान्य न करता इतरांवर दोष ठेवणे.

अडला हरी गाढवाचे पाय धरी - एखाद्या बुद्धीमान माणसाला देखील कधी काही मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते.

अन्नछत्री जेवून, वर मिरपूड मागणे - एखादी गरजेची गोष्ट दुसऱ्याकडून घ्यायची व वर आणखी आपला मिजास दाखवायचा.

'आ' पासून सुरु होणाऱ्या म्हणी
आयत्या बिळात नागोबा - दुसर्‍याने स्वत:साठी केलेल्या गोष्टीचा आयता फायदा घेणे.

आलिया भोगासी असावे सादर - आपल्यावर कसाही प्रसंग आला तरी त्यासाठी आपण तयार असले पाहिजे.

'इ' पासून सुरु होणाऱ्या म्हणी
✓ इच्छा तेथे मार्ग - एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल तर काहीतरी मार्ग निघतोच.

'उ' पासून सुरु होणाऱ्या म्हणी
✓ उचलली जीभ लावली टाळ्याला - विचार न करता बोलणे.

'ए' पासून सुरु होणाऱ्या म्हणी
✓ एक ना धड भराभर चिंध्या - एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्यावर सर्वच कामे अर्थवट होण्याची अवस्था.

'ऐ' पासून सुरु होणाऱ्या म्हणी
✓ ऐकावे जनाचे करावे मनाचे - लोकांचे ऐकून घ्यावे व मग आपल्याला जे योग्य वाटेल ते करावे.

'ओ' पासून सुरु होणाऱ्या म्हणी
✓ ओळखीचा चोर जीवे न सोडी - एखाद्या व्यक्तीचे कुकर्म आपण पहिले आणि तो जर परिचयातील असेल तर आपल्याला धोका असतो.

'क' पासून सुरु होणाऱ्या म्हणी
✓ करावे तसे भरावे - ज्या पद्धतीचे आपले कृत्य असेल त्याप्रमाणे आपल्याला फळ मिळतेच.

'ख' पासून सुरु होणाऱ्या म्हणी
✓ खाण तशी माती - आई वडिलाप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन होणे.

'ग' पासून सुरु होणाऱ्या म्हणी
✓ गर्वाचे घर खाली - गर्विष्ठ माणसाची कधीतरी फजिती नक्की होते.

'घ' पासून सुरु होणाऱ्या म्हणी
✓ घर पहावे बांधून लग्न पहावे करून - अनुभवाने माणूस शहाणा होतो.

'च' पासून सुरु होणाऱ्या म्हणी
✓ चोराच्या मनात चांदणे - वाईट माणसांनाच वाईट माणसांच्या युक्त्या कळतात.

'ज' पासून सुरु होणाऱ्या म्हणी
✓ जन्माला आला हेला, पाणी वाहून मेला - निर्बुद्ध माणसाचे आयुष्य शारीरिक कष्ट करण्यातच जाते.

'झ' पासून सुरु होणाऱ्या म्हणी
✓ झाकली मूठ सव्वा लाखाची - आपल्यातील कमीपणा झाकलेलाच चांगला असतो.

'ट' पासून सुरु होणाऱ्या म्हणी
✓ टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही - कष्ट केल्याशिवाय मोठेपणा मिळत नाही.

'ड' पासून सुरु होणाऱ्या म्हणी
✓ डोंगर पोखरून उंदीर काढणे - प्रचंड परिश्रम घेवूनही अल्प यश प्राप्ती होणे.

'ढ' पासून सुरु होणाऱ्या म्हणी
✓ ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू तैसा - वाईट संगतीचे वाईटच परिणाम असतात.

'त' पासून सुरु होणाऱ्या म्हणी
✓ तळे राखील तो पाणी चाखील - ज्याच्याकडे एखादे काम सोपवले तो त्याच्यापासून काहीतरी फायदा करून घेणारच.

'थ' पासून सुरु होणाऱ्या म्हणी
✓ थेंबे थेंबे तळे साचे - दिसण्यात शुल्लक वाटणाऱ्या वस्तूंचा संग्रह कालांतराने मोठा संचय होतो.

'द' पासून सुरु होणाऱ्या म्हणी
✓ दगडापेक्षा वीट मऊ - मोठ्या संकटापेक्षा लहान संकट कमी नुकसानकारक ठरते.

'ध' पासून सुरु होणाऱ्या म्हणी
✓ धर्म करता कर्म उभे राहते - एखादी चांगली गोष्ट करत असताना पुष्कळदा त्यातून नको ती निष्पत्ती होते.

'न' पासून सुरु होणाऱ्या म्हणी
✓ न कर्त्याचा वार शनिवार - एखादे काम मनातून करायचे नसते तेंव्हा ते कोणत्यातरी सबबीवर टाळणे.

'प' पासून सुरु होणाऱ्या म्हणी
✓ पळसाला पाने तीनच - सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे

'फ' पासून सुरु होणाऱ्या म्हणी
✓ फुले वेचली तिथे गोवऱ्या वेचणे - जेथे सुख भोगले तेथे वाईट दिवस पाहण्याचे नशिबी येणे

'ब' पासून सुरु होणाऱ्या म्हणी
✓ बडा घर पोकळ वासा - दिसण्या श्रीमंती पण प्रत्यक्षात तिचा अभाव

'भ' पासून सुरु होणाऱ्या म्हणी
✓ भरवशाच्या म्हशीला टोणगा - ज्या व्यक्तीवर अति विश्वास आहे नेमक्या अशाच व्यक्ती कडून विश्वासघात होणे

'म' पासून सुरु होणाऱ्या म्हणी
✓ मनात मांडे पदरात धोंडे - केवळ मोठ मोठी मनोराज्य करायचे परंतु प्रत्यक्षात पदरात काहीही पडत नाही अशी स्थिती

'य' पासून सुरु होणाऱ्या म्हणी
✓ यथा राजा तथा प्रजा - सर्वसामान्य लोक नेहमी मोठ्यांचे किंवा वरिष्ठांचे अनुकरण करतात

'र ' पासून सुरु होणाऱ्या म्हणी
✓ रंग जाणे रंगारी - ज्याची विद्या त्यालाच माहीत

'ल ' पासून सुरु होणाऱ्या म्हणी
✓ लंकेत सोन्याच्या विटा - दुसरीकडे असलेल्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला उपयोग नसतो

'व' पासून सुरु होणाऱ्या म्हणी
✓ वरातीमागून घोडे - योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे

'श' पासून सुरु होणाऱ्या म्हणी
✓ शहाण्याला शब्दाचा मार - शहाण्या माणसाला त्याच्या चुकी बाबत शब्दांनी समज दिली तरी ते पुरेसे असते

'स' पासून सुरु होणाऱ्या म्हणी
✓ सगळेच मुसळ केरात - मुख्य महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्याने घेतलेले सर्व परिश्रम वाया जाणे

'ह' पासून सुरु होणाऱ्या म्हणी
✓ हत्ती गेला पण शेपूट राहिले - कामाच्या बहुतेक भाग पूर्ण झालं आणि फक्त थोडे शिल्लक राहिला