Marathi Suvichar | सुंदर मराठी सुविचार

Marathi Suvichar - If you want to Read Latest Marathi Suvichar, we have made them available here. Read Latest Suvichar in Marathi, Read Anmol Vichar.

Marathi Suvichar
 

Latest Marathi Suvichar

 • नेहमी उच्च ध्येय ठेवा, व ते पूर्ण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा.
 • विश्वास हा एका खोडरबरसारखा असतो, तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो.
 • आवड आणि आत्मविश्वास असेल तर जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही.
 • प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करू नका, स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करा.
 • ज्या व्यक्तीकडून काहीच अपॆक्षा नसतात, तेच कधी कधी चमत्कार घडवून दाखवतात.
 • मोठी स्वप्ने पाहणारीच मोठी स्वप्ने प्रत्यक्षात उतरवतात.
 • एक चांगला शिक्षक यशाचे दार उघडून देऊ शकतो. मात्र त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.
 • दृष्टीकोन हा मनाचा आरसा आहे. तो नेहमी विचारच परावर्तीत करतो.
 • कामाचा खूप व्याप असतानाही आवर्जून काढली जाणारी आठवण म्हणजेच खरी मैत्री.

Suvichar Marathi

 • ज्याने आयुष्यात काहीच चूक केली नाही, याचा अर्थ त्याने आपल्या जीवनात काहीच केले नाही.
 • रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय म्हणजे मौन
 • भेकड म्हणून जगण्यापेक्षा शुराचे मरण कधीही चांगले.
 • आपण फक्त आनंदात रहावे कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करत असतात.
 • काट्यावरून चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर पोहचते, कारण पायात रूतणारे काटे पायांचा वेग वाढवतात.
 • मैत्री हि वर्तुळासारखी असते, ज्याला कधीच शेवट नसतो.
 • थेंब कितीही लहान असला तरी त्याच्यात अथांग सागरात तरंग निर्माण करण्याची क्षमता असते. त्यामुळे स्वतः ला कधीही लहान समजू नका.
 • प्रामाणिकपणा हि खूपच बहुमुल्य वस्तू आहे, कुठल्याही फालतू माणसाकडून त्याची अपेक्षा धरू नका.
 • मनुष्याची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरीही जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते.

100 Suvichar in Marathi

 • स्वतःला सोन्याच्या नाण्यासारखे बनवा, जे गटारीत पडले तरी त्याचे मोल कमी होत नाही.
 • परीक्षा म्हणजे स्वतः च्या आत डोकावून पाहण्याची संधी.
 • धैर्यहीन मनुष्य तेलहीन दिव्यासारखा असतो.
 • आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते, फक्त आपले विचार सकारात्मक पाहिजेत.
 • यशाची गुरुकिल्ली म्हणजे स्वतः ला ओळखणे.
 • नेतृत्व आणि कर्तुत्व कुणाकडूनच उसने मिळत नाही, ते स्वतः लाच निर्माण करावे लागते.
 • तुमच्या स्वप्नांवर मेहनत घ्या मग आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही.
 • स्वतःला कमजोर समजणे हि मोठी चूक आहे.
 • स्वतःच अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय आपल्या उपस्थितिची दखल घेतली जात नाही.
 • जगात प्रत्येकाकडे 24 तास असतात, ज्यांना यशस्वी व्हायचे असेल ते त्याचा योग्य प्रकारे वापर करतात.
 • भविष्याचा अंदाज घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तो तयार करणे.
 • कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही त्यासाठी मेहनतिचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो.
 • ज्यांच्याकडे एकट्याने चालण्याचे धैर्य आहे त्यांच्या मागे एक दिवस काफिला असतो.
 • आपण जोवर काही करत नाही तोवर सर्व अशक्य दिसते.
 • जर वाईट सवयी वेळेत बदलल्या नाहीत तर त्या सवयी आपला वेळ बदलतात.
 • स्वतःची वाट स्वताच बनवा कारण इथे लोक वाट दाखवायला नाही वाट लावायला बसलेत.
 • आयुष्यात काही शिकायचे असेल तर कठीण परिस्थितीतही शांत राहणं शिका.
 • विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.
 • शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे.
 • चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.
 • समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.
 • आपण जे पेरतो तेच उगवतं.
 • सरावानेच अचूकता निर्माण करता येते.
 • गरज ही शोधाची जननी आहे.
 • जिथं आपली कदर नाही, तिथं कधीही जायचं नाही. ज्यांना खर सांगितल्यावर राग येतो, त्यांची मनधरणी करत बसायचे नाही. जे नजरेतून उतरलेत त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही.
 • कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही, आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.
 • मोत्याच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य अधिक शोभून दिसतो.
 • तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची माहिती नाही त्या विषयी मौन पाळा.
 • संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
 • सौंदर्य हे वस्तूत नसते, पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.
 • कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका.
 • कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही.
 • जगातील सर्वात सुंदर रोपटे विश्वासाचे असते आणि ते कोठे जमिनीवर नाही तर आपल्या मनात रुजवावे लागते.
 • गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण होतं जरूर...
 • या जगात कुठलीच गोष्ट कायम स्वरुपी रहात नाही, तुमचं दु:ख सुद्धा.
 • स्वभाव पेढ्यासारखा पाहिजे जो राजवाड्यात जेवढी चव देतो तेवढीच चव झोपडीत पण देतो.
 • सृजनातला आनंद कल्पनेच्या पलीकडचा असतो.
 • बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.
 • कपडे नाही माणसाचे विचार Branded असले पाहिजे.
 • प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमानेच जिंका.
 • उठा, जागे व्हा आणि उद्दीष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका.
 • हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
 • केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.
 • टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही.
 • हसा, खेळा पण शिस्त पाळा.
 • माणूस म्हणजे गुण व दोष यांचे मिश्रण आहे.
 • ध्येय तीच व्यक्ती गाठू शकते ज्यांच्या स्वप्नामध्ये उमेद असते.
 • जग भित्र्याला घाबरवते आणि घाबरवणाऱ्याला घाबरते.
 • आपल्याला केवळ एकाच संधीची गरज आहे.
 • पाप ही अशी गोष्ट आहे जी लपवली की वाढत जाते.
 • शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावे लागते.
 • तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.
 • नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही ,तोपर्यंत सर्व काही शक्य आहे.
 • जेंव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेंव्हा समजून घ्यावं की.....तुम्ही त्यांच्या दोन पाऊले पुढे आहात.
 • खोटी टीका करू नका, नाहीतर प्रतिटीका ऐकावी लागेल.
 • जितका मोठा संघर्ष असतो, तितकेच मोठे यश मिळत असते.
 • वाईट गोष्टींशी असहकार दाखवणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे.
 • क्रोध माणसाला पशू बनवतो.
 • जिथे तुमची हिम्मत संपते तिथून तुमच्या पराभवाची सुरुवात होते.
 • कडू घोट प्रेमळ माणसाच्या हातून दिल्यास तो कमी कडू लागतो.
 • तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.
 • परीक्षा म्हणजे स्वतःच्या आतमध्ये डोकावून पाहण्याची संधी.
 • जिंकायची मजा तेव्हाच असते जेव्हा अनेकजण तुमच्या पराभवाची वाट पाहत असतात.
 • जरूरीपेक्षा अधिक गरजांचा हव्यास ठेवू नका.
 • आपलाही कोणाला कंटाळा येऊ शकतो ही जाणीव फार भयप्रद आहे.
 • जो धोका पत्करण्यास कचरतो, तो लढाई काय जिंकणार.
 • संयम नावाच्या कटू वृक्षाची फळे नेहमी गोड असतात.
 • दुःखातून येणारे सुख हे मधुर असते.
 • केवड्याला फळ येत नाही पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो.
 • या जगात सर्वात सोपी आणि निरुपयोगी गोष्ट म्हणजे विनाकारण चिंता करणे.
 • क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.
 • दुःखातून येणारा आनंद सुखमय असतो.
 • घाबरटाला सारेच अशक्य असते.
 • शहाणा माणूस चुका विसरतो, पण त्याची कारणे नाही विसरत.
 • ध्येयप्राप्तीसाठी अशी लढाई लढा कि तुम्ही हरला तरी जिंकणाऱ्यापेक्षा तुमची चर्चा जास्त झाली पाहिजे.
 • विज्ञानाचं तंत्र शिका पण जगण्याचा मंत्र हरवू नका.
 • केवळ योगायोग असे काहीही नाही. जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.
 • भरलेला खिसा माणसाला दुनियी दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.
 • आवड असली की सवड आपोआप मिळते.
 • कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.
 • चिंतेऐवढे शरीराचे शोषण दुसरे कोणीही करू शकत नाही.
 • यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजून तयार व्हायचा आहे.
 • एकदा कर्तव्याच्या वाटेवरुन जायचं ठरवलं की भावनांना विसरायचंच असतं.
 • ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो.
 • न हरता, न थकता न थाबंता प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हरत.
 • सूड घेण्यापेक्षा क्षमा करणे अधिक चांगले.
 • विचार असे मांडा कि तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.
 • अपमानाच्या पायऱ्यावरुनच ध्येयाचा डोंगर चढायचा असतो.

Anmol Suvichar in Marathi

 • जोपर्यंत आपण एखाद्या कामाला सुरुवात करत नाही, तोपर्यंत ती गोष्ट अशक्य वाटते.
 • मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा, ज्ञानाचा प्रकाश कुठून कधी येईल सांगता येत नाही.
 • आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमीच कृतज्ञ राहावे.
 • जो काळानुसार बदलतो, तोच नेहमी प्रगती करतो.
 • काळानुसार बदला नाहीतर काळ तुम्हाला बदलून टाकेल.
 • निंदेला घाबरून आपले ध्येय सोडू नका कारण ध्येय सध्या होताच निंदा करणाऱ्यांची मत बदलतात.
 • माणसाला स्वतः चा फोटो काढायला वेळ लागत नाही पण स्वतः ची इमेज बनवायला मात्र वेळ लागतो.
 • ज्ञानातील एक गुंतवणूक सर्वोत्तम व्याज देते.
 • परिस्थितीच्या हातातली कधीच कठपुतळी बनू नका, कारण परिस्थिती बदलण्याची ताकद तुमच्यात आहे.
 • आपले ध्येय उच्च ठेवा आणि आपण ते प्राप्त करेपर्यंत थांबु नका.
 • यश तुमच्याकडे येणार नाही त्याऐवजी आपण स्वतः त्याकडे जावे लागेल.
 • जो मैदानात हरतो तो पुन्हा जिंकू शकतो, परंतु मनातुन हरणारी व्यक्ती कधीही जिंकू शकत नाही.