Marathi Vakprachar | मराठी वाक्प्रचार

Marathi Vakprachar | Marathi Vakprachar List with Meaning | Vakprachar in Marathi | Marathi Vakprachar Arth | Marathitil Vakprachar | Vakprachar List.

'अ' पासून सुरु होणारे वाक्प्रचार
✓ अग्निदिव्य करणे - कठीण कसोटीला उतरणे

अटकेपार झेंडा लावणे - फार मोठा पराक्रम गाजवणे

अर्धचंद्र देणे - हकालपट्टी करणे

अत्तराचे दिवे लावणे - भरपूर उधळपट्टी करणे

अन्नास जागणे - उपकाराची आठवण ठेवणे

'आ' पासून सुरु होणारे वाक्प्रचार
आकाश ठेंगणे होणे - अतिशय आनंद होणे

आगीत तेल ओतणे - भांडण विकोपाला जाईल असे कृत्य करणे

आभाळ कोसळणे - फार मोठे संकट येणे

आकाशाला गवसणी घालणे - आवाक्याबाहेरची गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे

आकांडतांडव करणे - रागाने आदळआपट करणे